< Josua 13 >
1 Da Josua var blevet gammel og til Aars, sagde HERREN til ham: »Du er blevet gammel og til Aars, og der er endnu saare meget tilbage af Landet at indtage.
१आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
2 Dette er det Land, som er tilbage: Hele Filisternes Landomraade og alle Gesjuriterne,
२हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
3 Landet fra Sjihor østen for Ægypten indtil Ekrons Landemærke i Nord — det regnes til Kana'anæerne — de fem Filisterfyrster i Gaza, Asdod, Askalon, Gat og Ekron, desuden Avviterne
३मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
4 mod Syd, hele Kana'anæerlandet fra Meara, som tilhører Zidonierne, indtil Afek og til Amoriternes Landemærke,
४दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
5 og det Land, som mod Øst grænser til Libanon fra Ba'al-Gad ved Hermonbjergets Fod til Egnen hen imod Hamat.
५आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
6 Alle Indbyggerne i Bjerglandet fra Libanon til Misrefot Majim, alle Zidonierne, vil jeg drive bort foran Israeliterne. Tildel kun Israel det som Ejendom, saaledes som jeg har paalagt dig.
६लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.
7 Udskift derfor dette Land som Ejendom til de halvtiende Stammer.« Manasses halve Stamme
७तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
8 saavel som Rubeniterne og Gaditerne havde nemlig faaet deres Arvelod, som Moses gav dem hinsides Jordan, paa Østsiden, saaledes som HERRENS Tjener Moses gav dem,
८मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
9 fra Aroer ved Arnonflodens Bred og Byen midt nede i Dalen, hele Højsletten fra Medeba til Dibon,
९आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;
10 alle de Byer, som havde tilhørt Amoriterkongen Sihon, der herskede i Hesjbon, indtil Ammoniternes Landemærke,
१०आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
11 fremdeles Gilead og Gesjuriternes og Ma'akatiternes Landemærke, hele Hermonbjerget og hele Basan indtil Salka,
११गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
12 hele det Rige, der havde tilhørt Og af Basan, som herskede i Asjtarot og Edre'i, den sidste, der var tilbage af Refaiterne; Moses havde overvundet dem alle og drevet dem bort.
१२म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
13 Men Israeliterne drev ikke Gesjuriterne og Ma'akatiterne bort, saa at Gesjur og Ma'akat bor iblandt Israel den Dag i Dag.
१३तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
14 Kun Levis Stamme gav han ingen Arvelod; HERREN, Israels Gud, er hans Arvelod, saaledes som han tilsagde ham.
१४लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; “इस्राएलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे,” तेच त्यांचे वतन आहे;
15 Moses gav Rubeniternes Stamme Land, Slægt for Slægt,
१५परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
16 og de fik deres Omraade fra Aroer ved Arnonflodens Bred og Byen midt nede i Dalen, hele Højsletten indtil
१६आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
17 Hesjbon og alle de Byer, som ligger paa Højsletten, Dibon, Bamot-Ba'al, Bet-Ba'al-Meon,
१७हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ-बआल व बेथ-बालमोन;
18 Jaza, Kedemot, Mefa'at,
१८आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
19 Kirjatajim, Sibma, Zeret-Sjahar paa Dalbjerget,
१९आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
20 Bet-Peor ved Pisgas Skrænter. Bet-Jesjimot
२०बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
21 og alle de andre Byer paa Højsletten og hele det Rige, der havde tilhørt Amoriterkongen Sihon, som herskede i Hesjbon, hvem Moses havde overvundet tillige med Midjans Fyrster Evi, Rekem, Zur, Hur og Reba, der var Sihons Lydkonger og boede i Landet;
२१आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.
22 ogsaa Sandsigeren Bileam, Beors Søn, havde Israeliterne dræbt med Sværdet sammen med de andre af dem, der blev slaaet ihjel.
२२आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.
23 Rubeniternes Grænse blev Jordan; den var Grænseskel. Det var Rubeniternes Arvelod efter deres Slægter, de nævnte Byer med Landsbyer.
२३तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.
24 Og Moses gav Gads Stamme, Gaditerne, Land, Slægt for Slægt,
२४गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
25 og de fik følgende Landomraade: Ja'zer og alle Byerne i Gilead og Halvdelen af Ammoniternes Land indtil Aroer, som ligger østen for Rabba,
२५आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
26 og Landet fra Hesjbon til Ramat-Mizpe og Betonim, og fra Mahanajim til Lodebars Landemærke;
२६आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;
27 og i Lavningen Bet-Haram, Bet-Nimra, Sukkot og Zafon, Resten af Kong Sihon af Hesjbons Rige, med Jordan til Grænse, indtil Enden af Kinnerets Sø, hinsides Jordan, paa Østsiden.
२७आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
28 Det var Gaditernes Arvelod efter deres Slægter: de nævnte Byer med Landsbyer.
२८गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
29 Og Moses gav Manasses halve Stamme Land, Slægt for Slægt;
२९आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
30 og deres Landomraade strakte sig fra Mahanajim over hele Basan, hele Kong Og af Basans Rige og alle Ja'irs Teltbyer, som ligger i Basan, tresindstyve Byer,
३०की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;
31 Halvdelen af Gilead og Asjtarot og Edre'i, Ogs Kongsbyer i Basan; det gav han Manasses Søn Makirs Sønner, Halvdelen af Makirs Sønner, Slægt for Slægt.
३१आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
32 Det er alt, hvad Moses udskiftede paa Moabs Sletter hinsides Jordan over for Jeriko, paa Østsiden.
३२यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.
33 Men Levis Stamme gav Moses ingen Arvelod; HERREN, Israels Gud, er deres Arvelod, saaledes som han tilsagde dem.
३३लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.