< Jeremia 8 >
1 “‘Jehova Nyasaye wacho ni e kindego, choke mag ruodhi kod jotelo mag Juda, choke mag jodolo kod jonabi, kendo choke mag jo-Jerusalem nogol oko e liete mag-gi.
१परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.
2 Chokego noyar oko e nyim chiengʼ gi dwe kod sulwe duto manie polo mane gihero kendo tiyonegi ma bende negiluwo bangʼ-gi ka gipenjo rieko kendo lamogi. Ok nochokgi kata ikgi, to ginichal ka owuoyo manie lowo.
२आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
3 Kamoro amora ma ariembogi ka aterogie, to jogo duto motony mar oganda marachni noher tho kar ngima, Jehova Nyasaye Maratego owacho kamano.’
३आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ते जिवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो.
4 “Wachnegi ni, ‘Ma e gima Jehova Nyasaye wacho: “‘Ka ji opodho mogore piny donge gia malo? Ka ngʼato oa, donge odwogo?
४तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय?
5 Marangʼo jogi ongʼanyo oa? Angʼo momiyo Jerusalem siko ringo? Gimoko kuom miriambo; gitamore duogo.
५तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.
6 Asechiko ita malongʼo, to ok giwach gima adier. Onge ngʼama lokore weyo kuom timbegi mamono, kopenjo niya, “En angʼo ma asetimo?” Moro ka moro luwo yore owuon ka faras madhi e lweny.
६मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, मी काय केले? असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.
7 Kata mana nyamnaha manie kor polo ongʼeyo kindene moketne, kendo akuch odugla, opija gi ongo-wangʼ bende ongʼeyo ndalo mar dargi. To joga ok ongʼeyo dwach Jehova Nyasaye.
७आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
8 “‘Ere kaka inyalo wacho niya, “Wariek, nimar wan gi chik mar Jehova Nyasaye,” ka gadiera kalamb miriambo mar jondiko osetiyo kode e yor miriambo?
८आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.
9 Jomariek nokuod wigi; ginibed gi luoro mangʼeny kendo enomakgi. Nimar gisedagi wach Jehova Nyasaye, en rieko manade ma gin godo?
९शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले?
10 Emomiyo anachiw mondegi ne joma moko kendo puothegi ne jomanyien. Kochakore kuom ngʼat matin nyaka ngʼat maduongʼ, giduto giwuor ne yudo ohala; jonabi gi jodolo machalre, giduto gitimo timbe wuondruok.
१०म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.
11 Githiedho adhonde mag joga mana ka gima ok en gima lich. Giwacho niya, “Kwe, kwe,” kata kwe onge.
११काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.
12 Donge wigi kuot gi timbegi mamono? Ooyo, gionge wichkuot kata matin; bende gionge leny kata wichkuot. Omiyo ginipodhi e dier joma opodho; enolwargi piny ka ikumogi, Jehova Nyasaye owacho.
१२त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
13 “‘Anakaw nyak mag-gi. Onge olemo manobedi e mzabibu. Onge olemb ngʼowu manobedi ewi yath, kendo itgi noner. Gima asemiyogi nomagi.’” An Jehova Nyasaye ema asewacho kamano.
१३परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकीन, द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.
14 Angʼo momiyo wabet ka? Chokreuru kaachiel! Waringuru wadhi e mier madongo mochiel motegno gohinga kendo watho kuno! Nimar Jehova Nyasaye, ma Nyasachwa osejwangʼowa mondo watho, kendo osemiyowa pi moketie sum mondo wamodhi, nikech wasetimo richo e nyime.
१४आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.
15 Ne wageno kwe to onge ber mosebiro, bende ne wageno kinde mag chang, to ne nitie mana thagruok.
१५आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.
16 Giro mar farese mag wasigu iwinjo koa Dan; kendo ywak farese mathuondi miyo piny tetni. Gibiro tieko piny duto kod gik moko manie iye, dala maduongʼ kod ji duto modak kanyo.
१६त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.
17 “Ne, anaor thuol man-gi kwiri e dieru, thuonde mager ma ok bo, kendo gini kau.” Jehova Nyasaye owacho.
१७कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो.
18 Yaye Jahochna e lit, chunya ool.
१८माझ्या दु: खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.
19 Winj ywak joga koa e piny man mabor: “Donge Jehova Nyasaye ni Sayun? Ruodhe bende pod ni kuno adier?” “Angʼo momiyo gisemiya ich wangʼ gigigo ma giloso, kod nyisechegi mag pinje mamoko?”
१९पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.
20 “Ndalo keyo kod ndalo oro osekalo, to ok wakonyore.”
२०“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”
21 Nimar joga osehiny, an bende ahinyora; aywak kendo luoro omaka.
२१माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.
22 Yath tinde orumo Gilead koso? Jathieth tinde onge kanyo koso? Kare ere gima omiyo adhond joga ok nyal chango?
२२गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.