< 2 Samuel 22 >

1 David sang HERREN denne Sang, dengang HERREN havde frelst ham af alle hans Fjenders og af Sauls Hånd.
शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले;
2 Han sang: "HERRE, min Klippe, min Borg, min Befrier,
परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार.
3 min Gud, mit Bjerg, hvortil jeg tyr, mit Skjold, mit Frelseshorn, mit Værn, min Tilflugt, min Frelser, som frelser mig fra Vold!
“तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
4 Jeg påkalder HERREN, den Højlovede, og frelses fra mine Fjender.
त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
5 Dødens Brændinger omsluttede mig, Ødelæggelsens Strømme forfærdede mig,
शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
6 Dødsrigets Reb omspændte mig, Dødens Snarer faldt over mig; (Sheol h7585)
अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. (Sheol h7585)
7 i min Vånde påkaldte jeg HERREN og råbte til min Gud. Han hørte min Røst fra sin Helligdom, mit Råb fandt ind til hans Ører!
तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
8 Da rystede Jorden og skjalv, Himlens Grundvolde bæved og rysted, thi hans Vrede blussede op.
तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला, कारण देवाचा कोप झाला होता.
9 Røg for ud af hans Næse, fortærende Ild af hans Mund, Gløder gnistrede fra ham.
त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
10 Han sænkede Himlen, steg ned med Skymulm under sine Fødder;
१०आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला.
11 båret af Keruber fløj han, svæved på Vindens Vinger;
११करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता.
12 han omgav sig med Mulm som en Bolig, mørke Vandmasser, vandfyldte Skyer.
१२परमेश्वराने दाट काळे ढग स्वत: भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.
13 Fra Glansen foran ham for der Hagl og Ildgløder ud.
१३त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले.
14 HERREN tordned fra Himlen, den Højeste lod høre sin Røst;
१४परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला.
15 han udslynged Pile, adsplittede dem, lod Lynene funkle og skræmmede dem.
१५त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले.
16 Havets Bund kom til Syne, Jordens Grundvolde blottedes ved HERRENs Trusel, for hans Vredes Pust.
१६परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
17 Han udrakte Hånden fra det høje og greb mig, drog mig op af de vældige Vande,
१७मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
18 frelste mig fra mine mægtige Fjender, fra mine Avindsmænd; de var mig for stærke.
१८शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले.
19 På min Ulykkes Dag faldt de over mig, men HERREN blev mig et Værn.
१९मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला.
20 Han førte mig ud i åbent Land, han frelste mig, thi han havde Behag i mig.
२०परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
21 HERREN gengældte mig efter min Retfærd, lønned mig efter mine Hænders Uskyld;
२१मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
22 thi jeg holdt mig til HERRENs Veje, svigted i Gudløshed ikke min Gud;
२२कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.
23 hans Bud stod mig alle for Øje, jeg veg ikke fra hans Love.
२३परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
24 Ustraffelig var jeg for ham og vogtede mig for Brøde.
२४मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत: ला अलिप्त राखले.
25 HERREN lønned mig efter min Retfærd, mine Hænders Uskyld, som var ham for Øje!
२५तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
26 Du viser dig from mod den fromme, retsindig mod den retsindige,
२६एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
27 du viser dig ren mod den rene og vrang mod den svigefulde.
२७हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस.
28 De arme giver du Frelse, hovmodiges Øjne Skam!
२८परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.
29 Ja, du er min Lampe, HERRE! HERREN opklarer mit Mørke.
२९परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
30 Thi ved din Hjælp søndrer jeg Mure, ved min Guds Hjælp springer jeg over Volde.
३०परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.
31 Fuldkommen er Guds Vej, lutret er HERRENs Ord. Han er et Skjold for alle, der sætter deres Lid til ham.
३१देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
32 Ja, hvem er Gud uden HERREN, hvem er en Klippe uden vor Gud,
३२या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
33 den Gud, der omgjorded mig med Kraft, jævnede Vejen for mig,
३३देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो.
34 gjorde mine Fødder som Hindens og gav mig Fodfæste på Højne,
३४देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
35 oplærte min Hånd til Krig, så mine Arme spændte Kobberbuen?
३५युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात.
36 Du gav mig din Frelses Skjold, din Nedladelse gjorde mig stor;
३६देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
37 du skaffede Plads for mine Skridt, mine Ankler vaklede ikke.
३७माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
38 Jeg jog mine Fjender, indhentede dem, vendte først om, da de var gjort til intet,
३८शत्रूंचा नि: पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
39 slog dem ned, så de ej kunde rejse sig, men lå faldne under min Fod.
३९त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
40 Du omgjorded mig med Kraft til Kampen, mine Modstandere tvang du i Knæ for mig;
४०देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
41 du slog mine Fjender på Flugt mine Avindsmænd ryddede jeg af Vejen.
४१त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.
42 De råbte, men ingen hjalp, til HERREN, han svared dem ikke.
४२शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
43 Jeg knuste dem som Jordens Støv, som Gadeskarn tramped jeg på dem.
४३माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
44 Du friede mig af Folkekampe, du satte mig til Folkeslags Høvding; nu tjener mig ukendte Folk;
४४माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
45 Udlandets Sønner kryber for mig; blot de hører om mig, lyder de mig:
४५आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
46 Udlandets Sønner vansmægter, kommer skælvende frem af deres Skjul.
४६भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
47 HERREN lever, højlovet min Klippe, ophøjet være min Frelses Gud,
४७परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
48 den Gud, som giver mig Hævn, lægger Folkeslag under min Fod
४८या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले.
49 og frier mig fra mine Fjender! Du ophøjer mig over mine Modstandere, fra Voldsmænd frelser du mig.
४९देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
50 HERRE, derfor priser jeg dig blandt Folkene og lovsynger dit Navn,
५०हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
51 du, som kraftig hjælper din Konge og viser din Salvede Miskundhed. David og hans Æt evindelig.
५१परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.”

< 2 Samuel 22 >