< Chakruok 49 >
1 Eka Jakobo noluongo yawuote mowachonegi niya, “Biuru machiegni mondo anyisu gima biro timorenu e ndalo mabiro.
१त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”
2 “Un yawuot Jakobo chokreuru buta kendo uchik itu; winjuru Israel wuonu.
२“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.
3 “Reuben, in e wuoda makayo, kendo in e tekona kendo in e ranyisi mokwongo mar tekra, bende in giluor mangʼeny kod teko mangʼeny.
३रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.
4 Ijamuomri ka pi aora, to ok inibed gi duongʼ, nikech isedonjori, gi kitanda wuonu ma ichido.
४परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.”
5 “Simeon gi Lawi gin owete, gisetimo timbe mag lweny gi liganglagi.
५“शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे.
6 Ok nariwra kodgi e buchegi, ok nariwra kodgi e chokruogegi, nikech ka mirima omakogi to ginego ji kendo gingʼado odond dhok sa asaya ka gihero.
६माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
7 Okwongʼ mirimbgi nikech en mirima mager kendo makwiny. Anakegi e kind joka Jakobo kendo akegi e piny Israel duto.
७त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
8 “Juda, oweteni biro paki; bende inimak wasiki gi ngʼutgi, kendo oweteni biro kuloreni.
८यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.
9 Yaye Juda nyathina, ichalo nyathi sibuor, modwogo koa dwar. Obuto ka sibuor madhako monindo piny, maonge ngʼama nyalo chiewo.
९यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?
10 Ludh duongʼ ok noa e lwet Juda kata odunga mar teko ok noa e tiende, nyaka wuon loch ma biro rito ogendini duto chopi kendo luor mar ogendini nobed kuome.
१०शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.
11 Obiro tweyo pundane e kor mzabibu, enotue nyathi pundane e mzabibu moyier; kendo obiro luoko lepe gi divai makwar.
११तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे.
12 Wangʼe nobed makwar moloyo divai kendo lake nobed matar ka chak.
१२त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील. त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील.
13 “Zebulun nodag e dho nam kama yiedhi gowe, kendo tongʼ mare nodhi nyaka Sidon.
१३जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल. त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.”
14 “Isakar en punda maratego ma nindo piny e dier misikene.
१४“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे.
15 Kane oneno kaka dalane ber, kendo kaka pinyno ber, noyie tingʼo misigo modoko misumba matiyo tich matek.
१५आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.
16 “Dan nobed jangʼad bura ne joge mana kaka achiel kuom oganda Israel.
१६इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.
17 Dan nobed ka thuol man e dir yo, thuol man-gi kwiri mager e yo, ma kayo ombongʼ Faras mondo ngʼama oidhe ochwanyre magore piny gi kangʼeye.
१७तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.
18 “Aserito warruok yaye Jehova Nyasaye.
१८हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.
19 “Gad to nomonj gi jomecho, to noriembgi kolawogi matek.
१९गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.
20 “Asher nobed gi chiemo mamit; nobed gi chiemo moromo ruoth chamo.
२०आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.
21 “Naftali to en mwanda mogony, ma nywolo nyithindo mabeyo.
२१नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे. त्याचे बोलणे गोड असेल.
22 “Josef en mzabibu manyago olemo mopidh e bath thidhna, ma bedene ogawore e kor ot.
२२योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत.
23 Jodir asere nolawe matek kokecho, ne gibaye gi asere ka igi owangʼ.
२३तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.
24 Kata kamano, Nyasaye Maratego ma Nyasach Jakobo noturo atungegi, kendo Jakwath, ma Lwanda mar Israel, nochodo leche mag ogich bedegi.
२४तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते.
25 Nyasach wuonuno ma en Nyasaye Maratego, mondo ogwedhi gi gweth mag polo gi gweth mag nyak mag lowo, gi gweth mag nyithindo.
२५कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.
26 Gweth mag wuoro dongo moloyo gweth mag gode madongo machon, kendo moloyo gik mabeyo duto mag gode mosiko. Gwethgi mondo obi ne Josef, ngʼat mane opog gi jowetene.
२६तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील.
27 “Benjamin en ondiek ma kech kayo; gima osenego ochamo gokinyi, kendo godhiambo okidho matindo tindo gima osemako.”
२७बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”
28 Magi e dhout Israel apar gariyo duto kendo mae gima ne wuon-gi owachonegi kane ogwedhogi, ka omiyo moro ka moro gweth moromore kode.
२८हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.
29 Eka Jakobo nochiko yawuote kowachonegi niya, “An koro achiegni tho mondo adhi ariwra gi jowetena, yikauru but kwerena e rogo man e puoth Efron ja-Hiti.
२९मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,
30 Rogo man e puodho man Makpela, machiegni gi Mamre e piny Kanaan, ema ne Ibrahim ongʼiewo kaka kar yiko kaachiel gi puodhono duto koa kuom Efron ja-Hiti.
३०ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.
31 Kanyo ema ne oike Ibrahim kod Sara chiege, kanyo bende ema ne oikie Isaka kod Rebeka chiege, kendo kanyo ema ne aikoe Lea.
३१अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
32 Puodhono kod rogo duto mane ni e iye nongʼiew koa kuom jo-Hiti.”
३२ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”
33 Kane Jakobo osetieko wacho wechegi ni yawuote kamano nodwoko tiende e kitanda, mi chunye nochot kendo noluwo kwerene.
३३आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.