< Filipským 1 >
1 Pavel a Timoteus, služebníci Ježíše Krista, všechněm svatým v Kristu Ježíši, kteříž jsou v městě Filippis, s biskupy a s jáhny:
१पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम;
2 Milost vám a pokoj od Boha Otce našeho a Pána Jezukrista.
२देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
3 Děkuji Bohu mému, když se koli na vás rozpomenu,
३मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.
4 (Vždycky při každé modlitbě mé, s radostí za všecky za vás prosbu čině, )
४माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो;
5 Z vašeho účastenství v evangelium, hned od prvního dne až posavad,
५पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.
6 Jist jsa tím, že ten, kterýž začal v vás dílo dobré, dokoná až do dne Ježíše Krista,
६आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.
7 Jakož jest mi spravedlivé tak smysliti o všech vás proto, že vás v srdci mám i v vězení mém, a v obraňování i v utvrzování evangelium, vás, pravím, všecky účastníky milosti mně dané.
७आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे.
8 Svědek mi jest zajisté Bůh, kterak po všech po vás toužím v srdci Ježíše Krista.
८देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,
9 A za to se modlím, aby láska vaše ještě více a více se rozhojňovala v známosti a ve všelikém smyslu,
९मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
10 K tomu, abyste zkušením rozeznati mohli užitečné věci od neužitečných, tak abyste byli upřímí a bez úrazu, až ke dni Kristovu,
१०यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
11 Naplněni jsouce ovocem spravedlnosti, kteréž nesete skrze Jezukrista, k slávě a k chvále Boží.
११आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
12 Chciť pak, bratří, abyste věděli, že to pokušení, kteréž mne obklíčilo, k většímu prospěchu evangelium přišlo,
१२माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.
13 Takže vězení mé pro Krista rozhlášeno jest po všem císařském dvoře, i jinde všudy.
१३म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले;
14 A mnozí z bratří v Pánu, spolehše na vězení mé, hojnější smělost mají bez strachu mluviti slovo Boží.
१४आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.
15 Někteří zajisté jen z závisti a navzdoru, někteří pak také z oblíbení sobě toho Krista káží.
१५कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत.
16 Ti pak, kteříž navzdoru Krista zvěstují, ne v čistotě, domnívají se, že mi k vězení mému soužení přidadí;
१६मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात.
17 Kteří pak z lásky, ti vědí, že jsem k obraně evangelium postaven.
१७पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.
18 Ale což pak o to? Nýbrž jakýmkoli způsobem, buď v samé tvárnosti, buď v pravdě Kristus se zvěstuje, i z tohoť se raduji, a ještě radovati budu.
१८ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.
19 Neboť vím, že mi to přijde k spasení skrze vaši modlitbu a pomoc Ducha Jezukristova,
१९कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल.
20 Podle pečlivého očekávání a naděje mé, že v ničemž nebudu zahanben, ale ve vší doufanlivé smělosti, jako i prve vždycky, tak i nyní veleben bude Kristus na těle mém, buďto skrze život, buďto skrze smrt.
२०कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
21 Mně zajisté Kristus i v životě i v smrti ziskem jest.
२१कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.
22 Jest-li mi pak prospěšněji živu býti v těle pro práci, tedy nevím, co bych vyvolil.
२२पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.
23 K obémuť se k tomu nakloňuji, žádost maje umříti, a býti s Kristem, což by mnohem lépe bylo,
२३कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
24 Ale pozůstati ještě v těle potřebněji jest pro vás.
२४तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.
25 Načež spoléhaje, vím, že pobudu a s vámi se všemi spolu pozůstanu k vašemu prospěchu a k radosti víry,
२५मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे.
26 Aby se vaše ze mne chlouba v Kristu Ježíši rozhojnila, skrze mou opět vám zase přítomnost.
२६हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.
27 Toliko, jakž sluší na účastníky evangelium Kristova, se chovejte, abych, buďto přijda k vám a vida vás, buďto vzdálen jsa, slyšel o vás, že stojíte v jednom duchu, jednomyslně pracujíce u víře evangelium,
२७सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
28 A v ničemž se nestrachujte protivníků, což jest jim jistým znamením zahynutí, vám pak spasení, a to od Boha.
२८आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.
29 Nebo vám jest to z milosti dáno pro Krista, abyste netoliko v něho věřili, ale také pro něj i trpěli,
२९कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
30 Týž boj majíce, jakýž jste při mně i viděli, i nyní o mně slyšíte.
३०मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.