< Obadia 1 >

1 Fweny mag Obadia. Magi e weche ma Jehova Nyasaye Manyalo Gik Moko Duto wacho kuom Edom. Wasewinjo wach; koa kuom Jehova Nyasaye. Jaote oseor ir ogendini mondo owach niya, “Chunguru, wadhi waked kode.”
ओबद्याचा दृष्टांत. अदोमाबद्दल प्रभू परमेश्वराने म्हटलेः आम्ही परमेश्वराकडून बातमी ऐकली आणि एक राजदूत राष्ट्रांमध्ये पाठवला आहे. तो म्हणतो, “उठा! आपण त्याच्याविरुध्द लढण्यास उठू.”
2 “To neuru, abiro miyo udok matin e kind ogendini, bende ibiro chau ahinya.
पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये लहान करीन, तू खूप तिरस्करणीय आहेस.
3 Sunga manie chunyu osewuondou, un mudak e kind lwendni, kendo ugero miechu kuonde motingʼore, un ma uwacho kendu niya, ‘En ngʼa manyalo dwokowa piny?’
जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.
4 To kata obedo ni unyalo fuyo malo mabor ka ongo, kendo ugero kar daku maber e kind sulwe malo, to koa kuno abiro dwokou piny,” Jehova Nyasaye owacho.
परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
5 “Ka jokwoge obironu, jomecho mag otieno, to mano kaka masira malich ritou, donge gibiro kwalo mwandu magu kaka ginyalo? Ka jopon mzabibu obiro iru donge digiwe olemb mzabibu matin?
तू कसा छेदला गेला आहेस! जर तुझ्याकडे चोर आले, तुझ्याकडे रात्री लुटारू आले, तर ते त्यांना पाहिजे तितकेच चोरून घेणार नाहीत का? द्राक्षे गोळा करणारे तुजकडे आले तर ते सरवा नाही का ठेवणार?
6 To mano kaka Esau ibiro choko gigene kendo mwandune mopandi noyaki!
एसावाची मालमत्ता कशी लुटण्यात आली आहे आणि त्याचा गुप्त खजिना कसा शोधून काढण्यात आला.
7 Ogendini ma uriworugo biro sembou nyaka giko mar tongʼ; osiepeu biro wuondou ma lowu; kendo joma chamo chiembu biro ketonu obadho, to ok unufweny.”
तुझ्या कराराच्या सर्व मनुष्यांनी तुला तुझ्या सीमेपर्यंत घालवले आहे, तुझ्याबरोबर सल्ला केलेल्या मनुष्यांनी तुला फसवले आहे, आणि ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझी भाकर खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे. त्याच्यात काही समजूतदारपणा नाही.
8 Jehova Nyasaye wacho niya, “Odiechiengʼno donge abiro tieko jorieko mag Edom, jogo man-gi winjo e gode mag Esau?
परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय?
9 Jolweny magi, yaye Teman, biro bedo kod bwok kendo ji duto modak, e gode mag Esau ibiro negi.
आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील.
10 Nikech lweny mane utimone owadu Jakobo unubed gi wichkuot; mi nokethu nyaka chiengʼ.
१०तू आपला भाऊ याकोब याच्यावर जो जुलूम केला त्यामुळे लाज तुला झाकील आणि तुझा कायमचा नाश होईल.
11 Chiengʼ mane ichungʼ tenge ka joma moko donjo e dhorangeyene, kendo gigoyo ombulu ne Jerusalem, ne ichal mana kodgi.
११ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.
12 Ne ok onego ungʼigi kod achaya chiengʼ masichgi, bende ne ok onego ubed mamor chiengʼ mane ikethoe Juda, kata bedo gi ngʼayi chiengʼ chandruokgi.
१२परंतु तू आपल्या भावाचा दिवस, त्याच्या विपत्तीचा दिवस पाहू नकोस, आणि तू यहूदाच्या वंशजास नाशाच्या दिवशी आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी तू गर्वाने बोलू नको.
13 Ne ok onego udonj e dhorangeye mag joga chiengʼ mane masira omakogi, kata ngʼiyogi gachaya e thagruokgi, kata kawo mwandugi, e chiengʼ thagruokgi gi chiengʼ masichegi.
१३तू माझ्या लोकांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांच्या वेशीत शिरू नको, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहू नको, आणि त्यांच्या विपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको.
14 Ne ok onego uchungʼ e akek yore, ka ugengʼone jogegi maringo, kendo ne ok onego uchiw jogegi motony e lwet wasikgi chiengʼ chandruokgi.
१४आणि त्यांच्या पळून जाणाऱ्यांस मारून टाकण्यासाठी चौकात उभा राहू नको संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांस शत्रूच्या हाती देऊ नको.
15 “Chiengʼ Jehova Nyasaye okayo machiegni ne ogendini duto, bende kaka isetimo e kaka notimni, timbeni nodwogi e wiyi iwuon.
१५कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल.
16 Mana kaka ne umer ewi goda maler e kaka ogendini duto, biro metho ametha, ginimeth ametha ma ginichal joma onge.
१६कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.
17 To ewi got mar Sayun tony nobedie, mi enobed kama ler, kendo od Jakobo nokaw girkeni mage.
१७पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
18 Od Jakobo nobed mach kendo od Josef mach nokaknie, od Esau nobed chuk mach, mi ginimoke moliel pep, onge ngʼat ma notony koa e od Esau.” Jehova Nyasaye osewacho.
१८याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.
19 Jo-Negev nokaw piny gode mag Esau, kendo joma odak e tiend gode nokaw piny jo-Filistia, ginikaw nyaka piny Efraim gi Samaria, eka jo-Benjamin nokaw piny Gilead.
१९नेगेबचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राइमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील, बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
20 To oganda mar jo-Israel mane oter e twech e piny Kanaan, nokaw pinyno nyaka chop Zarefath, kendo jo-Jerusalem manie twech, e piny Sefarad biro kawo miech Negev.
२०इस्राएल लोकांच्या या सैन्यातील जे बंदिवान झालेले लोक, ते कनान्यांचे सारफथापर्यंतचे प्रदेश आपल्या ताब्यात घेतील, आणि यरूशलेमचे जे बंदिवान सफारदात आहेत ते नेगेबची गावे घेतील.
21 Jores noidhi ewi got mar Sayun, mi ginibed kod loch ewi gode mag Esau, kendo pinyruoth duto nobed e lwet Jehova Nyasaye.
२१आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.

< Obadia 1 >