< Job 33 >
1 Men hør nu Job, på min Tale og lyt til alle mine Ord!
१“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
2 Se, jeg har åbnet min Mund, min Tunge taler i Ganen;
२पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
3 mine Ord er talt af oprigtigt Hjerte, mine Læber fører lutret Tale.
३माझे शब्दच माझ्या अंत: करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
4 Guds Ånd har skabt mig, den Almægtiges Ånde har givet mig Liv.
४देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
5 Svar mig, i Fald du kan, rust dig imod mig, mød frem!
५तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
6 Se, jeg er din Lige for Gud, også jeg er taget af Ler;
६पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
7 Rædsel for mig skal ikke skræmme dig, min Hånd skal ej ligge tyngende på dig.
७पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही.
8 Dog, det har du sagt i mit Påhør, jeg hørte så lydende Ord:
८तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
9 "Jeg er ren og uden Brøde, lydeløs, uden Skyld;
९‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
10 men han søger Påskud imod mig, regner mig for sin Fjende;
१०पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
11 han lægger mine Fødder i Blokken, vogter på alle mine Veje."
११देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
12 Se, der har du Uret, det er mit Svar, thi Gud er større end Mennesket.
१२पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
13 Hvorfor tvistes du med ham, fordi han ej svarer på dine Ord?
१३तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
14 Thi på een Måde taler Gud, ja på to, men man ænser det ikke:
१४देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
15 I Drømme, i natligt Syn, når Dvale falder på Mennesker, når de slumrende hviler på Lejet;
१५देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
16 da åbner han Menneskers Øre, gør dem angst med Skræmmebilleder
१६नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
17 for at få Mennessket bort fra Uret og udrydde Hovmod af Manden,
१७मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
18 holde hans Sjæl fra Graven, hans Liv fra Våbendød.
१८देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
19 Eller han revses med Smerter på Lejet, uafbrudt sfår der Hamp i hans Ben;
१९मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु: ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
20 Livet i ham væmmes ved Brød og hans Sjæl ved lækker Mad
२०नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
21 hans Kød svinder hen, så det ikke ses, hans Knogler, som før ikke sås, bliver blottet;
२१त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
22 hans Sjæl kommer Graven nær, hans Liv de dræbende Magter.
२२खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
23 Hvis da en Engel er på hans Side, een blandt de tusind Talsmænd, som varsler Mennesket Tugt,
२३परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
24 og den viser ham Nåde og siger: "Fri ham fra at synke i Graven, Løsepenge har jeg fået!"
२४आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
25 da svulmer hans Legem af Friskhed, han oplever atter sin Ungdom.
२५मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
26 Han beder til Gud, og han er ham nådig, han skuer med Jubel hans Åsyn, fortæller Mennesker om sin Frelse.
२६तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
27 Han synger det ud for Folk: "Jeg synded og krænkede Retten og fik dog ej Løn som forskyldt!
२७नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
28 Han har friet min Sjæl fra at fare i Grav, mit Liv ser Lyset med Lyst!"
२८त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
29 Se, alle disse Ting gør Gud to Gange, ja tre med Mennesket
२९पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा,
30 for at redde hans Sjæl fra Graven, så han skuer Livets Lys!
३०त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
31 Lyt til og hør mig, Job, ti stille, så jeg kan tale!
३१ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
32 Har du noget at sige, så svar mig, tal, thi gerne gav jeg dig Ret;
३२पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
33 hvis ikke, så høre du på mig, ti stille, at jeg kan lære dig Visdom!
३३परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”