< Žalmy 2 >

1 Proč se bouří národové, a lidé daremné věci přemyšlují?
राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
2 Sstupují se králové zemští, a knížata se spolu radí proti Hospodinu, a proti pomazanému jeho,
पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
3 Říkajíce: Roztrhejme svazky jejich, a zavrzme od sebe provazy jejich.
चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
4 Ale ten, jenž přebývá v nebesích, směje se, Pán posmívá se jim.
परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल.
5 Tehdáž mluviti bude k nim v hněvě svém, a v prchlivosti své předěsí je, řka:
तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.
6 Jáť jsem ustanovil krále svého nad Sionem, horou svatou mou.
मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.
7 Vypravovati budu úsudek. Hospodin řekl ke mně: Syn můj ty jsi, já dnes zplodil jsem tě.
मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.
8 Požádej mne, a dámť národy, dědictví tvé, a končiny země, vládařství tvé.
मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
9 Roztlučeš je prutem železným, a jako nádobu hrnčířskou roztříštíš je.
लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
10 A protož, králové, nyní srozumějte, vyučujte se, soudcové zemští.
१०म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
11 Služte Hospodinu v bázni, a veselte se s třesením.
११भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
12 Líbejte syna, aby se nerozhněval, a zhynuli byste na cestě, jakž by se jen málo zapálil hněv jeho. Blahoslavení jsou všickni, kteříž doufají v něho.
१२आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.

< Žalmy 2 >