< Kwan 13 >

1 Jehova Nyasaye nowacho ne Musa niya,
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 “Or jomoko odhi onon piny Kanaan, ma onego ami jo-Israel. Koa e dhoot ka dhoot manie oganda inior achiel kuom jotendgi.”
“कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.”
3 Kaluwore gi dwond Jehova Nyasaye, Musa noorogi ka gia e Thim mar Paran. Jogi duto ne gin jotend jo-Israel.
तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते.
4 Magi e nying-gi, koa e dhood Reuben ne en Shamua wuod Zakur;
त्यांची नांवे अशी आहेत: रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
5 koa e dhood Simeon, ne en Shafat wuod Hori;
शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
6 koa e dhood Juda, ne en Kaleb wuod Jefune;
यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
7 koa e dhood Isakar, ne en Igal wuod Josef;
इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
8 koa e dhood Efraim, ne en Hoshea wuod Nun;
एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
9 koa e dhood Benjamin, ne en Palti wuod Rafu;
बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी,
10 koa e dhood Zebulun, ne en Gadiel wuod Sodi;
१०जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
11 koa e dhood Manase (ma en dhood Josef), ne en Gadi wuod Susi;
११योसेफ वंशातला (मनश्शे) सूसीचा मुलगा गद्दी,
12 koa e dhood Dan, ne en Amiel wuod Gemali;
१२दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल.
13 koa e dhood Asher, ne en Sethur wuod Mikael;
१३आशेर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
14 koa e dhood Naftali, ne en Nabi wuod Vofsi;
१४नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
15 koa e dhood Gad, ne en Geuel wuod Maki.
१५आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
16 Magi e nying chwo mane Musa ooro mondo onon piny Kanaan. (Musa nomiyo Hoshea wuod Nun nying ni Joshua.)
१६मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)
17 Kane Musa oorogi mondo gidhi ginon piny Kanaan, nowachonegi niya, “Luwuru Negev kendo udhi nyaka piny manie got.
१७मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
18 Nonuru ane pinyno kaka chalo, mondo ungʼego ni joma odak kanyo gin thuondi koso ngoche, gingʼeny koso ginok?
१८देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.
19 Nonuru ane kaka piny ma gidakieno chalo, ka ober kata orach? Nonuru ane mier ma gidakie nichalo nade, ochielgi koso ok ochielgi?
१९ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
20 Lopno, to chalo nade? En lowo mamiyo koso motwo? Bende en gi yiende koso oongego? Temuru beru mondo ukel olembe moko mag pinyno.” (Ndalono ne en kinde keyo mokwongo mar mzabibu.)
२०योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते.
21 Omiyo ne giwuok kendo neginono pinyno kochakore Thim mar Zin nyaka Rehob, kagichomo Lebo Hamath.
२१म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला.
22 Ne giwuotho mi gikadho piny Negev nyaka gichopo Hebron, kama Ahiman, Sheshai kod Talmai, ma nyikwa Anak nodakie. (Hebron noger higni abiriyo motelone Zoan manie piny Misri.)
२२त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते.
23 Kane gichopo e Holo mar Eshkol, ne gitongʼo bad yath achiel motingʼo pumbi mar olemb mzabibu. Ji ariyo kuomgi notingʼe e luth kaachiel gi gik mongʼinore kod ngʼowu.
२३नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली.
24 Kanyo niluongo ni Holo mar Eshkol nikech negingʼado bad olemb mzabibu mochiek.
२४त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25 Bangʼ ndalo piero angʼwen negidwogo ka gia nono pinyno.
२५त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
26 Negidwogo ir Musa gi Harun kod oganda jo-Israel duto e dala Kadesh manie Thim Paran. Kanyo ema ne gimiyogi dwoko kaachiel gi chokruok duto kendo neginyisogi olemo machiek e pinyno.
२६इस्राएल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांस त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.
27 Negimiyo Musa nonro machalo kama: “Ne wadhi e piny mane iorowae, kendo en piny mopongʼ gi chak kod mor kich! Olemo moa kuno eri.
२७ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हास ज्या देशात पाठवले आणि आम्ही तेथे पोहचलो. आणि खचीत दूध व मध वाहणारा तो देश आहे आणि ही त्यातली काही फळे आहेत.
28 Joma odak kuno nigi teko mangʼeny, kendo gidakie mier madongo mochiel motegno kendo malich. Bende ne waneno nyikwa Anak kuno.
२८पण तेथे राहणारे लोक खूप शक्तीशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
29 Jo-Amalek odak Negev; jo-Hiti, jo-Jebus kod jo-Amor odak e piny manie got; to jo-Kanaan odak machiegni gi dho nam e alwora mar Jordan.”
२९अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
30 Eka Kaleb nokwero ji mondo olingʼ e nyim Musa kendo nowacho niya, “Wadhiuru kendo wakaw pinyno, nimar wanyalo kawe.”
३०मोशेजवळच्या लोकांस गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
31 To joma nodhi kode kuno nowacho niya, “Ok wanyal monjo jogo; gitek moloyowa.”
३१पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.”
32 Omiyo ne gilandone jo-Israel dwoko marachni kuom piny mane gidhi nono. Negiwacho niya, “Piny mane wadhi nono nego joma odak eigi. Ji mane waneno kuno gin joma robede.
३२आणि त्या मनुष्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तीशाली आपण नाहीत. ते म्हणाले, आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तीशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कोणत्याही मनुष्याचा सहज पराभव करण्याइतके शक्तीमान आहेत.
33 Ne waneno Nefilim kuno (nyikwa Anak aa kuom jo-Nefilim). Ne wanenore mana ka ongogo, to bende mano e kaka ne wachalo e nyimgi.”
३३आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.

< Kwan 13 >