< Jeremias 37 >
1 Og Kong Zedekias, Josias's Søn, blev Konge i Stedet for Konias, Jojakims Søn; ham satte Nebukadnezar, Kongen af Babel, til Konge i Judas Land.
१आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते.
2 Men han og hans Tjenere og Folket i Landet hørte ikke Herrens Ord, som han talte ved Profeten Jeremias.
२पण सिद्कीया, त्याच्या सेवकांनी व यहूदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत.
3 Dog sendte Kong Zedekias Jukal, Selemjas Søn, og Præsten Zefanja, Maasejas Søn, til Profeten Jeremias, og lod sige: Kære, bed for os til Herren vor Gud!
३म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”
4 Og Jeremias gik ind og gik ud midt iblandt Folket, og man havde ikke sat ham i Fængsel.
४आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते.
5 Og Faraos Hær var draget ud af Ægypten; og da Kaldæerne, som belejrede Jerusalem, hørte Rygtet om dem, droge de op fra Jerusalem.
५मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले.
6 Og Herrens Ord kom til Jeremias, Profeten, saalunde:
६नंतर यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
7 Saa siger Herren, Israels Gud: Saa skulle I sige til Judas Konge, som sender eder til mig for at adspørge mig: Se, Faraos Hær, som er uddraget eder til Hjælp, skal vende om til sit Land Ægypten;
७“परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल.
8 og Kaldæerne skulle komme tilbage og stride imod denne Stad, og de skulle indtage den og opbrænde den med Ild.
८खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील.
9 Saa siger Herren: Bedrager ikke eder selv, idet I sige: Kaldæerne skulle visselig drage fra os; thi de skulle ikke drage bort.
९परमेश्वर असे म्हणतो, खास्दी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वत: ची फसवणूक करून घेऊ नका. कारण ते निघून जाणार नाहीत.
10 Thi om I end sloge hele Kaldæernes Hær, som strider imod eder, og der kun blev nogle saarede Mænd tilovers af dem, skulle dog disse rejse sig, hver i sit Telt, og opbrænde denne Stad med Ild.
१०जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खास्दी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्यांच्या तंबूत उरले, तरीसुद्धा ते उठून हे शहर जाळतील.”
11 Og det skete, der Kaldæernes Hær var draget op fra Jerusalem for Faraos Hærs Skyld,
११जसे फारोचे सैन्य येत होते, तेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, यरूशलेम सोडले,
12 da gik Jeremias ud af Jerusalem for at gaa til Benjamins Land at hente sin Del derfra, midt iblandt Folket.
१२तेव्हा यिर्मया, यरूशलेमेतून बन्यामिनाच्या देशात गेला. तो त्याच्या लोकां मध्ये प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी जाण्यास निघाला.
13 Ojg som han var i Benjamins Port, da var der en Befalingsmand, hvis Navn var Jerija, Selemjas Søn, Hananjas Sønnesøn; og han greb Profeten Jeremias og sagde: Du vil gaa over til Kaldæerne.
१३तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”
14 Og Jeremias sagde: Det er Løgn, jeg vil ikke gaa over til Kaldæerne; men han vilde ikke høre ham, og Jerija greb Jeremias og førte ham til Fyrsterne.
१४परंतु यिर्मया म्हणाला, “हे खरे नाही. मी फितून खास्द्यांकडे जात नाही” पण इरीयाने त्याचे ऐकले नाही. त्यांने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्यांकडे आणले.
15 Og Fyrsterne bleve vrede paa Jeremias og sloge ham; og de kastede ham i Fængselet i Skriveren Jonathans Hus; thi det havde de gjort til et Fængsel.
१५ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते.
16 Saa kom da Jeremias i Fangehullet og ned i Kælderne, og Jeremias blev der mange Dage.
१६म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.
17 Og Kong Zedekias sendte Bud og lod ham hente, og Kongen spurgte ham i sit Hus i Løndom og sagde: Er der Ord fra Herren? Og Jeremias sagde: Ja, der er; og han sagde: Du skal gives i Kongen af Babels Haand.
१७मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.”
18 Og Jeremias sagde til Kong Zedekias: Hvad har jeg syndet imod dig og imod dine Tjenere og imod dette Folk, at I have kastet mig i Fængselet?
१८मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “मी तुझ्याविरूद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरूद्ध व यरूशलेमेच्या लोकांविरूद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदिशाळेत टाकले आहेस?
19 Og hvor ere eders Profeter, som spaaede for eder og sagde: Kongen af Babel skal ikke komme over eder eller over dette Land?
१९तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?
20 Og nu, hør dog, min Herre Konge, kære, lad min ydmyge Begæring komme ind for dit Ansigt, og lad mig ikke føre tilbage til Skriveren Jonathans Hus, at jeg ikke skal dø der.
२०पण आता, हे माझ्या स्वामी राजा ऐक, माझी विनंती तुझ्यासमोर येवो. तू मला परत योनाथान लेखकाच्या घरी पाठवू नकोस, किंवा मी तेथे मरेन.”
21 Og Kong Zedekias bød, og de forvarede Jeremias i Fængselets Forgaard, og han lod ham give et Stykke Brød hver Dag fra Bagernes Gade, indtil alt Brødet i Staden var fortæret; saa blev Jeremias i Fængselets Forgaard.
२१म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.