< 4 Mosebog 17 >

1 Og HERREN talede til Moses og sagde:
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 »Sig til Israeliterne, at Øversterne for Fædrenehusene skal give dig en Stav for hvert Fædrenehus, tolv Stave i alt, og skriv saa hver enkelts Navn paa hans Stav
इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्याकडून बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक मनुष्याचे नाव त्यांच्या त्यांच्या काठीवर लिही.
3 og skriv Arons Navn paa Levis Stav, thi hvert Overhoved for Fædrenehusene skal have een Stav.
“लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.
4 Læg dem saa ind i Aabenbaringsteltet foran Vidnesbyrdet, der, hvor jeg aabenbarer mig for dig.
या काठ्या दर्शनमंडपामध्ये आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.
5 Den Mand, jeg udvælger, hans Stav skal da grønnes; saaledes vil jeg bringe Israeliternes Knurren imod eder til Tavshed, saa jeg kan blive fri for den.«
खरा याजक म्हणून मी एका मनुष्याची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”
6 Moses sagde nu dette til Israeliterne, og alle deres Øverster gav ham en Stav, saa der blev en Stav for hver Øverste efter deres Fædrenehuse, tolv Stave i alt, og Arons Stav var imellem Stavene.
म्हणून मोशे इस्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्यास काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती.
7 Derpaa lagde Moses Stavene hen foran HERRENS Aasyn i Vidnesbyrdets Telt.
मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.
8 Da Moses næste Dag kom ind i Vidnesbyrdets Telt, se, da var Arons Stav, Staven for Levis Hus, grønnedes; den havde sat Skud, var kommet i Blomst og bar modne Mandler.
दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्यास दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.
9 Da tog Moses Stavene bort fra HERRENS Aasyn og bar dem ud til Israeliterne, og de saa paa dem og tog hver sin Stav.
म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.
10 Men HERREN sagde til Moses: »Læg Arons Stav tilbage foran Vidnesbyrdet, for at den kan opbevares til Tegn for de genstridige, og gør Ende paa deres Knurren, saa jeg kan blive fri for den, at de ikke skal dø!«
१०नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत.
11 Og Moses gjorde som HERREN havde paalagt ham; saaledes gjorde han.
११मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
12 Men Israeliterne sagde til Moses: »Se, vi omkommer, det er ude med os, det er ude med os alle sammen!
१२इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे.
13 Enhver, der kommer HERRENS Bolig nær, dør. Skal vi da virkelig omkomme alle sammen?«
१३जो कोणी मनुष्य नुसता परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वाचा नाश होणार की काय?”

< 4 Mosebog 17 >