< Zaburi 136 >
1 Gouru erokamano ne Jehova Nyasaye, nimar ober.
१परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
2 Gouru erokamano ne Nyasach nyiseche:
२देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
3 Gouru erokamano ne Ruodh ruodhi:
३प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
4 Ne en kendo matimo honni madongo,
४जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
5 Jal mane oloso polo gi riekone,
५ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
6 Jal mane oyaro piny ewi pige,
६ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
7 Jal mane oloso rameny madongo dongo,
७ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
8 Nochweyo wangʼ chiengʼ mondo orit odiechiengʼ,
८दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
9 kod dwe gi sulwe mondo orit otieno;
९त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
10 ne En mane onego nyithindo makayo mag Misri,
१०त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
11 kendo mane ogolo jo-Israel oko kuomgi,
११आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
12 nogologi gi lwedo motegno kod bat morie;
१२ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
13 ne En mane obaro Nam Makwar diere ariyo;
१३ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
14 mi nogolo jo-Israel koluwo diere tir,
१४ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
15 to Farao gi jolwenje to nomiyo Nam Makwar oywero;
१५ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
16 ne En mane otelo ne joge e thim,
१६ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
17 ne En mane ogoyo ruodhi madongo piny,
१७ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
18 kendo mane onego ruodhi maroteke;
१८आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
19 Kaka Sihon ruodh jo-Amor,
१९ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
२०आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
21 mi nochiwo pinygi kaka girkeni,
२१आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
22 Kaka girkeni ne Israel jatichne;
२२ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
23 ne En mane oparowa ka piny ochamowa,
२३ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
24 kendo mane ogonyowa e lwet wasikwa,
२४ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
25 machiwo chiemo ne chwech duto,
२५जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
26 Gouru erokamano ne Nyasach polo,
२६स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.