< Romerne 16 >
1 Men jeg anbefaler eder Føbe, vor Søster, som er Tjenerinde ved Menigheden i Kenkreæ,
१आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की,
2 for at I maa modtage hende i Herren, som det sømmer sig de hellige, og yde hende Bistand, i hvad som helst hun maatte trænge til eder; thi ogsaa hun har været en Hjælperske for mange og for mig selv med.
२तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.
3 Hilser Priska og Akvila, mine Medarbejdere i Kristus Jesus,
३ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या.
4 som jo for mit Liv have sat deres egen Hals i Vove, hvem ikke alene jeg takker, men ogsaa alle Hedningernes Menigheder;
४यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात.
5 og hilser Menigheden i deres Hus! Hilser Epænetus, min elskede, som er Asiens Førstegrøde for Kristus.
५त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे.
6 Hilser Maria, som har arbejdet meget for eder.
६मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत.
7 Hilser Andronikus og Junias, mine Frænder og mine medfangne, som jo ere navnkundige iblandt Apostlene og tilmed have været i Kristus før mig.
७माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते.
8 Hilser Ampliatus, min elskede i Herren!
८प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या.
9 Hilser Urbanus, vor Medarbejder i Kristus, og Stakys, min elskede!
९ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या.
10 Hilser Apelles, den prøvede i Kristus. Hilser dem, som ere af Aristobulus's Hus.
१०ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या.
11 Hilser Herodion, min Frænde! Hilser dem af Narkissus's Hus, som ere i Herren.
११माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या.
12 Hilser Tryfæna og Tryfosa, som arbejde i Herren. Hilser Persis, den elskede, som jo har arbejdet meget i Herren.
१२प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत.
13 Hilser Rufus, den udvalgte i Herren, og hans og min Moder!
१३प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे.
14 Hilser Asynkritus, Flegon, Hermes, Patrobas, Hermas og Brødrene hos dem!
१४असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्या बांधवांना सलाम द्या.
15 Hilser Filologus og Julia, Nereus og hans Søster og Olympas og alle de hellige hos dem!
१५फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या.
16 Hilser hverandre med et helligt Kys! Alle Kristi Menigheder hilse eder!
१६पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.
17 Men jeg formaner eder, Brødre! til at give Agt paa dem, som volde Splittelserne og Forargelserne tvært imod den Lære, som I have lært, og viger bort fra dem!
१७आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
18 Thi saadanne tjene ikke vor Herre Kristus, men deres egen Bug, og ved søde Ord og skøn Tale forføre de de troskyldiges Hjerter.
१८कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;
19 Eders Lydighed er jo kommen alle for Øre; derfor glæder jeg mig over eder. Men jeg vil, at I skulle være vise med Hensyn til det gode og enfoldige med Hensyn til det onde.
१९कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.
20 Men Fredens Gud skal hastelig knuse Satan under eders Fødder. Vor Herres Jesu Kristi Naade være med eder!
२०आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
21 Timotheus, min Medarbejder, og Lukius og Jason og Sosipater, mine Frænder, hilse eder.
२१माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात.
22 Jeg, Tertius, som har nedskrevet dette Brev, hilser eder i Herren.
२२हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे.
23 Kajus, min og den hele Menigheds Vært, hilser eder. Erastus, Stadens Rentemester, hilser eder, og Broderen Kvartus. [
२३माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.
24 Vor Herres Jesu Kristi Naade være med eder alle! Amen.]
२४
25 Men ham, som kan styrke eder i mit Evangelium og Forkyndelsen af Jesus Kristus, i Overensstemmelse med Aabenbarelse af en Hemmelighed, som var fortiet fra evige Tider, (aiōnios )
२५आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले, (aiōnios )
26 men nu er bragt for Dagen og ved profetiske Skrifter efter den evige Guds Befaling kundgjort for alle Hedningerne til Tros-Lydighed: (aiōnios )
२६पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे, (aiōnios )
27 den ene vise Gud ved Jesus Kristus, ham være Ære i Evigheders Evighed! Amen. (aiōn )
२७त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn )