< Daniel 10 >
1 I Kyrus's, Kongen af Persiens, tredje Aar blev et Ord aabenbaret for Daniel, hvis Navn kaldtes Beltsazar! og Ordet er Sandhed og gaar paa en svar Kamp, og han forstod Ordet og fik Forstand paa Synet.
१पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला.
2 I de samme Dage holdt jeg, Daniel, Sorg i hele tre Uger.
२त्या दिवसात मी दानीएल, तीन आठवडे शोक करत होतो.
3 Jeg aad ingen lækker Mad, og der kom ikke Kød eller Vin i min Mund, og jeg salvede mig ikke med Salve, før hele tre Uger vare til Ende.
३ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षरस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही.
4 Og paa den fire og tyvende Dag i den første Maaned, da var jeg ved Bredden af den store Flod Hiddekel.
४पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो.
5 Og jeg opløftede mine Øjne og saa, og se, der stod en Mand, iført linnede Klæder, og hans Lænder vare omgjordede med Guld af Ufas.
५मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला.
6 Og hans Legeme var som Krysolith, og hans Ansigt var som Lynet at se til og hans Øjne som Ildsluer og hans Arme og hans Fødder som Synet af blankt Kobber, og Lyden af hans Ord var som Lyden af et Bulder.
६त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता.
7 Og jeg, Daniel, jeg alene saa Synet, og de Mænd, som vare hos mig, saa ikke Synet, men der faldt en stor Forfærdelse paa dem, og de flyede, idet de skjulte sig.
७मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले.
8 Og jeg blev ene tilbage og saa dette store Syn, men der blev ingen Kraft tilbage i mig; og min friske Farve forandrede sig, saa den svandt bort, og jeg beholdt ingen Kraft.
८मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.
9 Og jeg hørte Lyden af hans Ord, og som jeg hørte Lyden af hans Ord, faldt jeg bedøvet ned paa mit Ansigt, med mit Ansigt imod Jorden.
९मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.
10 Og se, en Haand rørte ved mig og bragte mig ravende op paa mine Knæ og paa mine flade Hænder.
१०एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले.
11 Og han sagde til mig: Daniel, du højlig elskede Mand! giv Agt paa de Ord, som jeg taler til dig, og staa paa dit Sted; thi nu er jeg sendt til dig; og der han talte dette Ord med mig, stod jeg bævende.
११तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.
12 Og han sagde til mig: Frygt ikke, Daniel! thi fra den første Dag, du gav dit Hjerte hen til at forstaa og til at ydmyge dig for din Gud, ere dine Ord hørte; og jeg er kommen for dine Ords Skyld.
१२तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानीएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले, आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे.
13 Men Persiens Riges Fyrste stod imod mig een og tyve Dage, og se, Mikael, en af de fornemste Fyrster, kom for at hjælpe mig; og jeg fik Overhaand der hos Kongerne af Persien.
१३परंतु पारसाच्या राज्याच्या एका अधिपतीने एकवीस दिवस मला आवरिले; आणि पाहा, मीखाएल, मुख्य अधिपतींपैकी एक, माझे साहाय्य करायला आला; मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो.
14 Men jeg er kommen for at lade dig forstaa, hvad der skal vederfares dit Folk i de sidste Dage; thi der er endnu et Syn, som gaar paa disse Dage.
१४आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.
15 Og der han talte saadanne Ord med mig, da vendte jeg mit Ansigt imod Jorden og blev stum.
१५जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला; मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही.
16 Og se, een af Skikkelse som Menneskens Børn rørte ved mine Læber; da oplod jeg min Mund og talte og sagde til den, som stod lige over for mig: Min Herre! for dette Syns Skyld ere svare Smerter komne over mig, og jeg har ikke beholdt Kraft tilbage.
१६तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.
17 Og hvorledes kan denne min Herres Tjener tale med denne min Herre? og hvad mig angaar, bestaar fra nu af ingen Kraft i mig, og der er ingen Aande bleven tilbage i mig.
१७मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.”
18 Og han, der var af Skikkelse som et Menneske, rørte fremdeles ved mig og styrkede mig;
१८तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.
19 og han sagde: Frygt ikke, du højlig elskede Mand! Fred være med dig, vær frimodig, ja, vær frimodig! og der han talte med mig, følte jeg mig styrket og sagde: Min Herre tale! thi du har styrket mig.
१९तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.”
20 Og han sagde: Ved du, hvorfor jeg er kommen til dig? og nu skal jeg vende tilbage for at stride imod Persiens Fyrste; og naar jeg drager ud, da se, saa skal Grækenlands Fyrste komme.
२०तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार, मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल.
21 Dog vil jeg kundgøre dig, hvad der er optegnet i Sandheds Bog. — Der er ikke een, som staar mig kraftigt bi imod disse, uden Mikael, eders Fyrste;
२१परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही.