< Ezekiel 41 >
1 Derpaa førte han mig til det Hellige og maalte Pillerne, de var seks Alen brede paa begge Sider;
१नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.
2 Indgangen var ti Alen bred, dens Sidevægge fem Alen til begge Sider; og han maalte dets Længde til fyrretyve Alen og Bredden til tyve.
२दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात व दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
3 Derpaa gik han ind i Inderhallen og maalte Indgangens Piller; de var to Alen, og Indgangen var seks Alen bred og Sidevæggene syv Alen brede til begge Sider.
३मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.
4 Og han maalte dets Længde til tyve Alen og Bredden til tyve ud for Tempelrummet. Og han sagde til mig: »Dette er det Allerhelligste.«
४मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”
5 Derpaa maalte han Templets Mur; den var seks Alen bred; og Tilbygningen var fire Alen bred Templet rundt.
५मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्या प्रत्येकाची रुंदी चार हात होती.
6 Tilbygningen laa Rum ved Rum, tre Rum oven paa hverandre tredive Gange, og der var Fremspring, saa Bjælkerne ikke greb ind i Templets Mur.
६तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.
7 Saaledes var Tilbygningens Rum bredere og bredere opad, efter som Tempelmuren var trukket tilbage opad, Templet rundt. Fra det nederste Stokværk steg man op til det mellemste, og derfra op til det øverste.
७आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
8 Og jeg saa ved Templet en ophøjet brolagt Plads hele Vejen rundt. Tilbygningens Grundmure var et fuldt Maal høje, seks Alen til Kanten.
८मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.
9 Tilbygningens Ydermur var fem Alen bred. Der var en aaben Plads langs Templets Tilbygning.
९बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी पाच हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती.
10 En afspærret Plads, tyve Alen bred, omgav Templet paa alle Sider.
१०या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याजकासाठी बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूंनी वीस हात अंतर होती.
11 Tilbygningens Døre førte ud til den aabne Plads, en Dør mod Nord og en anden mod Syd; og den aabne Plads var fem Alen bred paa alle Sider.
११बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.
12 Den Bygning, som laa ved den afspærrede Plads imod Vest, var halvfjerdsindstyve Alen bred, dens Mur var fem Alen tyk til alle Sider, og den var halvfemsindstyve Alen lang.
१२मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.
13 Han maalte Templet; det var hundrede Alen langt; den afspærrede Plads tillige med Bagbygningen og dens Mure var hundrede Alen lang,
१३मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.
14 og Templets Forside tillige med den afspærrede Plads mod Øst var hundrede Alen bred.
१४मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.
15 Og han maalte Længden af Bagbygningen langs den afspærrede Plads, som laa bag den; den var hundrede Alen. Det Hellige, Inderhallen og den ydre Forhal
१५नंतर त्या मनुष्याने मंदिराच्यामागे असलेल्या, त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे, पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व शंभर हात मोजली.
16 var træklædt. Vinduer, som udvidede sig indad, gav Lys rundt om i alle tre Rum, og Væggene derinde var klædt med Træ rundt om fra Gulv til Vinduer,
१६तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.
17 og fra Indgangens Sidevægge til det indre Rum var der Væggen rundt
१७मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.
18 udskaaret Arbejde, Keruber og Palmer, en Palme mellem to Keruber; Keruberne havde to Ansigter;
१८आणि ते करुब आणि खजुरीच्या झाडांनी सजवलेले होते. प्रत्येक दोन करुबामध्ये एक खजूराचे झाड होते. आणि प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
19 Menneskeansigtet vendte mod Palmen paa den ene Side og Løveansigtet mod Palmen paa den anden Side; saaledes var der gjort hele Templet rundt.
१९करुबाला एका खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चोहोंकडे अशाप्रकारचे काम होते.
20 Fra Gulv til Vinduer var der fremstillet Keruber og Palmer paa det Helliges Væg.
२०जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.
21 Ved Indgangen til det Hellige var der firkantede Dørstolper. Foran Helligdommen var der noget, der saa ud som
२१मंदिराच्या द्वारांचे खांब चौरस होते. परमपवित्रस्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते.
22 et Træalter, tre Alen højt, to Alen langt og to Alen bredt; det havde Hjørner, og dets Fodstykke og Vægge var af Træ. Og han sagde til mig: »Dette er Bordet, som staar for HERRENS Aasyn.«
२२पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
23 Det Hellige havde to Dørfløje;
२३पवित्र स्थानाला आणि परमपवित्रस्थानाला दोन दोन दारे होती.
24 ligeledes havde Helligdommen to Dørfløje; hver Fløj var to bevægelige Dørflader, to paa hver Fløj.
२४प्रत्येक दरवाजाला दोन व दुसऱ्यास दोन अशा प्रत्येक तावदानाला दोन दोन बिजागऱ्या होत्या.
25 Og paa dem var der fremstillet Keruber og Palmer ligesom paa Væggene. Der var et Trætag uden for Forhallen.
२५जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.
26 Der var gitrede Vinduer og Palmer paa Forhallens Sidevægge til begge Sider .......
२६द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्यास पुढे आलेले छतही होते.