< Salme 111 >
1 Halleluja! jeg takker Herren af hele mit hjerte i oprigtiges kreds og i menighed!
१परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
2 Store er Herrens gerninger, gennemtænkte til bunds.
२परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
3 Hans værk er højhed og herlighed, hans retfærd bliver til evig tid.
३त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
4 Han har sørget for, at hans undere mindes, nådig og barmhjertig er Herren.
४त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
5 Dem, der frygter ham, giver han føde, han kommer for evigt sin pagt i hu.
५तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
6 Han viste sit folk sine vældige gerninger, da han gav dem folkenes eje.
६त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
7 Hans hænders værk er sandhed og ret, man kan lide på alle hans bud;
७त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
8 de står i al evighed fast, udført i sandhed og retsind.
८ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
9 Han sendte sit folk udløsning, stifted sin pagt for evigt. Helligt og frygteligt er hans navn.
९त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
10 Herrens frygt er visdoms begyndelse; forstandig er hver, som øver den. Evigt varer hans pris!
१०परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.