< 2 Timoteus 1 >

1 Paulus, Kristi Jesu Apostel ved Guds Villie, for at bringe Forjættelse om Livet i Kristus Jesus
ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
2 — til Timotheus, sit elskede Barn: Naade, Barmhjertighed og Fred fra Gud Fader og Kristus Jesus, vor Herre!
प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
3 Jeg takker Gud, hvem jeg fra mine Forfædre af har tjent i en ren Samvittighed, ligesom jeg uafladelig har dig i Erindring i mine Bønner Nat og Dag,
माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
4 da jeg i Mindet om dine Taarer længes efter at se dig, for at jeg maa fyldes med Glæde,
तुझी आसवे आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो ह्यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे.
5 idet jeg er bleven mindet om den uskrømtede Tro, som er i dig, den, som boede først i din Mormoder Lois og din Moder Eunike, og jeg er vis paa, at den ogsaa bor i dig.
तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
6 Derfor paaminder jeg dig, at du opflammer den Guds Naadegave, som er i dig ved mine Hænders Paalæggelse.
या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.
7 Thi Gud har ikke givet os Fejgheds Aand, men Krafts og Kærligheds og Sindigheds Aand.
कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
8 Derfor, skam dig ikke ved Vidnesbyrdet om vor Herre eller ved mig, hans Fange, men lid ondt med Evangeliet ved Guds Kraft,
म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.
9 han, som frelste os og kaldte os med en hellig Kaldelse, ikke efter vore Gerninger, men efter sit eget Forsæt og Naaden, som blev given os i Kristus Jesus fra evige Tider, (aiōnios g166)
त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. (aiōnios g166)
10 men nu er kommen for Dagen ved vor Frelsers Jesu Kristi Aabenbarelse, han, som tilintetgjorde Døden, men bragte Liv og Uforkrænkelighed for Lyset ved Evangeliet,
१०पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
11 for hvilket jeg er bleven sat til Prædiker og Apostel og Hedningers Lærer,
११मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
12 hvorfor jeg ogsaa lider dette, men jeg skammer mig ikke derved; thi jeg ved, til hvem jeg har sat min Tro, og jeg er vis paa, at han er mægtig til at vogte paa den mig betroede Skat til hin Dag.
१२आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 Hav et Forbillede i de sunde Ord, som du har hørt af mig, i Tro og Kærlighed i Kristus Jesus.
१३ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
14 Vogt paa den skønne betroede Skat ved den Helligaand, som bor i os.
१४आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 Du ved dette, at alle de i Asien have vendt sig fra mig, iblandt hvilke ere Fygelus og Hermogenes.
१५आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
16 Herren vise Onesiforus's Hus Barmhjertighed; thi han har ofte vederkvæget mig og skammede sig ikke ved min Lænke,
१६अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही.
17 men da han kom til Rom, søgte han ivrigt efter mig og fandt mig.
१७उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला.
18 Herren give ham at finde Barmhjertighed fra Herren paa hin Dag! Og hvor megen Tjeneste han har gjort i Efesus, ved du bedst.
१८प्रभू करो आणि त्यास त्यादिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.

< 2 Timoteus 1 >