< 1 Ruodhi 13 >

1 Kaluwore gi wach Jehova Nyasaye, ngʼat Nyasaye nobiro koa Juda modhi Bethel e kinde mane Jeroboam ochungʼ e but kendo mar misango mondo ochiw misango.
परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या मनुष्यास) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
2 Noywak kokwongʼo kendo misangono kaluwore gi wach Jehova Nyasaye: “Yaye kendo mar misango! Yaye kendo mar misango! Ma e gima Jehova Nyasaye wacho, ‘Wuowi miluongo ni Josia ibiro nywol e od Daudi. Kuomi e nochiwe jodolo mag kuonde motingʼore makoro chiwo misengini kuomi, kendo choke dhano ibiro wangʼ kuomi.’”
परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
3 Chiengʼ nogono ngʼat Nyasayeno nochiwo ranyisi: “Ma e ranyisi ma Jehova Nyasaye osechiwo: Kendo mar misango biro barore diere ariyo kendo buru man kuome biro pukore oko.”
हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांस खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
4 Kane ruoth Jeroboam owinjo kaka ngʼat Nyasayeno noywak kokwongʼo kendo mar misango man Bethel norieyo bade kowuok e kendo mar misango kowacho niya, “Makeuru!” To bade mane orieyono kochomo ngʼat Nyasayeno notal mane ok onyal dole.
राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना
5 Kendo mar misangono bende nobarore diere ariyo kendo buru mage nopukore oko kaluwore gi ranyisi mane ochiw gi ngʼat Nyasaye kod Wach Jehova Nyasaye.
तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती.
6 Eka ruoth nowacho ni ngʼat Nyasayeno niya, “Kwana Jehova Nyasaye ma Nyasachi kendo lamna mondo lweta odog kare.” Kamano ngʼat Nyasayeno nokwayone Jehova Nyasaye kendo lwet ruoth nodok kare kaka ne en.
तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
7 Ruoth nowacho ni ngʼat Nyasayeno niya, “Wadhi oda mondo iyud gimoro icham kendo abiro miyi mich.”
राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
8 To ngʼat Nyasaye nodwoko ruoth niya, “Kata ne bed mana ni inyalo miya nus mwanduni duto ok anadhi kodi kata chamo chiemo kata modho pi ka.
पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
9 Nimar nochika gi wach Jehova Nyasaye ni, ‘Kik ichiem kata modho pi kata dok gi yo mane ibirogo.’”
काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.”
10 Kamano nokawo yo machielo mine ok odok gi yo mane obirogo Bethel.
१०त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
11 Koro ne nitie janabi moro moti mane odak Bethel ma yawuote nobiro mowachone duto mane ngʼat Nyasayeno otimo kanyo chiengʼno, bende neginyiso wuon-gi gima nowacho ni ruoth.
११बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
12 Wuon-gi nopenjogi niya, “Noluwo yo mane?” To yawuote nonyise yo mane ngʼat Nyasaye moa Juda noluwo.
१२तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
13 Kamano nowacho ni yawuote niya, “Gawnauru punda.” Kane gisegawone punda, noidhe
१३त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.
14 mi noluwo bangʼ ngʼat Nyasayeno. Noyude kobet e tiend yiend ober mopenje niya, “In e ngʼat Nyasaye mane oa Juda?” Nodwoke niya, “Ee en an.”
१४हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्यास विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा मनुष्य?” संदेष्ट्याने यावर होकार दिला.
15 Kamano janabi nowachone niya, “Wadhi dala mondo ichiem.”
१५तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
16 Ngʼat Nyasayeno nowacho niya, “Ok anyal lokora ma adog kodi dala kata chiemo kata modho pi kodi ka.
१६पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.
17 Osenyisa kaluwore gi wach Jehova Nyasaye ni, ‘Kik ichiem kata kik imodh pi kanyo kata idog gi yo mane ibirogo.’”
१७तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
18 To janabi motino nodwoke niya, “An bende an janabi mana kaka in. Kendo malaika nowuoyo koda gi wach Jehova Nyasaye kawachona ni, ‘Duog kode e odi mondo mi ochiem kendo omodh pi.’” To kata kamano nowuonde.
१८यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
19 Kamano ngʼat Nyasaye noduogo kode mochiemo kendo metho e ode.
१९तेव्हा तो देवाचा मनुष्य वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
20 Kane gibedo e mesa gichiemo, wach Jehova Nyasaye nobiro ni janabi moticha mane odwogo chien.
२०ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.
21 Noywak ne ngʼat Nyasaye mane oa Juda mowacho niya, “Ma e gima Jehova Nyasaye wacho: ‘Isedagi winjo wach Jehova Nyasaye kendo ok iserito chik mane Jehova Nyasaye ma Nyasachi omiyi.
२१वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
22 Nidwogo chien mi ichamo makati kendo imodho pi kama nowachoni ni kik ichiemie kata modhoe pi. Omiyo ringri ok enoyiki e kar yiko mar kwereni.’”
२२येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
23 Kane ngʼat Nyasayeno otieko chiemo kendo metho, janabi mane odwoge chienno nogawone pundane.
२३या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा मनुष्य) निघाला.
24 Kane en e yore odhi, sibuor noromo kode e yo monege kendo ringe nowit piny e yo, ka punda kod sibuor ochungʼ bute.
२४परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारुन टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
25 Jomoko mane kadho machiegni noneno ringreno kowit piny kanyo, ka sibuor ochungʼ but ringruokno kendo negidhi mi gilando wachno e dala mane janabi moticha odakie.
२५इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
26 Kane janabi mane odwoge chien e wuodhe owinjo ma nowacho niya, “En ngʼat Nyasaye mane ochayo wach Nyasaye. Jehova Nyasaye osechiwe ni sibuor mosekidhe kendo onege mana kaka wach Jehova Nyasaye nosesieme.”
२६वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.”
27 Janabi nowachone yawuote niya, “Gawnauru punda kendo negitimo kamano.”
२७मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
28 Eka nowuok modhi oyudo ringruokno kowit piny e yo ka punda gi sibuor ochungʼ bute. Sibuor ne ok ochamo ngʼatno kata kidho punda.
२८तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
29 Kamano janabino nokawo ringre ngʼat Nyasayeno mokete e ngʼe punda kendo nodwoge e dalane mondo oywage kendo oike.
२९वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
30 Eka noketo ringreno e kar bure owuon mi giywage kagiwacho niya, “Yaye, owadwa!”
३०त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
31 Bangʼ yike nowacho ni yawuote niya, “Katho to ikauru e bur kama oyikie ngʼat Nyasayeni; keturu chokena but chokene.
३१मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या.
32 Nikech wach mane owacho kuluworegi wach Jehova Nyasaye kuom kendo mar misango man Bethel kendo kwongʼ mane okwongʼogo kuonde duto motingʼore malo mitimoe misango manie dala man Samaria biro chopo kare.”
३२परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
33 Kata mana bangʼ ma, Jeroboam ne ok oloko yorene maricho to nomedo yiero jodolo koa kuom ji mopogore opogore mondo oti kuonde motingʼore. Ngʼato angʼata mane dwaro bedo jadolo nowalo ni kuonde motingʼore.
३३राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो याजक म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्यास याजक बनता येई.
34 Ma e richo mar od Jeroboam mane omiyo opodho kendo kelone kethruok e wangʼ piny.
३४या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.

< 1 Ruodhi 13 >