< Ezekiel 4 >
1 Og du Menneskesøn! tag dig en Mursten, og læg den for dit Ansigt, og tegn derpaa en Stad, nemlig Jerusalem.
१परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
2 Og læg en Belejring omkring den, og byg et Vagttaarn imod den, og opkast en Vold imod den, og læg Lejre imod den, og sæt Stormbukke imod den trindt omkring!
२तिला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
3 Men tag du for dig en Jernpande, og stil den som en Jern væg mellem dig og imellem Staden; og ret dit Ansigt imod den, at den kommer i Belejring, og du belejrer den; dette skal være Israels Hus til et Tegn.
३तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
4 Og du, læg dig paa din venstre Side, og læg Israels Hus's Misgerning paa den; saa mange Dage, som du ligger paa den, saa længe skal du bære deres Misgerning.
४मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
5 Og jeg vil gøre dig deres Misgernings Aar til et Antal af Dage, nemlig tre Hundrede og halvfemsindstyve Dage; og du skal bære Israels Hus's Misgerning.
५मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
6 Og naar du faar tilendebragt disse, da skal du lægge dig anden Gang paa din højre Side og bære Judas Hus's Misgerning, fyrretyve Dage; for hvert enkelt Aar sætter jeg dig en Dag.
६जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.
7 Og du skal vende dit Ansigt og din blottede Arm imod Jerusalems Belejring, og du skal spaa imod den.
७आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
8 Og se, jeg vil lægge Reb paa dig, at du ikke skal vende dig fra din ene Side til den anden, indtil du har tilendebragt din Belejrings Dage.
८पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
9 Saa tag du til dig Hvede og Byg og Bønner og Linser og Hirse og Spelt, og kom det i eet Kar og gør dig Brød deraf; efter Antallet af de Dage, som du skal ligge paa din Side, tre Hundrede og halvfemsindstyve Dage, skal du æde det.
९स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
10 Og din Mad, som du skal æde, skal være efter Vægt, tyve Sekel til hver Dag; fra Tid til Tid skal du æde den.
१०हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
11 Du skal og drikke Vand efter Maal, den sjette Part af en Hin; det skal du drikke fra Tid til Tid.
११पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
12 Og du skal æde det som Bygkage, og du skal bage det ved Menneskeskarn for deres Øjne.
१२जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!
13 Og Herren sagde: Saaledes skulle Israels Børn æde deres Brød urent iblandt Hedningerne, hvorhen jeg vil fordrive dem.
१३यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”
14 Men jeg sagde: Ak! Herre, Herre! se, min Sjæl er ikke besmittet, og jeg har ikke fra min Ungdom af og indtil nu ædet noget Aadsel eller noget sønderrevet, og der er ikke kommet urent Kød i min Mund.
१४परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
15 Og han sagde til mig: Se, jeg har givet dig Komøg i Stedet for Menneskeskarn, at du derved kan lave dit Brød.
१५म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वतःसाठी भाकर भाज.”
16 Og han sagde til mig: Du Menneskesøn! se, jeg vil formindske Brøds Forraad i Jerusalem, at de skulle aede Brød efter Vægt og med Bekymring og drikke Vand efter Maal og med Forfærdelse,
१६तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.
17 fordi de skulle have Mangel paa Brød og Vand, saa de forfærdes, den ene med den anden, og hensmægte i deres Misgerning.
१७कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.”