< Salme 37 >
1 Af David. Lad din Vrede ikke optændes imod de onde; vær ikke nidkær imod dem, som gøre Uret;
१दाविदाचे स्तोत्र. दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
2 thi de skulle hastelig falme som Græs, og visne som grønne Urter.
२कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
3 Forlad dig paa Herren og gør godt; bo i Landet og nær dig trolig;
३परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4 og forlyst dig i Herren, saa skal han give dig dit Hjertes Begæring.
४परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5 Vælt din Vej paa Herren og forlad dig paa ham, han skal gøre det.
५तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6 Og han skal føre din Retfærdighed frem som Lyset og din Ret som Middagsglansen.
६तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7 Ti for Herren og forvent ham; lad din Vrede ikke optændes imod den Mand, hvis Vej lykkes, imod den Mand, som øver Underfundighed.
७परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
8 Lad af fra Vrede og lad Heftighed fare, lad din Vrede ikke optændes, den er kun til at gøre ondt.
८रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
9 Thi de onde skulle udryddes, men de, som bie efter Herren, de skulle arve Landet.
९कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10 Og endnu et lidet, saa er den ugudelige ikke mere; og naar du giver Agt paa hans Sted, da er han borte.
१०थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11 Men de sagtmodige skulle arve Landet og forlyste sig over stor Fred.
११परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12 Den ugudelige optænker Skalkhed imod den retfærdige og skærer Tænder imod ham.
१२दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13 Herren skal le ad ham; thi han ser, at hans Dag er kommen.
१३प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14 De ugudelige have uddraget Sværd og spændt deres Bue at fælde en elendig og fattig, at tage Livet af dem, som vandre i Oprigtighed.
१४जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15 Deres Sværd skal komme i deres eget Hjerte, og deres Buer skulle sønderbrydes.
१५परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16 Det lidet, som den retfærdige har, er bedre end mange ugudeliges Gods.
१६अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17 Thi de ugudeliges Arme skulle sønderbrydes; men Herren opholder de retfærdige.
१७कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
18 Herren kender de retsindiges Dage, og deres Arv skal blive evindelig.
१८परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
19 De skulle ikke beskæmmes i den onde Tid, og de skulle mættes i Hungers Dage.
१९वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20 Thi de ugudelige skulle omkomme, ja, Herrens Fjender, som Engenes Pragt; de ere forsvundne, i Røg forsvundne.
२०परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
21 En ugudelig maa tage til Laans, og kan ikke betale; men en retfærdig kan forbarme sig og giver.
२१दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
22 Thi Herrens velsignede skulle arve Landet; men hans forbandede skulle udryddes.
२२जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
23 Af Herren stadfæstes en Mands Gang, og han vil have Velbehag til hans Vej.
२३मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
24 Naar han falder, bliver han ikke liggende; thi Herren holder fast ved hans Haand.
२४जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
25 Jeg har været ung og er bleven gammel; men jeg har ikke set en retfærdig forladt eller hans Sæd at søge efter Brødet.
२५मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
26 Han forbarmer sig den ganske Dag og laaner ud, og hans Sæd skal blive til en Velsignelse.
२६सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
27 Vig fra ondt, og gør godt, saa skal du blive boende evindelig.
२७वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
28 Thi Herren elsker Ret og forlader ikke sine hellige, de ere bevarede evindelig; men de ugudeliges Sæd er udryddet.
२८कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
29 De retfærdige skulle arve Landet og bo der evindelig.
२९नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
30 En retfærdigs Mund skal tale Visdom, og hans Tunge skal forkynde Ret.
३०नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
31 Hans Guds Lov er i hans Hjerte; hans Trin skulle ikke glide.
३१त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
32 En ugudelig lurer paa den retfærdige og søger efter at dræbe ham.
३२परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
33 Herren skal ikke overlade ham i hans Haand og ej kende ham skyldig, naar han dømmes.
३३परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
34 Bi efter Herren og var paa hans Vej, saa skal han ophøje dig til at arve Landet; du skal se paa de ugudeliges Udryddelse.
३४परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
35 Jeg saa en ugudelig, en Voldsmand; han udbredte sig som et grønt Rodskud.
३५मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
36 Men han forsvandt og se, han var ikke mere; og jeg søgte efter ham, men han fandtes ikke.
३६परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
37 Tag Vare paa den retsindige, og se hen til den oprigtige, thi Fredens Mand har en Fremtid.
३७प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
38 Men Overtrædere skulle ødelægges til Hobe; de ugudeliges Fremtid er borte.
३८पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
39 Men de retfærdiges Frelse er af Herren, han er deres Styrke i Nødens Tid.
३९नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
40 Og Herren skal hjælpe dem og udfri dem; han skal udfri dem fra de ugudelige og frelse dem; thi de have forladt sig paa ham.
४०परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.