< Første Kongebog 2 >

1 Da det nu lakkede ad Enden med Davids Liv, gav han sin Søn Salomo disse Befalinger:
दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,
2 »Jeg gaar nu al Kødets Gang; saa vær nu frimodig og vis dig som en Mand!
“आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.
3 Og hold HERREN din Guds Forskrifter, saa du vandrer paa hans Veje og holder hans Anordninger, Bud, Bestemmelser og Vidnesbyrd, saaledes som skrevet staar i Mose Lov, for at du maa have Lykken med dig i alt, hvad du gør, og i alt, hvad du tager dig for,
आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.
4 for at HERREN kan opfylde den Forjættelse, han gav mig, da han sagde: Hvis dine Sønner vogter paa deres Vej, saa de vandrer i Trofasthed for mit Aasyn af hele deres Hjerte og hele deres Sjæl, skal der aldrig fattes dig en Efterfølger paa Israels Trone!
तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.
5 Du ved jo ogsaa, hvad Joab, Zerujas Søn, har voldet mig, hvorledes han handlede mod Israels to Hærførere, Abner, Ners Søn, og Amasa, Jeters Søn, hvorledes han slog dem ihjel og saaledes i Fredstid hævnede Blod, der var udgydt i Krig, og besudlede Bæltet om min Lænd og Skoene paa mine Fødder med uskyldigt Blod;
सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.
6 gør derfor, som din Klogskab tilsiger dig, og lad ikke hans graa Haar stige ned i Dødsriget med Fred. (Sheol h7585)
तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको. (Sheol h7585)
7 Men mod Gileaditen Barzillajs Sønner skal du vise Godhed, og de skal have Plads mellem dem, der spiser ved dit Bord, thi paa den Maade kom de mig i Møde, da jeg maatte flygte for din Broder Absalom.
गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
8 Og se, saa har du hos dig Benjaminiten Simeon, Geras Søn, fra Bahurim, ham, som udslyngede en grufuld Forbandelse imod mig, dengang jeg drog til Mahanajim. Da han senere kom mig i Møde ved Jordan, tilsvor jeg ham ved HERREN: Jeg vil ikke slaa dig ihjel med Sværd!
गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.
9 Men du skal ikke lade ham ustraffet, thi du er en klog Mand og vil vide, hvorledes du skal handle med ham, og bringe hans graa Haar blodige ned i Dødsriget.« (Sheol h7585)
पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.” (Sheol h7585)
10 Saa lagde David sig til Hvile hos sine Fædre og blev jordet i Davidsbyen.
१०मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.
11 Tiden, han havde været Konge over Israel, udgjorde fyrretyve Aar; i Hebron herskede han syv Aar, i Jerusalem tre og tredive Aar.
११हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
12 Derpaa satte Salomo sig paa sin Fader Davids Trone, og hans Herredømme blev saare stærkt.
१२आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
13 Men Adonija, Haggits Søn, kom til Batseba, Salomos Moder. Hun spurgte da: »Kommer du for det gode?« Han svarede: »Ja, jeg gør!«
१३यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्यास विचारले, “तू शांतीने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”
14 Og han fortsatte: »Jeg har en Sag at tale med dig om.« Hun svarede: »Saa tal!«
१४“मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
15 Da sagde han: »Du ved at Kongeværdigheden tilkom mig, og at hele Israel havde Blikket rettet paa mig som den, der skulde være Konge; dog gik Kongeværdigheden over til min Broder, thi HERREN lod det tilfalde ham.
१५अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हास हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
16 Men nu har jeg een eneste Bøn til dig; du maa ikke afvise mig!« Hun svarede: »Saa tal!«
१६आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
17 Da sagde han: »Sig til Kong Salomo — dig vil han jo ikke afvise — at han skal give mig Abisjag fra Sjunem til Ægte!«
१७अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
18 Og Batseba svarede: »Vel, jeg skal tale din Sag hos Kongen!«
१८बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
19 Derpaa begav Batseba sig til Kong Salomo for at tale Adonijas Sag; og Kongen rejste sig, gik hende i Møde og bøjede sig for hende; derpaa satte han sig paa sin Trone og lod ogsaa en Trone sætte frem til Kongemoderen, og hun satte sig ved hans højre Side.
१९मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
20 Saa sagde hun: »Jeg har en eneste ringe Bøn til dig; du maa ikke afvise mig!« Kongen svarede: »Kom med din Bøn, Moder, jeg vil ikke afvise dig!«
२०नंतर बथशेबा त्यास म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
21 Da sagde hun: »Lad din Broder Adonija faa Abisjag fra Sjunem til Hustru!«
२१ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
22 Men Kong Salomo svarede sin Moder: »Hvorfor beder du om Abisjag fra Sjunem til Adonija? Du skulde hellere bede om Kongeværdigheden til ham; han er jo min ældre Broder, og Præsten Ebjatar og Joab, Zerujas Søn, staar paa hans Side!«
२२राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”
23 Og Kong Salomo svor ved HERREN: »Gud ramme mig baade med det ene og det andet, om ikke det Ord skal koste Adonija Livet!
२३मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो.
24 Saa sandt HERREN lever, som indsatte mig og gav mig Plads paa min Fader Davids Trone og byggede mig et Hus, som han lovede: Endnu i Dag skal Adonija miste Livet!«
२४इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
25 Derpaa gav Kong Salomo Benaja, Jojadas Søn, Ordre til at hugge ham ned; saaledes døde han.
२५राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
26 Men til Præsten Ebjatar sagde Kongen: »Begiv dig til din Landejendom i Anatot, thi du har forbrudt dit Liv; og naar jeg ikke dræber dig i Dag, er det, fordi du bar den Herre HERRENS Ark foran min Fader David og delte alle min Faders Lidelser!«
२६मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
27 Derpaa afsatte Salomo Ebjatar fra hans Stilling som HERRENS Præst for at opfylde det Ord, HERREN havde talet mod Elis Hus i Silo.
२७शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
28 Da Rygtet, herom naaede Joab — Joab havde jo sluttet sig til Adonijas Parti, medens han ikke havde sluttet sig til Absaloms — søgte han Tilflugt i HERRENS Telt og greb fat om Alterets Horn,
२८ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.
29 og det meldtes Kong Salomo, at Joab havde søgt Tilflugt i HERRENS Telt og stod ved Alteret. Da sendte Salomo Benaja, Jojadas Søn, derhen og sagde: »Gaa hen og hug ham ned!«
२९“कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
30 Og da Benaja kom til HERRENS Telt, sagde han til ham: »Saaledes siger Kongen: Kom herud!« Men han svarede: »Nej, her vil jeg dø!« Benaja meldte da tilbage til Kongen, hvad Joab havde sagt og svaret ham.
३०बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.
31 Men Kongen sagde til ham: »Saa gør, som han siger, hug ham ned og jord ham og fri mig og min Faders Hus for det uskyldige Blod, Joab har udgydt;
३१तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
32 HERREN vil lade hans Blodskyld komme over hans eget Hoved, at han huggede to Mænd ned, der var retfærdigere og bedre end han selv, og slog dem ihjel med Sværdet uden min Fader Davids Vidende, Abner, Ners Søn, Israels Hærfører, og Amasa, Jeters Søn, Judas Hærfører;
३२त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडिल दावीद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन मनुष्यांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.
33 saa kommer deres Blod over Joabs og hans, Slægts Hoved evindelig, medens HERREN giver David og hans Slægt, hans Hus og hans Trone Fred til evig Tid!«
३३त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
34 Da gik Benaja, Jojadas Søn, hen og huggede ham ned og dræbte ham; og han blev jordet i sit Hus i Ørkenen.
३४तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.
35 Og Kongen satte Benaja Jojadas Søn, over Hæren i hans Sted, medens han gav Præsten Zadok Ebjatars Stilling.
३५यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.
36 Derpaa lod Kongen Simeï kalde og sagde til ham: »Byg dig et Hus i Jerusalem, bliv der og drag ikke bort, hvorhen det end er;
३६मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्यास सांगितले, “इथे यरूशलेमामध्ये स्वत: साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
37 thi den Dag du drager bort og overskrider Kedrons Dal, maa du vide, du er dødsens; da kommer dit Blod over dit Hoved!«
३७हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”
38 Og Simeï svarede Kongen: »Godt! Som min Herre Kongen siger, saaledes vil din Træl gøre!« Simeï blev nu en Tid lang i Jerusalem.
३८तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील,” मग शिमी यरूशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.
39 Men efter tre Aars Forløb flygtede to af Simeïs Trælle til Ma'akas Søn, Kong Akisj af Gat, og da Simeï fik at vide, at hans Trælle var i Gat,
३९पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.”
40 brød han op, sadlede sit Æsel og drog til Akisj i Gat for at hente sine Trælle; Simeï drog altsaa af Sted og fik sine Trælle med hjem fra Gat.
४०तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
41 Men da Salomo fik af vide, at Simeï var rejst fra Jerusalem til Gat og kommet tilbage igen,
४१शिमी यरूशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.
42 lod Kongen ham kalde og sagde til ham: »Tog jeg dig ikke i Ed ved HERREN, og advarede jeg dig ikke: Den Dag du drager bort og begiver dig andetsteds hen, hvor det end er, maa du vide, du er dødsens! Og svarede du mig ikke: Godt! Jeg har hørt det?
४२तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्यास म्हणाला, “यरूशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला परमेश्वराची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्यास कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.
43 Hvorfor holdt du da ikke den Ed, du svor ved HERREN, og den Befaling, jeg gav dig?«
४३परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?”
44 Endvidere sagde Kongen til Simeï: »Du ved selv, og dit Hjerte er sig det bevidst, alt det onde, du gjorde min Fader David; nu lader HERREN din Ondskab komme over dit eget Hoved;
४४मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.
45 men Kong Salomo skal være velsignet, og Davids Trone skal staa urokkelig fast for HERRENS Aasyn til evig Tid!«
४५पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”
46 Derpaa gav Kongen Ordre til Benaja, Jojadas Søn, og han gik hen og huggede ham ned; saaledes døde han.
४६मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.

< Første Kongebog 2 >