< 2 Korinterne 5 >
1 Thi vi vide, at dersom vor jordiske Teltbolig nedbrydes, have vi en Bygning fra Gud, en Bolig, som ikke er gjort med Hænder, en evig i Himlene. (aiōnios )
१कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे. (aiōnios )
2 Ja, ogsaa i denne sukke vi, længselsfulde efter at overklædes med vor Bolig fra Himmelen,
२या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत.
3 saa sandt vi da som iklædte ikke skulle findes nøgne.
३आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही.
4 Ja, vi, som ere i dette Telt, sukke besværede, efterdi vi ikke ville afklædes, men overklædes, for at det dødelige kan blive opslugt af Livet.
४कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे.
5 Men den, som har sat os i Stand just til dette, er Gud, som gav os Aandens Pant.
५आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
6 Derfor ere vi altid frimodige og vide, at medens vi ere hjemme i Legemet, ere vi borte fra Herren —
६म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत.
7 thi i Tro vandre vi, ikke i Beskuelse —
७कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही;
8 ja, vi ere frimodige og have snarere Lyst til at vandre bort fra Legemet og være hjemme hos Herren.
८आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.
9 Derfor sætte vi ogsaa vor Ære i, hvad enten vi ere hjemme eller borte, at være ham velbehagelige.
९म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
10 Thi vi skulle alle aabenbares for Kristi Domstol, for at hver kan faa igen, hvad der ved Legemet er gjort, efter det, som han har øvet, enten godt eller ondt.
१०कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
11 Efterdi vi da kende Frygten for Herren, søge vi at vinde Mennesker; men for Gud ere vi aabenbare; ja, jeg haaber, at vi ogsaa ere aabenbare for eders Samvittigheder.
११म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत.
12 Ikke anbefale vi atter os selv til eder; men vi give eder Anledning til at rose eder af os, for at I kunne have noget at svare dem, som rose sig af det udvortes og ikke af Hjertet.
१२कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे.
13 Thi naar vi „bleve afsindige‟, var det for Guds Skyld, og naar vi ere besindige, er det for eders Skyld.
१३कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत.
14 Thi Kristi Kærlighed tvinger os,
१४कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले,
15 idet vi have sluttet saaledes: Een er død for alle, altsaa ere de alle døde; og han døde for alle, for at de levende ikke mere skulle leve for sig selv, men for ham, som er død og oprejst for dem.
१५आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
16 Saaledes vide vi fra nu af ikke af nogen efter Kødet; om vi ogsaa have kendt Kristus efter Kødet, gøre vi det dog ikke mere nu.
१६म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
17 Derfor, om nogen er i Kristus, da er han en ny Skabning; det gamle er forbigangent, se, det er blevet nyt!
१७म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
18 Men alt dette er fra Gud, som forligte os med sig selv ved Kristus og gav os Forligelsens Tjeneste,
१८हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली;
19 efterdi det jo var Gud, som i Kristus forligte Verden med sig selv, idet han ikke tilregner dem deres Overtrædelser og har nedlagt Forligelsens Ord i os.
१९म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.
20 Vi ere altsaa Sendebud i Kristi Sted, som om Gud formaner ved os; vi bede i Kristi Sted: Bliver forligte med Gud!
२०तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
21 Den, som ikke kendte Synd, har han gjort til Synd for os, for at vi skulle blive Guds Retfærdighed i ham.
२१कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.