< Ezekiel 11 >
1 Og Aanden opløftede mig og førte mig til den østre Port paa Herrens Hus, den, som er vendt imod Østen, og se, ved Indgangen til Porten var der fem og tyve Mænd; og jeg saa Jaasanja, Assurs Søn, midt iblandt dem, og Pelatja, Benajas Søn, Folkets Fyrster.
१नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते.
2 Og han sagde til mig: Du Menneskesøn! det er de Mænd, som udtænke Uret, og som give onde Raad i denne Stad;
२परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात.
3 og som sige: Det er ikke saa nær, at vi skulle bygge Huse; denne er Gryden, og vi ere Kødet.
३ते म्हणतात, ‘घरे बांधण्याचा समय अजून जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे, आणि आपण मांस आहोत.’
4 Derfor spaa imod dem, spaa, du Menneskesøn!
४म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भविष्यवाणी कर.”
5 Og Herrens Aand faldt paa mig, og han sagde til mig: Sig, saa siger Herren: Saaledes sige I af Israels Hus, men de Tanker, som opstige i eders Aand, kender jeg.
५त्यानंतर परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला परमेश्वर देव असे सांगतो असे म्हण, तू असे इस्राएलाच्या घराण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो.
6 I have gjort dem af eder ihjelslagne mange i denne Stad og fyldt dens Gader med ihjelslagne.
६शहरात, रस्त्यावर मारलेल्या लोकांस, दुप्पट करा आणि रस्त्ये त्यांनी भरुन टाका.
7 Derfor, saa siger den Herre, Herre: Eders ihjelslagne, som I have lagt midt i den, de ere Kødet, og den selv er Gryden; men eder skal man udføre midt af den.
७म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांस तुम्ही मारले त्यांची प्रेते यरूशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहेत, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातून घेऊन यायचे आहे.
8 For Sværdet frygte I, og Sværdet vil jeg lade komme over eder, siger den Herre, Herre.
८तुम्ही तलवारीला घाबरला, तर मी तलवार तुम्हावर आणिन, हे परमेश्वर देवाचा जाहीर नामा आहे
9 Og jeg vil udføre eder midt af den og give eder i fremmedes Haand og holde Dom over eder.
९मी तुम्हास शहराच्या मध्य भागातून घेऊन येईन आणि परदेशांच्या मस्तकावर तुम्हास ठेवीन, कारण त्यांच्या विरुध्द न्याय करेन.
10 For Sværdet skulle I falde, paa Israels Grænse vil jeg dømme eder; og I skulle fornemme, at jeg er Herren.
१०त्यांचा पाडाव मी तलवारीने करेन. इस्राएलाच्या वेशीत त्याचा न्याय करेन मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.
11 Den, den skal ikke blive eder Gryden, saa at I blive Kødet derudi; ved Israels Grænse vil jeg dømme eder.
११हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही. त्यांच्यामध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्राएलाच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे.
12 Og I skulle fornemme, at jeg er Herren, fordi I ikke have vandret efter mine Skikke og ikke holdt mine Bud, men gjort efter Hedningernes Vis, som ere trindt omkring eder.
१२मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.
13 Og det skete, der jeg spaaede, da døde Pelatja, Benajas Søn; og jeg faldt ned paa mit Ansigt og raabte med høj Røst og sagde: Ak, Herre, Herre! du gør det jo aldeles af med det overblevne af Israel!
१३मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्याचा मुलगा बनाया मरण पावला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, “आहा! हे प्रभू परमेश्वर देवा तू उरलेल्या इस्राएलाच्या लोकांस पूर्ण शेवट केलास काय?”
14 Da kom Herrens Ord til mig, og han sagde:
१४परमेश्वर देवाचा शब्द मला कळला, व मला म्हणाला,
15 Du Menneskesøn! dine Brødre, dine Brødre ere dine næste Slægtninge og hele Israels Hus, alle de, til hvilke de, som bo i Jerusalem, sige: Gaar bort langt fra Herren, os er dette Land givet til Ejendom.
१५“मानवाच्या मुला, जे यरूशलेमनिवासी, तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, इस्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज. जे सांगतात इस्राएल देश आम्हास मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत, ही भूमी आम्हास वतन म्हणून दिलेली आहे.
16 Derfor sig: Saa siger den Herre, Herre: Jeg har ladet dem fare langt bort iblandt Hedningerne, og jeg har adspredt dem i Landene, men jeg er dog bleven dem til en Helligdom for en kort Tid i Landene, hvorhen de ere komne.
१६म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, मी त्यांना देशातून फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भूमीत करीन, तरी मी काहीकाळ त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे.
17 Derfor sig: Saa siger den Herre, Herre: Jeg vil samle eder fra Folkene og sanke eder fra Landene, i hvilke I ere adspredte, og jeg vil give eder Israels Land.
१७म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्राएल देश तुम्हास देईन.
18 Og derhen skulle de komme, og de skulle fjerne alle dets Afskyeligheder og alle dets Vederstyggeligheder fra det.
१८मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या व ओंगळ व घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल.
19 Og jeg vil give dem eet Hjerte og give en ny Aand i deres Indre „og borttage Stenhjertet af deres Kød og give dem et Kødhjerte,
१९आणि मी तुम्हास एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतील, त्यांच्यातील दगडरुपी मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन.
20 paa det de skulle vandre i mine Skikke og holde mine Bud og gøre efter dem; og de skulle være mit Folk, og jeg skal være deres Gud.
२०मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
21 Men de, hvis Hjerte vandrer efter deres Afskyeligheders og deres Vederstyggeligheders Hjerte, deres Vej vil jeg lade falde til— bage paa deres Hoved, siger den Herre, Herre.
२१पण जे कोणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घृणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणुक त्यांच्या माथी आणिन. मी परमेश्वर देव आहे असे जाहीर करतो.”
22 Da opløftede Keruberne deres Vinger og Hjulene ved Siden af dem, og Israels Guds Herlighed var oven over dem.
२२तेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलून घेतले आणि चाके त्यांच्या बाजूला होती आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव हे सर्वोच्च होते.
23 Og Herrens Herlighed steg op fra Stadens Midte og blev staaende paa Bjerget, som er Østen for Staden.
२३शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले.
24 Og Aanden opløftede mig og førte mig i Synet, i Guds Aand, til Kaldæa til de bortførte; og det Fyn, som jeg havde set, forsvandt for mig i det høje.
२४आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.
25 Og jeg talte til de bortførte alle Herrens Ord, som han havde ladet mig se.
२५मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे परमेश्वर देवाने मला सांगितले होते.