< Johannes 21 >
1 Siden aabenbarede Jesus sig atter for Disciplene ved Tiberias-Søen; men han aabenbarede sig saaledes.
१आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले.
2 Simon Peter og Thomas, hvilket betyder Tvilling, og Nathanael fra Kana i Galilæa og Zebedæus's Sønner og to andre af hans Disciple vare sammen.
२शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
3 Simon Peter siger til dem: „Jeg gaar ud at fiske.‟ De sige til ham: „Ogsaa vi gaa med dig.‟ De gik ud og gik om Bord i Skibet, og den Nat fangede de intet.
३शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही.
4 Men da det nu blev Morgen, stod Jesus ved Søbredden; dog vidste Disciplene ikke, at det var Jesus.
४पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
5 Jesus siger da til dem: „Børnlille! have I noget at spise?‟ De svarede ham: „Nej.‟
५तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.”
6 Men han sagde til dem: „Kaster Garnet ud paa højre Side af Skibet, saa skulle I finde.‟ Da kastede de det ud, og de formaaede ikke mere at drage det for Fiskenes Mængde.
६आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.
7 Den Discipel, som Jesus elskede, siger da til Peter: „Det er Herren.‟ Da Simon Peter nu hørte, at det var Herren, bandt han sin Fiskerkjortel om sig (thi han var nøgen), og kastede sig i Søen.
७तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.
8 Men de andre Disciple kom med Skibet, thi de vare ikke langt fra Land, kun omtrent to Hundrede Alen, og de slæbte efter sig Garnet med Fiskene.
८आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
9 Da de nu kom i Land, se de der en Kulild og Fisk ligge derpaa og Brød.
९तेव्हा ते किनार्यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.
10 Jesus siger til dem: „Bringer hid af de Fisk, som I nu fangede.‟
१०येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
11 Simon Peter steg op og trak Garnet paa Land, fuldt af store Fisk, et Hundrede og tre og halvtredsindstyve, og skønt de vare saa mange, sønderreves Garnet ikke.
११तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
12 Jesus siger til dem: „Kommer og holder Maaltid!‟ Men ingen af Disciplene vovede at spørge ham: „Hvem er du?‟ thi de vidste, at det var Herren.
१२येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
13 Jesus kommer og tager Brødet og giver dem det, ligeledes ogsaa Fiskene.
१३तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.
14 Dette var allerede den tredje Gang, at Jesus aabenbarede sig for sine Disciple, efter at han var oprejst fra de døde.
१४येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.
15 Da de nu havde holdt Maaltid, siger Jesus til Simon Peter: „Simon, Johannes's Søn, elsker du mig mere end disse?‟ Han siger til ham: „Ja, Herre! du ved, at jeg har dig kær.‟ Han siger til ham: „Vogt mine Lam!‟
१५मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.”
16 Han siger atter anden Gang til ham: „Simon, Johannes's Søn, elsker du mig?‟ Han siger til ham: „Ja, Herre! du ved, at jeg har dig kær.‟ Han siger til ham: „Vær Hyrde for mine Faar!‟
१६तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.”
17 Han siger tredje Gang til ham: „Simon, Johannes's Søn, har du mig kær?‟ Peter blev bedrøvet, fordi han tredje Gang sagde til ham: „Har du mig kær?‟ Og han sagde til ham: „Herre! du kender alle Ting, du ved, at jeg har dig kær.‟ Jesus siger til ham: „Vogt mine Faar!
१७तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
18 Sandelig, sandelig, siger jeg dig, da du var yngre, bandt du selv op om dig og gik, hvorhen du vilde; men naar du bliver gammel, skal du udrække dine Hænder, og en anden skal binde op om dig og føre dig derhen, hvor du ikke vil.‟
१८“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
19 Men dette sagde han for at betegne, med hvilken Død han skulde herliggøre Gud. Og da han havde sagt dette, siger han til ham: „Følg mig!‟
१९तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.”
20 Peter vendte sig og saa den Discipel følge, som Jesus elskede, og som ogsaa laa op til hans Bryst ved Nadveren og sagde: „Herre! hvem er den, som forraader dig?‟
२०तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले.
21 Da nu Peter saa ham, siger han til Jesus: „Herre! men hvorledes skal det gaa denne?‟
२१म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?”
22 Jesus siger til ham: „Dersom jeg vil, at han skal blive, indtil jeg kommer, hvad vedkommer det dig? Følg du mig!‟
२२येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”
23 Saa kom da dette Ord ud iblandt Brødrene: „Denne Discipel dør ikke; ‟ og Jesus havde dog ikke sagt til ham, at han ikke skulde dø, men: „Dersom jeg vil, at han skal blive, indtil jeg kommer, hvad vedkommer det dig?‟
२३तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”
24 Dette er den Discipel, som vidner om disse Ting og har skrevet dette; og vi vide, at hans Vidnesbyrd er sandt.
२४जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.
25 Men der er ogsaa mange andre Ting, som Jesus har gjort, og dersom de skulde skrives enkeltvis, mener jeg, at ikke hele Verden kunde rumme de Bøger, som da bleve skrevne.
२५आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.