< Esajas 51 >
1 Hør mig, I, som jager efter Retfærd, som søger HERREN! Se til Klippen, I huggedes af, til Gruben, af hvilken I brødes,
१“जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझे ऐका! ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे, आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहावे.
2 se til eders Fader Abraham, til Sara, der fødte eder: Da jeg kaldte ham, var han kun een, jeg velsigned ham, gjorde ham til mange.
२अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.”
3 Thi HERREN trøster Zion, trøster alle dets Tomter, han gør dets Ørk som Eden, dets Ødemark som HERRENs Have; der skal findes Fryd og Glæde, Lovsang og Strengespil.
३होय, परमेश्वर सियोनेचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. तो त्याचे रान एदेनाच्या बागेसारखे आणि त्याचे वाळवंट तो यार्देन नदीच्या जवळ, परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे. आनंद व हर्ष, आभारप्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील.
4 I Folkeslag, lyt til mig, I Folkefærd, lån mig Øre! Thi Lov går ud fra mig, min Ret som Folkeslags Lys;
४“माझ्या लोकांनो, माझ्या कडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो माझ्या कडे आपला कान लावा, कारण नियम माझ्यापासूनच निघेल, आणि मी माझे न्यायीपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन.
5 min Retfærd nærmer sig hastigt, min Frelse oprinder, mine Arme bringer Folkeslag Ret; fjerne Strande bier på mig og længes efter min Arm.
५मी न्यायीपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्यायनिवाडा करतील. द्वीपे माझी वाट पाहतील, आणि माझ्या बाहूंवर भरवसा ठेवतील.
6 Løft eders Øjne mod Himlen og se på Jorden hernede! Thi Himlen skal svinde som Røg, Jorden som en opslidt Klædning, dens Beboere skal dø som Myg. Men min Frelse varer evigt, min Retfærd ophører aldrig.
६तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा. धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील, परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही.
7 Hør mig, I, som kender Retfærd, du Folk med min Lov i dit Hjerte, frygt ej Menneskers Hån, vær ikke ræd for deres Spot!
७ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका! मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका.
8 Som en Klædning skal Møl fortære dem, Orm fortære dem som Uld, men min Retfærd varer evigt, min Frelse fra Slægt til Slægt.
८कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल, पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.”
9 Vågn op, vågn op, HERRENs Arm, og ifør dig Styrke, vågn op som i henfarne Dage, i Urtidens Slægter! Mon du ej kløvede Rahab, gennembored Dragen,
९परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो. ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय?
10 mon du ej udtørred Havet, Stordybets Vande, gjorde Havets dyb til en Vej, hvor de genløste gik?
१०समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. ज्याने मोठ्या डोहातील पाणी सुकवले आणि समुद्रातील अति सखोल भागाचा रस्ता केला, ह्यासाठी की खंडणी भरून सोडवलेले पार होतील, तो तूच नाही काय?
11 HERRENs forløste vender hjem, de drager til Zion med Jubel med evig Glæde om Issen; Fryd og Glæde får de, Sorg og Suk skal fly.
११परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.
12 Jeg, jeg er eders Trøster, hvem er da du, at du frygter dødelige, jordiske Mennesker, der bliver som Græs,
१२“मी, मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो, मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे? जे मृत्यू पावणारी आहेत, मनुष्यांचे मुले, गवतासारखा केली गेली आहेत.”
13 at du glemmer HERREN, din Skaber, der udspændte Himlen og grundfæsted Jorden, at du altid Dagen lang frygter for Undertrykkerens Vrede. Så snart han vil til at lægge øde, hvor er da Undertrykkerens Vrede?
१३ज्याने स्वर्गे पसरवली, ज्याने पृथ्वीचा पाया घातला, तो परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, त्यास तू का विसरतेस? पीडक जणू काय नाश करायला सिद्ध आहे, म्हणून तू प्रत्येक दिवशी सारखी हताश असते, परंतू पीडणाऱ्याचा क्रोध कोठे आहे?
14 Snart skal den krumsluttede løses og ikke dø og synke i Graven eller mangle Brød,
१४जो खाली वाकलेला आहे, परमेश्वर त्यास सोडण्यास त्वरा करेल, तो मरून खाचेंत पाडला जाणार नाही, आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही.
15 så sandt jeg er HERREN din Gud, som rører Havet, så Bølgerne bruser, den, hvis Navn er Hærskarers HERRE.
१५“कारण मी, परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात.” सेनाधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.
16 jeg lægger mine Ord i din Mund og gemmer dig under min Hånds Skygge for at udspænde Himmelen og grundfæste Jorden og sige til Zion: "Du er mit Folk."
१६मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे. अशासाठी की, मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा, आणि तू माझी प्रजा आहे, असे सियोनेला म्हणावे.
17 Vågn op, vågn op, stå op, Jerusalem, som af HERRENs Hånd fik rakt hans Vredes Bæger og tømte den berusende Kalk til sidste Dråbe.
१७ऊठ, ऊठ, यरूशलेमे, जागी हो. तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे. तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे.
18 Af alle de Børn, hun fødte, ledte hende ingen, af alle de Børn, hun fostred, greb ingen hendes Hånd.
१८ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तिला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही, आणि ज्या मुलांना तिने वाढवीले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही.
19 To Ting timedes dig hvo ynker dig vel? Vold og Våde, Hunger og Sværd - hvo trøster dig?
१९ही दोन संकटे तुझ्यावर आली, तुझ्याबरोबर कोण दु: ख करणार? उजाडी व नाश आणि दुष्काळ व तलवार, कोण तुझे सांत्वन करणार?
20 Ved alle Gadehjørner lå dine Sønner i Afmagt som i Garn Antiloper, fyldte med HERRENs Vrede, med Trusler fra din Gud.
२०तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय. परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत.
21 Hør derfor, du arme, drukken, men ikke af Vin:
२१पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही,
22 Så siger din Herre, HERREN, din Gud, der strider for sit Folk: Se, jeg tager den berusende Kalk fra din Hånd, aldrig mer skal du drikke min Vredes Bæger;
२२तुझा देव, प्रभू परमेश्वर, जो आपल्या कैवार घेतो, तो असे म्हणतो, मी थरकापाचा प्याला, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे. तो तू पुन्हा पिणार नाहीस,
23 og jeg rækker det til dine Plagere, dem, som bød dig: "Bøj dig, så vi kan gå over!" og du gjorde din Ryg til Gulv, til Gade for Vandringsmænd.
२३आता आम्ही तुझ्यावरून चालावे म्हणून आडवा पड, असे जे तुझे पीडणारे तुझ्या जीवाला म्हणाले आहेत, त्यांच्या हाती मी तो ठेवीन, आणि चालणाऱ्यांसाठी तू आपले शरीर भूमीप्रमाणे, रस्त्याप्रमाणे टाकून ठेवले आहे.