< Hoseas 2 >
1 Kald eders Broder Mit-Folk og eders Søster Naaderig.
१“आपल्या भावांना म्हणा, अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”
2 Gaa i rette med eders Moder, gaa i rette, thi hun er ikke min Hustru, og jeg er ej hendes Mand. For Hormærket fri hun sit Ansigt, for Bolemærket sit Bryst.
२तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत: पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.
3 Jeg klæder hende ellers nøgen, stiller hende frem, som hun fødtes; jeg reder hende til som en Ørk, som et Tørkeland gør jeg hende, lader hende tørste ihjel.
३जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.
4 Jeg ynkes ej over hendes Børn, fordi de er Horebørn;
४तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.
5 thi Horkvinde var deres Moder, skamløs var hun, som bar dem. Thi hun sagde: »Mine Elskere holder jeg mig til, som giver mig mit Brød og mit Vand, min Uld og min Hør, min Olie og Vin.«
५त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.
6 Se, derfor spærrer jeg med Tjørn hendes Vej, foran hende murer jeg en Mur, saa hun ikke kan finde sine Stier.
६म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही.
7 Efter Elskerne kan hun saa løbe, hun naar dem alligevel ikke; hun søger dem uden at finde, og da skal hun sige: »Jeg gaar paa ny til min første Mand; da havde jeg det bedre end nu.«
७ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.
8 Ja hun, hun skønner ikke, at det var mig, som gav hende Korn og Most og Olie, gav hende rigeligt Sølv og Guld, som de gjorde til Ba'aler.
८कारण तिला हे ठाऊक नाही की, तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली, नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.
9 Derfor tager jeg atter mit Korn, naar Tiden er til det, min Most, naar Timen er inde, borttager min Uld og min Hør, som hun skjuler sin Nøgenhed med.
९म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.
10 Jeg blotter nu hendes Skam lige for Elskernes Øjne, af min Haand frier ingen hende ud.
१०नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.
11 Jeg gør Ende paa al hendes Glæde, Fester, Nymaaner, Sabbater, hver en Højtid, hun har.
११मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन.
12 Jeg ødelægger hendes Vinstok og Figentræ, om hvilke hun sagde: »Her er min Skøgeløn, den, mine Elskere gav mig.« Jeg skaber dem om til Krat, af Markens Dyr skal de ædes.
१२मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.
13 Jeg hjemsøger hende for Ba'alernes Fester, paa hvilke hun bragte dem Ofre, smykket med Ring og Kæde. Sine Elskere holdt hun sig til, mig glemte hun, lyder det fra HERREN.
१३तिने बआलास धूप दिला, आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.
14 Se, derfor vil jeg lokke og føre hende ud i Ørkenen og tale hende kærligt til.
१४यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन, आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.
15 Saa giver jeg hende hendes Vingaarde der og Akors Dal til en Haabets Dør. Der skal hun synge som i Ungdommens Dage, som da hun drog op fra Ægyptens Land.
१५मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती.
16 Paa hin Dag, lyder det fra HERREN, skal hun paakalde sin Ægtemand, og ikke mere Ba'alerne.
१६हे परमेश्वर घोषित करतो की, त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील, आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस.
17 Ba'alsnavnene fjerner jeg fra hendes Mund, ej mer skal Navnene huskes.
१७कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.
18 Paa hin Dag slutter jeg en Pagt for dem med Markens Dyr og Himmelens Fugle og Jordens Kryb; Bue, Sværd og Stridsvaaben sønderbryder jeg i Landet, og jeg lader dem bo trygt.
१८त्या दिवशी मी इस्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन, व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.
19 Jeg trolover mig med dig for evigt, jeg trolover mig med dig med Retfærd og Ret, med Miskundhed og Barmhjertighed;
१९मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन.
20 jeg trolover mig med dig i Troskab, og du skal kende HERREN.
२०मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
21 Da skal det ske paa hin Dag, at jeg bønhører, lyder det fra HERREN, ja, at jeg bønhører Himlen, at den saa bønhører Jorden,
२१आणि त्या दिवशी, मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो, मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईन.
22 og Jorden bønhører Kornet, Mosten og Olien, og de bønhører Jizre'el.
२२आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.
23 Jeg saar hende ud i Landet, mod Naadeløs er jeg naadig og siger til Ikke-mit-Folk: »Mit Folk er du!« og han skal sige: »Min Gud!«
२३मी स्वत: साठी तिचे रोपण भूमीत करीन, आणि लो रुहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.