< Johannes 19 >
1 Nu tog da Pilatus Jesus og lod ham hudstryge.
१नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले.
2 Og Stridsmændene flettede en Krone af Torne og satte den paa hans Hoved og kastede en Purpurkappe om ham, og de gik hen til ham og sagde:
२तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला.
3 „Hil være dig, du Jødernes Konge!‟ og de sloge ham i Ansigtet.
३आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या.
4 Og Pilatus gik atter ud, og han siger til dem: „Se, jeg fører ham ud til eder, for at I skulle vide, at jeg finder ingen Skyld hos ham.‟
४म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो.”
5 Da gik Jesus ud med Tornekronen og Purpurkappen paa. Og han siger til dem: „Se, hvilket Menneske!‟
५तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
6 Da nu Ypperstepræsterne og Svendene saa ham, raabte de og sagde: „Korsfæst! korsfæst!‟ Pilatus siger til dem: „Tager I ham og korsfæster ham; thi jeg finder ikke Skyld hos ham.‟
६मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.”
7 Jøderne svarede ham: „Vi have en Lov, og efter denne Lov er han skyldig at dø, fordi han har gjort sig selv til Guds Søn.‟
७यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”
8 Da Pilatus nu hørte dette Ord, blev han endnu mere bange.
८पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला;
9 Og han gik ind igen i Borgen og siger til Jesus: „Hvorfra er du?‟ Men Jesus gav ham intet Svar.
९आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही.
10 Pilatus siger da til ham: „Taler du ikke til mig? Ved du ikke, at jeg har Magt til at løslade dig, og at jeg har Magt til at korsfæste dig?‟
१०पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?”
11 Jesus svarede: „Du havde aldeles ingen Magt over mig, dersom den ikke var given dig ovenfra; derfor har den, som overgav mig til dig, større Synd.‟
११येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.”
12 Derefter forsøgte Pilatus at løslade ham. Men Jøderne raabte og sagde: „Dersom du løslader denne, er du ikke Kejserens Ven. Hver den, som gør sig selv til Konge, sætter sig op imod Kejseren.‟
१२यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.”
13 Da Pilatus hørte disse Ord, førte han Jesus ud og satte sig paa Dommersædet, paa det Sted, som kaldes Stenlagt, men paa Hebraisk Gabbatha;
१३म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात.
14 men det var Beredelsens Dag i Paasken, ved den sjette Time. Og han siger til Jøderne: „Se, eders Konge!‟
१४तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
15 De raabte nu: „Bort, bort med ham! korsfæst ham!‟ Pilatus siger til dem: „Skal jeg korsfæste eders Konge?‟ Ypperstepræsterne svarede: „Vi have ingen Konge uden Kejseren.‟
१५यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.”
16 Saa overgav han ham da til dem til at korsfæstes. De toge nu Jesus;
१६मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले.
17 og han bar selv sit Kors og gik ud til det saakaldte „Hovedskalsted‟, som hedder paa Hebraisk Golgatha,
१७तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
18 hvor de korsfæstede ham og to andre med ham, en paa hver Side, men Jesus midt imellem.
१८तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.
19 Men Pilatus havde ogsaa skrevet en Overskrift og sat den paa Korset. Men der var skrevet: „Jesus af Nazareth, Jødernes Konge.‟
१९आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते.
20 Denne Overskrift læste da mange af Jøderne; thi det Sted, hvor Jesus blev korsfæstet, var nær ved Staden; og den var skreven paa Hebraisk, Latin og Græsk.
२०येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता.
21 Da sagde Jødernes Ypperstepræster til Pilatus: „Skriv ikke: Jødernes Konge, men: Han sagde: Jeg er Jødernes Konge.‟
२१तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.”
22 Pilatus svarede: „Hvad jeg skrev, det skrev jeg.‟
२२पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.”
23 Da nu Stridsmændene havde korsfæstet Jesus, toge de hans Klæder og gjorde fire Dele, een Del for hver Stridsmand, og ligeledes Kjortelen; men Kjortelen var usyet, vævet fra øverst helt igennem.
२३मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता.
24 Da sagde de til hverandre: „Lader os ikke sønderskære den, men kaste Lod om den, hvis den skal være; ‟ for at Skriften skulde opfyldes, som siger: „De delte mine Klæder imellem sig og kastede Lod om mit Klædebon.‟ Dette gjorde da Stridsmændene.
२४म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या.
25 Men ved Jesu Kors stod hans Moder og hans Moders Søster, Maria, Klopas's Hustru, og Maria Magdalene.
२५पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या.
26 Da Jesus nu saa sin Moder og den Discipel, han elskede, staa hos, siger han til sin Moder: „Kvinde! se, det er din Søn.‟
२६येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.”
27 Derefter siger han til Discipelen: „Se, det er din Moder.‟ Og fra den Time tog Discipelen hende hjem til sit.
२७मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
28 Derefter, da Jesus vidste, at alting nu var fuldbragt, for at Skriften skulde opfyldes, siger han: „Jeg tørster.‟
२८मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले.
29 Der stod et Kar fuldt af Eddike; de satte da en Svamp fuld af Eddike paa en Isopstængel og holdt den til hans Mund.
२९तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.
30 Da nu Jesus havde taget Eddiken, sagde han: „Det er fuldbragt; ‟ og han bøjede Hovedet og opgav Aanden.
३०येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
31 Da det nu var Beredelsesdag, bade Jøderne Pilatus om, at Benene maatte blive knuste og Legemerne nedtagne, for at de ikke skulde blive paa Korset Sabbaten over; thi denne Sabbatsdag var stor.
३१तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे.
32 Da kom Stridsmændene og knuste Benene paa den første og paa den anden, som vare korsfæstede med ham.
३२तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्याचे पाय तोडले.
33 Men da de kom til Jesus og saa, at han allerede var død, knuste de ikke hans Ben.
३३परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत.
34 Men en af Stridsmændene stak ham i Siden med et Spyd, og straks flød der Blod og Vand ud.
३४तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
35 Og den, der har set det, har vidnet det, og hans Vidnesbyrd er sandt, og han ved, at han siger sandt, for at ogsaa I skulle tro.
३५आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.
36 Thi disse Ting skete, for at Skriften skulde opfyldes: „Intet Ben skal sønderbrydes derpaa.‟
३६कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या.
37 Og atter et andet Skriftord siger: „De skulle se hen til ham, hvem de have gennemstunget.‟
३७आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.”
38 Men Josef fra Arimathæa, som var en Jesu Discipel, dog lønligt, af Frygt for Jøderne, bad derefter Pilatus om, at han maatte tage Jesu Legeme, og Pilatus tillod det. Da kom han og tog Jesu Legeme.
३८यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले.
39 Men ogsaa Nikodemus, som første Gang var kommen til Jesus om Natten, kom og bragte en Blanding af Myrra og Aloe, omtrent hundrede Pund.
३९आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला.
40 De toge da Jesu Legeme og bandt det i Linklæder med de vellugtende Urter, som Jødernes Skik er at fly Lig til Jorde.
४०मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले.
41 Men der var paa det Sted, hvor han blev korsfæstet, en Have, og i Haven en ny Grav, hvori endnu aldrig nogen var lagt.
४१त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते.
42 Der lagde de da Jesus, for Jødernes Beredelsesdags Skyld, efterdi Graven var nær.
४२तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.