< Josua 16 >

1 For Josefs Sønner faldt Loddet således: Mod Øst går Grænsen fra Jordan ved Jeriko, ved Jerikos Vande, op gennem Ørkenen, som fra Jeriko strækker sig op i Bjergland, et til Betel;
योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते.
2 fra Betel fortsætter den videre til Arkiternes Landemærke, til Atarot,
मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.
3 og strækker sig nedad mod Vest til Ja Detiternes Landemærke, til Nedre Bet Horons Landemærke og til Gezer og ender ved Havet.
पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
4 Og Josefs Sønner, Manasse og Efraim, fik Arvelodder.
याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले.
5 Efraimiternes Landemærke efter deres Slægter var følgende: Grænsen for deres Arvelod er mod Øst Atarot Addar og går til Øvre Bet Horon;
एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.
6 derpå går Grænsen ud til Havet. Mod Nord er Grænsen Mikmetat; Grænsen går så mod Øst til Ta'anat Sjilo, løber videre østen om Janoa,
आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली.
7 strækker sig så fra Janoa ned til Atarot og Na'ara, støder op til Jeriko og ender ved Jordan.
नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.
8 Fra Tappua går Grænsen mod Vest til Kanabækken og ender ved Havet. Det er Efraimiternes Stammes Arvelod efter deres Slægter.
तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.
9 Dertil kommer de Byer, som udskiltes til Efraimiterne inden for Manassiternes Arvelod, alle Byerne med Landsbyer.
आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती;
10 Men de fordrev ikke Kana'anæerne, som boede i Gezer, og således er Kana'anæerne blevet boende midt i Efraim indtil den Dag i Dag, idet de siden blev Hoveriarbejdere.
१०तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.

< Josua 16 >