< Esajas 10 >
1 Ve dem, som give ugudelige Love og udstede uretfærdige Skrivelser
१जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.
2 for at fortrænge de ringe fra deres Ret og for at fravende de elendige iblandt mit Folk deres Ret, at Enkerne maa være deres Bytte, og at de kunne berøve de faderløse!
२ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात, विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.
3 Men hvad ville I gøre imod Hjemsøgelsens Dag og imod den Ødelæggelse, som skal komme langt borte fra? til hvem ville I fly om Hjælp? og hvor ville I lade eders Herlighed blive?
३न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?
4 Enhver, som ikke maa bøje sig iblandt de bundne, skal falde iblandt de ihjelslagne. Med alt dette har hans Vrede ikke lagt sig; men hans Haand er endnu udrakt.
४बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही, कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.
5 Ve Assur, min Vredes Ris! min Harme er Kæppen i hans Haand.
५माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.
6 Jeg sender ham imod et vanhelligt Folk og giver ham Befaling imod det Folk, som jeg er vred paa, til at gøre Bytte og røve Rov og til at træde det ned som Ler paa Gader.
६मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे. मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.
7 Men han, han mener det ikke saa, og hans Hjerte tænker ikke saa; men hans Hu staar til at ødelægge og at udrydde ikke faa Folk.
७परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.
8 Thi han siger: Ere mine Fyrster ikke Konger til Hobe?
८तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
9 Er det ikke gaaet Kalno som Karkemis? ikke Hamath som Arpad? ikke Samaria som Damaskus?
९कालनो कर्कमीशासारखे नाही काय? हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
10 Ligesom min Haand har ramt Afgudernes Riger, hvor der var flere Billeder end i Jerusalem og i Samaria:
१०मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.
11 Mon jeg ikke, saaledes som jeg har gjort ved Samaria og dens Afguder, saaledes skal gøre ved Jerusalem og ved dens Afguder?
११शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले, तसे मी यरूशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?”
12 Og det skal ske, naar Herren har udrettet al sin Gerning paa Zions Bjerg og i Jerusalem, da vil jeg hjemsøge Kongen af Assyriens Hovmods Frugt og hans Hoffærdigheds Pragt.
१२सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
13 Fordi han siger: Ved min Haands Kraft har jeg gjort det og ved min Visdom, thi jeg er forstandig; og jeg borttager Folkenes Landemærker og har røvet deres Forraad, og som den mægtige nedkaster jeg dem, som sidde i Højsædet.
१३कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे, व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
14 Og min Haand har fundet hen til Folkenes Gods som til en Fuglerede, og jeg har sanket alt Landet, som man sanker Æg, der ere forladte; og der var ingen, som rørte en Vinge, eller som oplod Næbet og peb.
१४पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”
15 Kan vel Øksen rose sig imod den, som hugger med den? eller Saven trodse den, som trækker den? som om en Stav vilde svinge den, som opløfter den, eller som om en Kæp vilde opløfte den, som ikke er Træ?
१५कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.
16 Derfor skal Herren, den Herre Zebaoth, sende Magerhed paa hans fede, og under hans Herlighed skal der brænde et Baal som et brændende Baal.
१६म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
17 Og Israels Lys skal vorde en Ild, og hans Hellige skal vorde en Lue; og den skal brænde og fortære hans Torn og Tidsler paa een Dag.
१७इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल; तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.
18 Og hans Skovs og hans Frugthaves Herlighed skal den fortære med Rub og Stub; og han skal blive som en syg, der vansmægter.
१८परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील; जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.
19 Og de overblevne Træer i hans Skov skulle være faa i Tal, og et Barn skal kunne opskrive dem.
१९रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.
20 Og det skal ske paa den Dag, da skulle de overblevne i Israel og de undkomne af Jakobs Hus ikke mere forlade sig paa den, som slaar det; men de skulle forlade sig paa Herren, Israels Hellige, i Oprigtighed.
२०त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.
21 De overblevne skulle omvende sig, de overblevne af Jakob, til den vældige Gud.
२१याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
22 Thi om dit Folk, o Israel! er som Havets Sand, skulle kun de overblevne deraf omvende sig; Fordærvelsen er bestemt, den breder sig ud med Retfærdighed som en Strøm.
२२कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
23 Thi Fordærvelsen og det besluttede Raad skal Herren, den Herre Zebaoth, udføre, midt i hele Landet.
२३कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
24 Derfor, saa siger Herren, den Herre Zebaoth: Frygt ikke, mit Folk! du, som bor i Zion, for Assur; han slaar dig med Staven og opløfter sin Kæp over dig, paa samme Vis som Ægypterne.
२४म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.
25 Thi endnu et lidet, en føje Tid, saa skal Fortørnelsen endes, og min Vrede komme for at fortære dem.
२५त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
26 Og den Herre Zebaoth skal svinge en Svøbe over ham, som da Midian blev slaaet paa Orebs Klippe, og sin Stav, som han hævede over Havet, den skal han opløfte paa samme Vis som i Ægypten.
२६मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.
27 Og det skal ske paa den Dag, da skal hans Byrde borttages fra dine Skuldre og hans Aag fra din Hals; og Aaget skal sprænges for Fedmens Skyld.
२७त्या दिवशी, तुझ्या खाद्यांवरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जूं काढण्यात येईल,” तुझ्या मानेच्या पुष्ठतेमुळे ते जू भंग पावेल.
28 Han kommer over Ajat, han drager igennem Migron, han lader sit Tros blive tilbage i Mikmas.
२८शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे; आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
29 De drage igennem Passet, de blive Natten over i Geba; Rama bæver, Sauls Gibea flyr.
२९त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे. रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.
30 Raab højt, du Gallims Datter! giv Agt, Lajsa! ulykkeligt er Anathoth.
३०गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे! तू बिचारी अनाथोथ!
31 Madmena flygter, Indbyggerne i Gebim samle sig til Flugt.
३१मदमेना पळत आहे, व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.
32 Endnu bliver han staaende denne Dag i Nob; saa løfter han sin Haand imod Zions Hus's Bjerg, imod Jerusalems Høj.
३२आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.
33 Se, Herren, den Herre Zebaoth, skal nedhugge de skønne Grene, saa man gruer; og de ranke Stammer skulle afhugges, og de høje skulle blive lave.
३३पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील; उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.
34 Og den tykke Skov nedhugges med Jernet, og Libanon falder for den Mægtige.
३४रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.