< Galaterne 3 >
1 O, I uforstandige Galatere! hvem har fortryllet eder, I, hvem Jesus Kristus blev malet for Øje som korsfæstet?
१अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे?
2 Kun dette vil jeg vide af eder: Var det ved Lovens Gerninger, I modtoge Aanden, eller ved i Tro at høre?
२मला तुम्हापासून इतकेच समजवून घ्यावयाचे आहे की, तुम्हास जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला?
3 Ere I saa uforstandige? ville I, som begyndte i Aand, nu ende i Kød?
३तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय?
4 Have I da prøvet saa meget forgæves? hvis det da virkelig er forgæves!
४तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय!
5 Mon da han, som meddeler eder Aanden og virker kraftige Gerninger iblandt eder, gør dette ved Lovens Gerninger eller ved, at I høre i Tro?
५म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो?
6 ligesom jo „Abraham troede Gud, og det blev regnet ham til Retfærdighed‟.
६ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले.
7 Erkender altsaa, at de, som ere af Tro, disse ere Abrahams Børn.
७ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वास ठेवतात तेच अब्राहामाचे वंशज आहेत.
8 Men da Skriften forudsaa, at det er af Tro, at Gud retfærdiggør Hedningerne, forkyndte den forud Abraham det Evangelium: „I dig skulle alle Folkeslagene velsignes‟,
८आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’
9 saa at de, som ere af Tro, velsignes sammen med den troende Abraham.
९तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.
10 Thi saa mange, som holde sig til Lovens Gerninger, ere under Forbandelse; thi der er skrevet: „Forbandet hver den, som ikke bliver i alle de Ting, som ere skrevne i Lovens Bog, saa han gør dem.‟
१०कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’
11 Men at ingen bliver retfærdiggjort for Gud ved Lov, er aabenbart, thi „den retfærdige skal leve af Tro.‟
११नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’
12 Men Loven beror ikke paa Tro; men: „Den, som gør disse Ting, skal leve ved dem.‟
१२आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’
13 Kristus har løskøbt os fra Lovens Forbandelse, idet han blev en Forbandelse for os (thi der er skrevet: „Forbandet er hver den, som hænger paa et Træ‟),
१३आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे.
14 for at Abrahams Velsignelse maatte komme til Hedningerne i Kristus Jesus, for at vi kunde faa Aandens Forjættelse ved Troen.
१४ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
15 Brødre! jeg taler paa Menneskevis: Ingen ophæver dog et Menneskes stadfæstede Arvepagt eller føjer noget dertil.
१५आणि बंधूंनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करारदेखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही.
16 Men Abraham og hans Sæd bleve Forjættelserne tilsagte; der siges ikke: „Og Sædene‟, som om mange, men som om een: „Og din Sæd‟, hvilken er Kristus.
१६आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
17 Jeg mener dermed dette: En Pagt, som forud er stadfæstet af Gud, kan Loven, som blev til fire Hundrede og tredive Aar senere, ikke gøre ugyldig, saa at den skulde gøre Forjættelsen til intet.
१७आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.
18 Thi faas Arven ved Lov, da faas den ikke mere ved Forjættelse; men til Abraham har Gud skænket den ved Forjættelse.
१८कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; परंतु अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले.
19 Hvad skulde da Loven? Den blev føjet til for Overtrædelsernes Skyld (indtil den Sæd kom, hvem Forjættelsen gjaldt), besørget ved Engle, ved en Mellemmands Haand.
१९तर मग नियमशास्त्र कशाला? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्याद्वारे नेमून आले.
20 Men en Mellemmand er ikke kun for een Part; Gud derimod er een.
२०मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकांसाठी असतो; तरीही देव तर एकच आहे.
21 Er da Loven imod Guds Forjættelser? Det være langtfra! Ja, hvis der var givet en Lov, som kunde levendegøre, da var Retfærdigheden virkelig af Lov.
२१तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
22 Men Skriften har indesluttet alt under Synd, for at Forjættelsen skulde af Tro paa Jesus Kristus gives dem, som tro.
२२तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.
23 Men førend Troen kom, holdtes vi indelukkede under Lovens Bevogtning til den Tro, som skulde aabenbares,
२३परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते.
24 saa at Loven er bleven os en Tugtemester til Kristus, for at vi skulde blive retfærdiggjorte af Tro.
२४ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.
25 Men efter at Troen er kommen, ere vi ikke mere under Tugtemester.
२५पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही.
26 Thi alle ere I Guds Børn ved Troen paa Kristus Jesus.
२६पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात.
27 Thi I, saa mange som bleve døbte til Kristus, have iført eder Kristus.
२७कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
28 Her er ikke Jøde eller Græker; her er ikke Træl eller fri; her er ikke Mand og Kvinde; thi alle ere I een i Kristus Jesus.
२८यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात.
29 Men naar I høre Kristus til, da ere I jo Abrahams Sæd, Arvinger ifølge Forjættelse.
२९आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.