< Matthæus 11 >
1 Og det skete, da Jesus var færdig med at give sine tolv Disciple Befaling, gik han videre derfra for at lære og prædike i deres Byer.
१येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
2 Men da Johannes hørte i Fængselet om Kristi Gerninger, sendte han Bud med sine Disciple og lod ham sige:
२बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.
3 „Er du den, som kommer, eller skulle vi vente en anden?‟
३आणि त्यास विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4 Og Jesus svarede og sagde til dem: „Gaar hen, og forkynder Johannes de Ting, som I høre og se:
४येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.
5 blinde se, og lamme gaa, spedalske renses, og døve høre, og døde staa op, og Evangeliet forkyndes for fattige;
५आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
6 og salig er den, som ikke forarges paa mig.‟
६जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे.”
7 Men da disse gik bort, begyndte Jesus at sige til Skarerne om Johannes: „Hvad gik I ud i Ørkenen at skue? Et Rør, som bevæges hid og did af Vinden?
७मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
8 Eller hvad gik I ud at se? Et Menneske, iført bløde Klæder? Se, de, som bære bløde Klæder, ere i Kongernes Huse.
८तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात.
9 Eller hvad gik I ud at se? En Profet? Ja, siger jeg eder, endog mere end en Profet.
९तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.
10 Thi han er den, om hvem der er skrevet: Se, jeg sender min Engel for dit Ansigt, han skal berede din Vej foran dig.
१०त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.
11 Sandelig, siger jeg eder, iblandt dem, som ere fødte af Kvinder, er ingen større fremstaaet end Johannes Døberen; men den mindste i Himmeriges Rige er større end han.
११मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
12 Men fra Johannes Døberens Dage indtil nu tages Himmeriges Rige med Vold, og Voldsmænd rive det til sig.
१२बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात.
13 Thi alle Profeterne og Loven have profeteret indtil Johannes.
१३कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले.
14 Og dersom I ville tage imod det: Han er Elias, som skal komme.
१४आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
15 Den, som har Øren at høre med, han høre!
१५ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
16 Men hvem skal jeg ligne denne Slægt ved? Den ligner Børn, som sidde paa Torvene og raabe til de andre og sige:
१६या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.
17 Vi blæste paa Fløjte for eder, og I dansede ikke; vi sang Klagesange, og I jamrede ikke.
१७आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.
18 Thi Johannes kom, som hverken spiste eller drak, og de sige: Han er besat.
१८योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे.
19 Menneskesønnen kom, som spiser og drikker, og de sige: Se, en Fraadser og en Vindranker, Tolderes og Synderes Ven! Dog, Visdommen er retfærdiggjort ved sine Børn.‟
१९मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.
20 Da begyndte han at skamme de Byer ud, i hvilke hans fleste kraftige Gerninger vare gjorte, fordi de ikke havde omvendt sig:
२०तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
21 „Ve dig, Korazin! ve dig, Bethsajda! thi dersom de kraftige Gerninger, som ere skete i eder, vare skete i Tyrus og Sidon, da havde de for længe siden omvendt sig i Sæk og Aske.
२१“हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.
22 Men jeg siger eder: Det skal gaa Tyrus og Sidon taaleligere paa Dommens Dag end eder.
२२पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
23 Og du, Kapernaum! som er bleven ophøjet indtil Himmelen, du skal nedstødes indtil Dødsriget; thi dersom de kraftige Gerninger, som ere skete i dig, vare skete i Sodoma, da var den bleven staaende indtil denne Dag. (Hadēs )
२३आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते. (Hadēs )
24 Men jeg siger eder: Det skal gaa Sodomas Land taaleligere paa Dommens Dag end dig.‟
२४पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
25 Paa den Tid udbrød Jesus og sagde: „Jeg priser dig, Fader, Himmelens og Jordens Herre! fordi du har skjult dette for vise og forstandige og aabenbaret det for umyndige.
२५मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.
26 Ja, Fader! thi saaledes skete det, som var velbehageligt for dig.
२६होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते.
27 Alle Ting ere mig overgivne af min Fader; og ingen kender Sønnen uden Faderen, og ingen kender Faderen uden Sønnen, og den, for hvem Sønnen vil aabenbare ham.
२७माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
28 Kommer hid til mig alle, som lide Møje og ere besværede, og jeg vil give eder Hvile.
२८अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
29 Tager mit Aag paa eder, og lærer af mig; thi jeg er sagtmodig og ydmyg af Hjertet; saa skulle I finde Hvile for eders Sjæle.
२९मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
30 Thi mit Aag er gavnligt, og min Byrde er let.‟
३०कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”