< Salme 141 >
1 (En Salme af David.) HERRE, jeg råber til dig, il mig til hjælp, hør min Røst, når jeg råber til dig;
१दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.
2 som Røgoffer, gælde for dig min Bøn, mine løftede Hænder som Aftenoffer!
२माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
3 HERRE, sæt Vagt ved min Mund, vogt mine Læbers Dør!
३हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.
4 Bøj ikke mit Hjerte til ondt, til at gøre gudløs Gerning sammen med Udådsmænd; deres lækre Mad vil jeg ikke smage.
४अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस.
5 Slår en retfærdig mig, så er det Kærlighed; revser han mig, er det Olie for Hovedet, ej skal mit Hoved vise det fra sig, end sætter jeg min Bøn imod deres Ondskab.
५नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत.
6 Ned ad Klippens Skrænter skal Dommerne hos dem styrtes, og de skal høre, at mine Ord er liflige.
६त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत.
7 Som når man pløjer Jorden i Furer, spredes vore Ben ved Dødsrigets Gab. (Sheol )
७जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. (Sheol )
8 Dog, mine Øjne er rettet på dig, o HERRE, Herre, på dig forlader jeg mig, giv ikke mit Liv til Pris!
८तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस.
9 Vogt mig for Fælden, de stiller for mig, og Udådsmændenes Snarer;
९त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.
10 lad de gudløse falde i egne Gram, medens jeg går uskadt videre.
१०दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन.