< Ezekiel 26 >

1 I det ellevte Aar paa den første Dag i ... Maaned kom HERRENS Ord til mig saaledes:
आणि असे झाले की, बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 Menneskesøn! Fordi Tyrus siger om Jerusalem: »Ha, ha! Folkeslagenes Port er knust; den staar mig aaben; den var rig, men er nu øde!«
“मानवाच्या मुला, कारण सोर यरूशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल.”
3 derfor, saa siger den Herre HERREN: Se, jeg kommer over dig, Tyrus, og fører mange Folk imod dig, som naar Havet rejser sine Bølger.
म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.”
4 De skal ødelægge Tyrus's Mure og nedbryde Taarnene. Jeg fejer Muldet bort og gør Tyrus til nøgen Klippe;
ते सोरेच्या तटाचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची धूळ झाडून दूर करीन आणि तिला उघडा खडक करीन.
5 en Tørreplads for Net skal det være ude i Havet, saa sandt jeg har talet, lyder det fra den Herre HERREN; og det skal blive et Bytte for Folkene.
ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल.
6 Dets Døtre paa Land skal hugges ned med Sværd; og de skal kende, at jeg er HERREN.
तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वधल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
7 Thi saa siger den Herre HERREN: Se, nordenfra fører jeg mod Tyrus Kong Nebukadrezar af Babel, Kongernes Konge, med Heste, Vogne og Ryttere og en vældig Hærskare.
कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.
8 Dine Døtre paa Land skal han hugge ned med Sværd; han skal bygge Belejringstaarne, opkaste Stormvold og rejse Skjoldtag imod dig;
तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरूद्ध उतरती वेढ्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरूद्ध ढाल उभारील.
9 sin Murbrækkers Stød skal han rette imod dine Mure og nedbryde dine Taarne med sine Sværd.
तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील.
10 Hans Heste skal myldre, saa Støvet, de rejser, skjuler dig; Ryttere, Hjul og Vogne skal larme, saa dine Mure ryster, naar han drager igennem dine Porte, som naar man trænger ind i en stormet By.
१०घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील.
11 Med sine Hestes Hove skal han nedtrampe alle dine Gader; dit Folk skal han hugge ned med Sværdet og styrte dine stolte Støtter til Jorden.
११तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवितील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमीनीवर पडतील.
12 De skal rane din Rigdom og gøre dine Handelsvarer til Bytte; de skal nedbryde dine Mure og nedrive dine herlige Huse: Sten, Tømmer og Ler skal de kaste i Vandet.
१२याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील.
13 Jeg gør Ende paa dine brusende Sange, og dine Citres Klang skal ikke mere høres.
१३कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्यांचा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही.
14 Jeg gør dig til nøgen Klippe, en Tørreplads for Net skal du være. Aldrig mere skal du bygges, saa sandt jeg, HERREN, har talet, lyder det fra den Herre HERREN.
१४कारण मी तुला उघडा खडक करीन, तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील, तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी, परमेश्वराने असे म्हटले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
15 Saa siger den Herre HERREN til Tyrus: For sandt, ved dit drønende Fald, ved de saaredes Stønnen, naar Sværd hugger løs i din Midte, skal Strandene skælve.
१५प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधःपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कण्हण्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?
16 Ned fra sin Trone stiger hver Fyrste ved Havet, Kapperne lægger de bort, aflægger de brogede Klæder og klæder sig i Sorg; de sidder paa Jorden og skælver uafbrudt, slagne af Rædsel over dig.
१६कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.
17 De synger en Klagesang om dig og siger til dig: Ak, du gik under, forsvandt fra Havet, du fejrede By, du, som var vældig paa Havet, du og dine Borgere, du, der jog Rædsel i alle, som boede der!
१७ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस?
18 Nu gribes Strandene af Skælven, den Dag du falder, og Havets Øer forfærdes over din Udgang!
१८आता, तुझ्या पडण्याच्या दिवशी, समुद्रकिनारीचा देशांचा भीतीने थरकाप उडेल. समुद्र किनाऱ्यावरील देश भयभीत झाले आहेत, कारण तू पाण्यात गेली आहेस.”
19 Thi saa siger den Herre HERREN: Naar jeg gør dig til en øde By og lige med affolkede Byer, naar jeg fører Verdensdybet over dig, og de vældige Vande skjuler dig,
१९कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जी नगरे वसली नाहीत त्यासारखे जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि तेव्हा प्रचंड जले तुला झाकतील.
20 saa støder jeg dig ned iblandt dem, der steg ned i Dybet, blandt Fortidens Folk, og lader dig ligge i Underverdenen som ældgamle Ruiner blandt dem, der steg ned i Dybet, for at du aldrig mere skal bebos eller rejse dig i de levendes Land;
२०मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस.
21 jeg giver dig hen til brat Undergang, og det skal være ude med dig; selv om der søges efter dig, skal du aldrig i Evighed findes, lyder det fra den Herre HERREN.
२१मी तुझ्यावर विपत्ती आणिन आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.

< Ezekiel 26 >