< Første Krønikebog 22 >
1 Og David sagde: Her skal den Herre Guds Hus være, og her skal Israels Brændoffers Alter være.
१मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”
2 Og David befalede at samle de fremmede, som vare i Israels Land, og han beskikkede Stenhuggere for at tildanne hugne Sten til at bygge Guds Hus.
२इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
3 Og David skaffede Jern i Mangfoldighed til Søm til Dørene i Portene og til Kramper og Kobber i Mangfoldighed, saa at der vidstes ingen Vægt derpaa,
३दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,
4 og Cedertræ uden Tal; thi Zidonierne og Tyrierne førte Cedertræ i Mangfoldighed til David.
४सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.
5 Thi David sagde: Salomo, min Søn, er en ung Mand og blødhjertet, og Huset, som skal bygges Herren, skal være overmaade stort, navnkundigt og berømmeligt i alle Lande; jeg vil forberede det for ham. Saa forberedte David saare meget før sin Død.
५दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.
6 Da kaldte han ad Salomo, sin Søn, og bød ham bygge Herrens, Israels Guds, Hus.
६मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली.
7 Og David sagde til Salomo: Min Søn! hvad mig angaar, da stod mit Hjerte til at bygge Herren min Guds Navn et Hus;
७दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती.
8 men Herrens Ord skete til mig og sagde: Du har udøst meget Blod og ført store Krige, du skal ikke bygge mit Navn et Hus, fordi du udøste meget Blod paa Jorden for mit Ansigt.
८पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
9 Se, den Søn, som dig skal fødes, han skal være en Rolighedens Mand, thi jeg vil skaffe ham Rolighed for alle hans Fjender trindt omkring; thi Salomo skal være hans Navn; og jeg vil give Fred og Rolighed over Israel i hans Dage.
९मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.
10 Han skal bygge mit Navn et Hus, og han skal være mig en Søn, og jeg vil være ham en Fader, og jeg vil stadfæste hans Riges Trone over Israel til evig Tid.
१०तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यंत स्थापित करील.”
11 Nu, min Søn, Herren skal være med dig, og du skal blive lykkelig og bygge Herren din Gud et Hus, som han talte om dig.
११“आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध.
12 Visselig, Herren skal give dig Klogskab og Forstand og give dig Befaling over Israel; men du skal holde Herren din Guds Lov.
१२जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.
13 Da skal du være lykkelig, naar du beflitter dig paa at gøre efter de Skikke og Love, som Herren bød Israel ved Mose; vær frimodig og stærk, du skal ikke frygte og ikke ræddes.
१३इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.
14 Og se, jeg har beredt til Herrens Hus i min Trængsel hundrede Tusinde Centner Guld og tusinde Gange tusinde Centner Sølv; dertil Kobber og Jern, som ej er til at veje, thi der er meget deraf; jeg har og beredt Træ og Sten, og dertil maa du lægge mere.
१४पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि दहा लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल.
15 Saa har du og mange hos dig, som kunne gøre Arbejdet, Stenhuggere og Mestre til at arbejde i Sten og Træ og alle Haande kløgtige Mænd til alle Haande Gerning.
१५तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत.
16 Paa Guldet, paa Sølvet og paa Kobberet og paa Jernet er intet Tal; gør dig rede og udfør det, og Herren være med dig!
१६जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
17 Og David bød alle Israels Fyrster at hjælpe Salomo, hans Søn:
१७दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला,
18 Er ej Herren eders Gud med eder og har skaffet eder Rolighed trindt omkring? thi han har givet Landets Indbyggere i min Haand, og Landet er undertvunget for Herrens Ansigt og for hans Folks Ansigt.
१८“तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.
19 Giver nu eders Hjerte og eders Sjæl hen til at søge Herren eders Gud, og gører eder rede og bygger Gud Herrens Helligdom for at indføre Herrens Pagts Ark og Guds Helligdoms Kar i Huset, som skal bygges for Herrens Navn.
१९तेव्हा आता अंत: करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”