< Jeremias 46 >
1 Herrens Ord, som kom til Profeten Jeremias, imod Hedningerne.
१परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे.
2 Imod Ægypten, imod Farao-Neko, Kongen af Ægyptens Hær, som stod ved Floden Eufrat fra Karkemis, og som Nebukadnezar, Kongen af Babel, slog i Judas Konge Jojakims, Josias's Søns fjerde Aar:
२मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
3 Bereder smaa Skjolde og store Skjolde, og kommer frem til Striden.
३लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
4 Spænder Hestene for og stiger op paa Hestene, og stiller eder frem med Hjelme paa; polerer Spydene, ifører eder Panserne!
४तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
5 Hvorfor ser jeg dem forfærdede og vigende tilbage, og at deres vældige knuses og ilsomt fly uden at se tilbage? Rædsel trindt omkring, siger Herren.
५हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
6 Den lette skal ikke undfly, og den vældige ikke undkomme; imod Nord, ved Bredden af Floden Eufrat, snuble de og falde.
६चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
7 Hvo er denne, der stiger op som Nilen, hvis Vande bølge som Floderne?
७नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
8 Ægypten stiger op som Nilen, og Vandene bølge som Floderne; og det sagde: Jeg vil stige op, bedække Landet, ødelægge Stæder og dem, som bo deri.
८उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
9 Drager op, I Heste! og raser, I Vogne! og lader de vældige drage ud: Morland og Put, udrustede med Skjold, og Ludierne, de i øvede Bueskytter.
९घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
10 Og denne Dag er Herrens, den Herre Zebaoths Hævns Dag, da han vil hævne sig paa sine Modstandere, og Sværdet skal fortære dem, og blive mæt og vædet af deres Blod; thi Herren, den Herre Zebaoth har Slagtoffer i Nordenland ved Floden Eufrat.
१०कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
11 Drag op til Gilead og hent Balsam, du Jomfru, Ægyptens Datter! forgæves bruger du megen Lægedom; der er ingen Helbredelse for dig.
११“हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
12 Folkefærd hørte din Skam, og dit Klagemaal fyldte Landet; thi den vældige snublede over den vældige, de faldt begge tilsammen.
१२राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
13 Det Ord, som Herren talte til Profeten Jeremias, om at Nebukadnezar, Kongen af Babel, skulde komme at slaa Ægyptens Land:
१३जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
14 Kundgører det i Ægypten, og lader det høres i Migdol, og lader det høres i Nof og i Thakpankes; siger: Stil dig frem, lav dig til, thi Sværdet har fortæret, hvad der er trindt omkring dig.
१४मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
15 Hvorfor ere dine mægtige slagne ned? de holdt ikke Stand, thi Herren stødte dem ned.
१५तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
16 Han bragte mange til at snuble; den ene faldt endog over den anden, og de sagde: Staar op og lader os vende tilbage til vort Folk og til vort Fædreland, for Ødelæggelsens Sværd.
१६जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
17 Der raabte de: Farao, Kongen af Ægypten, er et Bulder; han lod den bestemte Tid gaa forbi.
१७त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
18 Saa sandt jeg lever, siger Kongen, hvis Navn er Herre Zebaoth: Som Tabor iblandt Bjergene og som Karmel ved Havet, skal han komme.
१८ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
19 Skaf dig Rejsetøj, du Indbyggerske, Ægyptens Datter I thi Nof skal blive øde og opbrændes, saa at ingen skal bo deri.
१९अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर. कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
20 Ægypten er en saare dejlig Kvie; Fordærvelse fra Norden kommer, den kommer.
२०मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
21 Ogsaa dets Lejesvende i dets Midte, der ere som fedede Kalve, ogsaa disse vende om, de fly til Hobe, de holde ikke Stand; thi deres Fordærvelses Dag kommer over dem, deres Hjemsøgelses Tid.
२१तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
22 Dets Lyd er som Slangens, der bevæger sig frem; thi med en Hær rykke de frem, og med Økser anfalde de det som de, der ville omhugge Træer.
२२मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
23 De skulle udrydde dets Skov, siger Herren, thi den er uigennemtrængelig; thi de ere flere end Græshopper, og der er ikke Tal paa dem.
२३परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
24 Ægyptens Datter er beskæmmet, hun er given i Nordens Folks Haand.
२४मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
25 Den Herre Zebaoth, Israels Gud, siger: Se, jeg hjemsøger Amon fra No og Farao og Ægypten, og dets Guder og dets Konger, ja Farao og dem, som forlade sig paa ham.
२५सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन.
26 Og jeg vil give dem i deres Haand, som søge efter deres Liv, i Nebukadnezar, Kongen af Babels, Haand, og i hans Tjeners Haand; og derefter skal det holde sig roligt, ligesom i gamle Dage, siger Herren.
२६मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
27 Men du, frygt du ej, min Tjener Jakob, og forfærdes ikke, Israel; thi se, jeg frelser dig fra et langt bortliggende Land og din Sæd fra deres Fangenskabs Land; og Jakob skal komme tilbage og bo stille og roligt, og ingen skal forfærde ham.
२७परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
28 Frygt du ej, min Tjener Jakob! siger Herren, thi jeg er med dig; thi jeg vil lade det tage en Ende med alle de Folk, til hvilke jeg havde fordrevet dig; men med dig vil jeg ikke lade det tage Ende, men tugte dig med Maade og ikke lade dig slippe aldeles fri.
२८परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”