< 1 Mosebog 36 >

1 Dette er Esaus, det er Edoms, Slægtebog.
एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,
2 Esau tog sine Hustruer af Kana'ans Døtre: Ada, en Datter af Hetiten Elon, Oholibama, en Datter af Ana, Hivviten Zib'ons Søn,
एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
3 og Ismaels Datter Basemat, Søster til Nebajot.
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
4 Ada fødte Esau Elifaz, Basemat fødte Re'uel,
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.
5 og Oholibama fødte Je'usj, Jalam og Kora. Det var Esaus Sønner, der fødtes ham i Kana'ans Land.
आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.
6 Derpaa tog Esau sine Hustruer sine Sønner og Døtre, hele sin Husstand, sit Kvæg og al den Ejendom, han havde samlet sig i Kana'ans Land, og drog til Landet lige over for sin Broder Jakob;
एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
7 deres Gods var for meget til, at de kunde bo sammen, og deres. Udlændigheds Land kunde ikke rumme dem, saa store var deres. Hjorde;
कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
8 og Esau bosatte sig i Se'irs Bjerge; Esau, det er Edom.
एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
9 Dette er Esaus Slægtebog, han, som var Stamfader til Edomiterne i Se'irs Bjerge.
सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:
10 Følgende var Esaus Sønners Navne: Elifaz, en Søn af Esaus Hustru Ada, og Re'uel, en Søn af Esaus Hustru Basemat.
१०एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.
11 Elifaz's Sønner var Teman, Omar, Zefo, Gatam og Kenaz.
११अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
12 Timna, som var Esaus Søn Elifaz's Medhustru, fødte ham Amalek. Det var Esaus Hustru Adas Sønner.
१२अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
13 Følgende var Re'uels Sønner: Nahat, Zera, Sjamma og Mizza. Det var Esaus Hustru Basemats Sønner.
१३रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.
14 Følgende var Sønner af Esaus Hustru Oholibama, Datter af Zib'ons Søn Ana; hun fødte for Esau: Je'usj, Jalam og Kora.
१४सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
15 Følgende var Esaus Sønners Stammehøvdinger: Elifaz's, Esaus førstefødtes, Sønner: Høvdingerne Teman, Omar, Zefo, Kenaz,
१५एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
16 Kora, Gatam og Amalek. Det var de fra Elifaz stammende Høvdinger i Edoms Land; det var Adas Sønner.
१६कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
17 Følgende var Esaus Søn Re'uels Sønner: Høvdingerne Nahat, Zera, Sjamma og Mizza. Det var de fra Re'uel stammende Høvdinger i Edoms Land; det var Esaus Hustru Basemats Sønner.
१७एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
18 Følgende var Esaus Hustru Oholibamas Sønner: Høvdingerne Je'usj, Jalam og Kora. Det var de Høvdinger, der stammede fra Oholibama, Esaus Hustru, Anas Datter.
१८एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
19 Det var Esaus Sønner, og det var deres Stammehøvdinger; det var Edom.
१९हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
20 Følgende var Horiten Se'irs Sønner, Landets oprindelige Befolkning: Lotan, Sjobal, Zib'on, Ana,
२०त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
21 Disjon, Ezer og Risjon. Det var Horiternes Stammehøvdinger, Se'irs Sønner i Edoms Land.
२१दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
22 Lotans Sønner var Hori og Hemam, og Lotans Søster var Timna.
२२लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
23 Følgende var Sjobals Sønner: Alvan, Manahat, Ebal, Sjefo og Onam.
२३शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
24 Følgende var Zib'ons Sønner: Ajja og Ana. Det var denne Ana, som fandt de varme Kilder i Ørkenen, da han vogtede sin Fader Zib'ons Æsler.
२४सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
25 Følgende var Anas Børn: Disjon og Oholibama, Anas Datter.
२५अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
26 Følgende var Disjons Sønner: Hemdan, Esjban, Jitran og Keran.
२६दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.
27 Følgende var Ezers Sønner: Bilhan, Za'avan og Akan.
२७एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते.
28 Følgende var Risjons Sønner: Uz og Aran.
२८दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते.
29 Følgende var Horiternes Stammehøvdinger: Høvdingerne Lotan, Sjobal, Zib'on, Ana,
२९होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
30 Disjon, Ezer og Risjon. Det var Horiternes Stammehøvdinger efter deres Stammer i Se'irs Land.
३०दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
31 Følgende var de Konger, der herskede i Edoms Land, før Israeliterne fik Konger:
३१इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच:
32 Bela, Beors Søn, herskede i Edom; hans By hed Dinhaba.
३२बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.
33 Da Bela døde, blev Jobab, Zeras Søn fra Bozra, Konge i hans Sted.
३३बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.
34 Da Jobab døde, blev Husjam fra Temaniternes Land Konge i hans Sted.
३४योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.
35 Da Husjam døde, blev Hadad, Bedads Søn, Konge i hans Sted; det var ham, der slog Midjaniterne paa Moabs Slette; hans By hed Avit.
३५हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
36 Da Hadad døde, blev Samla fra Masreka Konge i hans Sted.
३६हदाद मरण पावल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
37 Da Samla døde, blev Sja'ul fra Rehobot ved Floden Konge i hans Sted.
३७साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
38 Da Sja'ul døde, blev Ba'al-Hanan, Akbors Søn, Konge i hans Sted.
३८शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.
39 Da Ba'al-Hanan, Akbors Søn, døde, blev Hadar Konge i hans Sted; hans By hed Pa'u, og hans Hustru hed Mehetab'el, en Datter af Matred, en Datter af Mezahab.
३९बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
40 Følgende var Navnene paa Esaus Stammehøvdinger efter deres Slægter, Bosteder og Navne: Høvdingerne Timna, Alva, Jetet,
४०एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ,
41 Oholibama, Ela, Pinon,
४१अहलीबामा, एला, पीनोन,
42 Kenaz, Teman, Mibzar,
४२कनाज, तेमान, मिब्सार,
43 Magdiel og Iram. Det var Edoms Stammehøvdinger efter deres Boliger i det Land, de fik i Eje. Det var Esau, Edoms Fader.
४३माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.

< 1 Mosebog 36 >