< Salme 112 >
1 Halleluja! Salig er den, der frygter Herren og ret har lyst til hans bud!
१परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
2 Hans Æt bliver mægtig på Jord, den oprigtiges Slægt velsignes;
२त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील.
3 Velstand og Rigdom er i hans Hus, hans Retfærdighed varer evindelig.
३धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते.
4 For den oprigtige oprinder Lys i Mørke; han er mild, barmhjertig retfærdig.
४धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
5 Salig den, der ynkes og låner ud og styrer sine Sager med Ret;
५जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
6 thi han rokkes aldrig i Evighed, den retfærdige ihukommes for evigt;
६कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
7 han frygter ikke for onde Tidender, hans Hjerte er trøstigt i Tillid, til HERREN;
७तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
8 fast er hans Hjerte og uden Frygt, indtil han skuer sine Fjender med Fryd;
८त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
9 til fattige deler han rundhåndet ud, hans Retfærdighed varer evindelig; med Ære løfter hans Horn sig.
९तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.
10 Den gudløse ser det og græmmer sig, skærer Tænder og går til Grunde; de gudløses Attrå bliver til intet.
१०दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.