< Job 2 >
1 Og det skete en Dag, der Guds Børn kom for at fremstille sig for Herren, da kom ogsaa Satan midt iblandt dem for at fremstille sig for Herren.
१पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता.
2 Da sagde Herren til Satan: Hvorfra kommer du? og Satan svarede Herren og sagde: Fra at gaa omkring i Landet og vandre om derudi.
२परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे.”
3 Og Herren sagde til Satan: Har du givet Agt paa min Tjener Job? thi der er ingen som han i Landet, en oprigtig og retskaffen Mand, som frygter Gud og viger fra det onde, og han holder endnu fast ved sin Retsindighed; men du har tilskyndet mig imod ham at ødelægge ham uden Aarsag.
३नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तूझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे, तो देवाचे भय धरीतो आणि दुष्ट गोष्टींपासून दूर राहतो. जरी त्याच्याविरुध्द कोणतेही कारण नसतांना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केले, तरीही त्याने आपली सात्विक्ता अंखड धरून ठेवली आहे.”
4 Da svarede Satan Herren og sagde: Hud for Hud, ja alt det, en Mand har, giver han for sit Liv.
४सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल.
5 Dog udræk nu din Haand og rør ved hans Ben og hans Kød; hvad gælder det, om han ikke skal fornægte dig lige for dit Ansigt?
५परंतु जर तू तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास, तर तो तुझ्या तोंडावर तुझा नकार करील.”
6 Og Herren sagde til Satan: Se, han være i din Haand; dog var hans Liv!
६परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव.”
7 Da for Satan ud fra Herrens Ansigt og slog Job med onde Bylder fra hans Fodsaal og indtil hans Isse.
७मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले.
8 Og han tog sig et Potteskaar til at skrabe sig med, og han sad midt i Asken.
८ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला.
9 Og hans Hustru sagde til ham: Holder du endnu fast ved din Retsindighed? velsign Gud og dø!
९नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, “तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा,”
10 Men han sagde til hende: Du taler, ligesom en af de daarlige Kvinder taler; skulde vi alene tage imod det gode af Gud og ikke tage imod det onde? I alt dette syndede Job ikke med sine Læber.
१०परंतू तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.
11 Og der Jobs tre Venner hørte al den Ulykke, som var kommen over ham, da kom de, hver fra sit Sted: Themaniten Elifas og Sukiten Bildad og Naamathiten Zofar, og de forenede sig med hverandre for at komme at vise ham Medynk og trøste ham.
११ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते, ईयोबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले, तेव्हा ते आपआपल्या ठिकाणाहून आले.
12 Men der de opløftede deres Øjne langtfra, da kendte de ham ikke, og de opløftede deres Røst og græd, og de sønderrev hver sin Kappe, og de kastede Støv paa deres Hoveder op imod Himmelen.
१२जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली.
13 Og de sade hos ham paa Jorden syv Dage og syv Nætter, og ingen talte et Ord til ham; thi de saa, at Pinen var saare stor.
१३मग ते त्याच्याबरोबर सात दिवस आणि सात रात्री जमीनीवर बसून राहिले, आणि त्याच्याशी एक शब्दही कोणी बोलले नाही कारण त्याचा शोक अतिशय तीव्र होता असे त्यांनी पाहीले.