< Chakruok 28 >
1 Kuom mano Isaka noluongo Jakobo mogwedhe kendo osieme konyise niya, “Kik ikend nyar jo-Kanaan.
१इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको.
2 Chak wuoth idhi Padan Aram, e od Bethuel ma kwaru. Kend achiel kuom nyi Laban ma neru.
२ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे.
3 Mad Nyasaye Maratego gwedhi kendo inyaa mi kwanu medre nyaka ubed oganda mathoth.
३सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.
4 Mad ogwedhi kod nyikwayi kaka nogwedho Ibrahim mondo ikaw piny makoro idakieni kaka jadak, ma en piny mane Nyasaye omiyo Ibrahim.”
४तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”
5 Eka Isaka nogolo Jakobo modhi kendo Jakobo nodhi Padan Aram, ir Laban wuod Bethuel ja-Aram, owad gi Rebeka, mane min Jakobo kod Esau.
५अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन-अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला.
6 Koro Esau nofwenyo ni Isaka osegwedho Jakobo kendo oseore Padan Aram mondo odhi okend kuno. Nowinjo bende ni kane Isaka gwedho Jakobo, nochike niya, “Kik ikend nyar jo-Kanaan.”
६एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, व पदन-अरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की, इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली पत्नी करू नये.”
7 Mi Jakobo nowinjo wach min gi wuon modhi Padan Aram.
७एसावाने हे देखील पाहिले की, याकोबाने आपल्या बापाची आणि आईची आज्ञा मानली, आणि पदन-अरामास गेला.
8 Esau nofwenyo kaka Isaka wuon mare ne ok mor gi nyi jo-Kanaan.
८एसावाने पाहिले की, आपला बाप इसहाक याला कनानी मुली पसंत नाहीत.
9 Kuom mano Esau nodhi ir Ishmael mi okendo Mahalath nyamin Nebayoth mane nyar Ishmael wuod Ibrahim, mondo obed chiege ewi monde mane okwongo kendo.
९म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आपल्या स्त्रिया होत्या त्यांच्याशिवाय अब्राहामाचा मुलगा इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण महलथ ही पत्नी करून घेतली.
10 Jakobo nowuok Bersheba kendo nodhi Haran.
१०याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला.
11 Kane ochopo kamoro, nobworo gotieno nikech chiengʼ nosepodho. Nonindo kanyo moteno wiye gi kidi moro mane okwanyo kanyo.
११तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला.
12 Noleko ni oneno ngas konyono piny to wiye ochopo e polo kendo malaika mag Nyasaye ne luwe kadhi malo kendo lor piny.
१२तेव्हा त्यास स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे. तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत.
13 To ewi ngasno gi malo Jehova Nyasaye nochungʼie kawacho niya, “An Jehova Nyasaye Nyasach wuonu Ibrahim kendo Nyasach Isaka. Piny minindoeni abiro miyi gi nyikwayi.
१३पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.
14 Nyikwayi nobed mangʼeny ka kwoyo, kendo unudag koa yo podho chiengʼ nyaka wuok chiengʼ, bende koa yo nyandwat nyaka yo milambo. Ogendini duto manie piny nogwedh kokadho kuomi kod nyikwayi.
१४तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.
15 Anabed kodi kendo anariti kamoro amora ma idhiye nyaka adwoki e pinyni. Ok anaweyi nyaka chop atim mana ma asesingorani.”
१५पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जेथे कोठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन.”
16 Kane Jakobo ochiewo oa e nindo, noparo niya, “Adier Jehova Nyasaye nika kendo ne ok angʼeyo.”
१६मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते.”
17 Luoro nomake mi owacho niya, “Ma kama lich manade! Nyaka bedni ma en od Nyasaye; ma en dhoranga polo.”
१७त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, “हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे.”
18 Kinyne gokinyi mangʼich Jakobo nokawo kidi mane otenogo wiye kendo nochunge ka siro mi oolo mo e wiye.
१८याकोब मोठ्या पहाटे लवकर उठला आणि त्याने उशास घेतलेला धोंडा घेतला. त्याने तो स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर तेल ओतले.
19 Nochako kanyo ni Bethel to kinde mokwongo nying dalano niluongo ni Luz.
१९त्या ठिकाणाचे नाव लूज होते, परंतु त्याने त्याचे नाव बेथेल ठेवले.
20 Eka Jakobo nokwongʼore kawacho niya, “Ka Nyasaye nobed koda kendo norita e wuodhani ma adhiye kendo miya chiemo ma achamo kod lewni ma arwako,
२०मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,
21 mi anadogi maber e od wuora eka Jehova Nyasaye nobed Nyasacha,
२१आणि मी सुरक्षित माझ्या वडिलाच्या घरी परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल.
22 kendo kidi ma asechungo kaka sironi, nobed od Nyasaye kendo duto ma imiya, namiyi achiel kuom apar.”
२२मग मी हा जो धोंडा या ठिकाणी स्तंभ म्हणून उभा केला आहे तो पवित्र धोंडा होईल, तो देवाचे घर होईल. जे सर्व तू मला देशील, त्याचा दहावा भाग मी तुला खचित परत देईन.”