< Jeremia 46 >

1 Ma e wach Jehova Nyasaye mane obirone janabi Jeremia kuom ogendini:
परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे.
2 Kuom Misri: Ma e ote ne jolwenj Farao Neko ruodh Misri, mane oloo Karkemish e Aora mar Yufrate gi Nebukadneza ruodh Babulon e higa mar angʼwen mar Jehoyakim wuod Josia ruodh Juda:
मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
3 “Ikuru okumba magu, madongo kod matindo, kendo uwuog udhi e kedo!
लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
4 Gauru farese, idhuru farese! Kawuru kereu kurwako oguteu mag lweny! Piaguru tongeu, rwakuru okumba mau!
तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
5 En angʼo ma aneno? Kihondko ogoyogi, kendo giringo ka gia kar lweny nikech thuondi mag-gi mag lweny oselo. Giringo ka luoro omakogi ma ok gingʼi ngʼegi, kendo gin-gi luoro malich koni gi koni,” Jehova Nyasaye wacho.
हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
6 “Joma yot ok nyal ringo kata joma otegno ok nyal tony. E yo nyandwat but Aora Yufrate gichwanyore kendo gipodho.
चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
7 “Ma en ngʼa magingore ka aora Nael kendo mana ka aore ma pigegi bubni?
नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
8 Misri bubni ka aora Nael kendo mana ka aore ma pigegi bubni. Owacho ni, ‘Abiro gingora kendo anapongʼ piny; anaketh mier madongo kod ji modakie.’
उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
9 Wuoguru, yaye farese! Yaye, un joriemb geche, riembgiuru matek! Dhiuru nyime, yaye un jolweny machwo moa Kush, gi Put motingʼo okumbini, kaachiel gi chwo Lidia maywayo atungʼ.
घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
10 To odiechiengno en mar Ruoth, Jehova Nyasaye Maratego ma en odiechiengʼ, ma ochuloe kuor ni wasike. Ligangla noneki nyaka owinj ni orome, kendo nyaka otiek riyo mare gi remo. Nimar Ruoth, Jehova Nyasaye Maratego, nochiw misango e piny mantie yo nyandwat but Aora Yufrate.
१०कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
11 “Dhiyo nyaka Gilead kendo imany yath, yaye Nyar Misri Mangili. To kata obedo ni imedo manyo yedhe to imenyo kayiem kendo ok inichangi.
११“हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
12 Ogendini nowinj wichkuot momaki; ywakni nopongʼ piny. Jolweny nochwanyre kuom moro ka moro; giduto ginipodhi kanyakla.”
१२राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
13 Ma e ote mane Jehova Nyasaye owachone Jeremia janabi kuom biro Nebukadneza ruodh Babulon mondo omonj Misri:
१३जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
14 “Land wachni e piny Misri, kendo igo milome e Migdol; Memfis gi Tapanhes ni: ‘Kawuru kereu kendo ikreuru, nimar ligangla nego jogo molwori.’
१४मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
15 En angʼo momiyo jolweny magu opie piny? Ok ginyal chungʼ, nimar Jehova Nyasaye nolwargi piny.
१५तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
16 Ginichwanyre moluwore oluwore; giniluowre kuom jowetegi. Giniwachi ni, ‘Aa malo, wadog ir jowa wawegi; kendo e pinywa owuon, mabor gi ligangla mar joma thiro ji.’
१६जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
17 E kanyono giniwach ni, ‘Farao ruodh Misri en mana jakoko matek, nikech thuolo mane en-go nobaye.’”
१७त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
18 Ruoth wacho niya, “Akwongʼora gi nyinga awuon, ma en Jehova Nyasaye Maratego, ngʼato achiel nobi machalo gi Tabor e dier gode, kata ka Got Karmel mantie but nam.
१८ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
19 Pang gigi mar dhiyoe twech, un joma odak Misri, nimar Memfis nowe gunda, kendo tieke chuth maonge ngʼama nodagie.”
१९अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर. कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
20 “Misri en nyaroya maber neno, to kalabugo birone koa yo nyandwat.
२०मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
21 Jolweny mondiki chal gi nyiroye machwe. Gin bende ginilokre kendo giring kanyakla, ok giniriti, nimar odiechiengʼ mar masira biro kuomgi, kinde margi mar kum.
२१तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
22 Misri nokudhi ka thuol maringo ka jasigu masudo machiegni gi teko; giniked kode gi ledhi, mana ka chwo matongʼo yiende.”
२२मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
23 Jehova Nyasaye wacho niya, “Ginibet bungu mare, kata obedo ni oyugno kamano. Gingʼeny moloyo dede, ok nyal kwan-gi.
२३परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
24 Nyar Misri nomi wichkuot, kendo nochiwe ne jogo moa yo nyandwat.”
२४मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
25 Jehova Nyasaye Maratego, ma Nyasach Israel, wacho niya, “Achiegni kelo kum kuom Amon ma nyasach Thebes, kuom Farao, kuom Misri gi nyisechene kod ruodhi mage, kod jogo mogeno kuom Farao.
२५सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन.
26 Anachiwgi ne jogo madwaro ngimagi, ne Nebukadneza ruodh Babulon gi jotende. To kata kamano ji nodhi nyime dak Misri kaka chon,” Jehova Nyasaye owacho.
२६मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
27 “Kik iluor; yaye jatichna Jakobo; bende kik ibwogi, yaye Israel. Adiera abiro resi e piny mabor, kaachiel gi nyikwayi e piny mane otergie twech. Jakobo nodhi nyime ka nigi kwe gi dak maonge luoro, kendo onge ngʼama nobwoge.
२७परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
28 Kik iluor, yaye Jakobo jatichna, nimar an kodi. Kata obedo ni atieko ogendini duto ma asekeyou e diergi, ok anatieku chuth. Anakumu to mana gi bura makare; ok anaweu ngangʼ ma ok akumou,” Jehova Nyasaye owacho.
२८परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”

< Jeremia 46 >