< Jan 3 >
1 Jedním z předních Židů byl Nikodém, člen nejvyšší židovské rady. Patřil do skupiny farizejů, kteří přísně dodržovali všechny náboženské předpisy.
१परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.
2 Ten jedné noci vyhledal Ježíše a řekl mu: „Mistře, víme, že jsi učitel poslaný od Boha. Kdyby za tebou nestál sám Bůh, nemohl bys dělat takové zázraky, jaké jsi nám ukázal.“
२तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
3 Ježíš mu řekl: „Víš, na čem záleží? Na tom, aby se člověk znovu narodil, protože jinak se nestane občanem Božího království.“
३येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
4 „Znovu se narodit v mém věku?“podivil se Nikodém. „Cožpak se někdo může vrátit do matčina těla a narodit se podruhé?“
४निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”
5 Ježíš vysvětloval: „Jestliže se s člověkem nestane zásadní proměna a není na něm patrný nový život z Ducha a jestliže není na znamení toho pokřtěn, nemůže vstoupit do Božího království.
५येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
6 Život zrozený z člověka je tělesný. Teprve Boží Duch v člověku probouzí duchovní život.
६देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे.
7 Nediv se mým slovům, že se musíte znovu narodit.
७तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका.
8 Ovšem s Duchem svatým je to jako s větrem: Nemůžeš ho ovládat, ale pozoruješ jeho účinky. Tak se člověk znovu narodí z Ducha.“
८वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
9 Nikodém se zeptal: „Jak toho všeho dosáhnu?“
९निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?”
10 „Jsi učitelem Božího národa a toto nevíš?“podivil se Ježíš.
१०येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तू इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय?
11 „Věř mi, že mluvím o tom, co vím, a svědčím o tom, co jsem viděl. Vy ovšem moje slova neberete vážně.
११मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
12 Když nechápete to, co se týká člověka, jak porozumíte tomu, co se týká Boha?
१२मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?
13 Nikdo z lidí vám nemůže podat svědectví jako já, vždyť jsem přišel od Boha.
१३स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
14 Vzpomínáš si, co Izraelcům zachránilo život na poušti, kde je ohrožovali jedovatí hadi? Jak Mojžíš vyzvedl na sloup bronzového hada, a kdo na něj pohlédl s vírou, zachránil si život? Tak i já musím být vyzdvižen na kříž.
१४जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे,
15 Každý, kdo ve mne uvěří, ujde smrti a narodí se pro věčnost. (aiōnios )
१५यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (aiōnios )
16 Vždyť Bůh tak miloval svět, že dal svého jediného Syna, aby každý, kdo v něho uvěří, unikl záhubě a získal věčný život. (aiōnios )
१६कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. (aiōnios )
17 Bůh svého Syna neposlal proto, aby svět odsoudil, ale zachránil.
१७कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
18 Kdo v něho věří, unikne odsouzení. Kdo však v něho nevěří, odsuzuje sám sebe, protože odmítá milost nabízenou samým Bohem.
१८जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
19 Pro takové lidi je osudné, že na svět přišlo světlo, ale oni se nechtějí vzdát tmy, protože doufají, že ta zakryje jejich viny.
१९आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
20 Zlé činy dělá člověk potmě, aby to nikdo nevěděl. Bojí se světla, aby nebyl odhalen.
२०कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
21 Kdo se však řídí Boží pravdou, tíhne ke světlu, aby věděl, zda jsou jeho činy v souladu s Boží vůlí.“
२१पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
22 Potom Ježíš odešel se svými učedníky na judský venkov, aby tam s nimi mohl v klidu pobývat a aby křtil.
२२यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.
23 Také Jan Křtitel, který byl v té době ještě na svobodě, křtil v Ainonu nedaleko Salimu, kde bylo mnoho vody. Četní lidé se tam dali od Jana pokřtít.
२३आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत.
२४तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
25 Někteří Židé se dohadovali s Janovými učedníky, kdo má právo křtít.
२५मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.
26 Ti se obrátili na svého učitele: „Mistře, ten, kterého jsi označil za Mesiáše, také křtí a všichni teď chodí k němu.“
२६ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”
27 Jan jim řekl: „Člověk sám si nemůže přisvojit žádnou duchovní moc, pokud mu není dána od Boha.
२७योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
28 Vy sami jste svědky, že jsem prohlásil: ‚On je Bohem poslaný Mesiáš a já mu jen připravuji cestu.‘
२८मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
29 Nevěsta přece patří ženichovi. Jeho přítel je také na svatbě, ale raduje se z ženichova štěstí. To je právě moje radost. Jeho hvězda vychází a já chci, aby jasně zářila, a nechci jí zaclánět.
२९ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
३०त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
31 Protože Ježíš přišel z nebe, převyšuje nás všechny. My lidé mluvíme jen o tom, co jsme prožili na zemi.
३१जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.
32 On svědčí o tom, co viděl v nebi, a přece ho tak málo lidí přijímá.
३२जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
33 Kdo mu uvěří, dává za pravdu Bohu. Ježíš totiž mluví Boží slova z Božího pověření.
३३ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे.
34 Bůh jej k tomu také plně uschopnil svým Duchem.
३४कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
35 Vždyť Otec miluje Syna a svěřuje mu všechno.
३५पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.
36 Proto, kdo věří Synu, má věčný život. Kdo mu nedůvěřuje, místo života ho stíhá Boží hněv.“ (aiōnios )
३६जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (aiōnios )