< Sudcov 20 >

1 I vyšli všickni synové Izraelští, a shromáždilo se všecko množství jednomyslně od Dan až do Bersabé, i země Galád, k Hospodinu do Masfa.
नंतर दान प्रदेशापासून बैर-शेबा शहरापर्यंतचे व गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर आले आणि ते एक मनाचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पा येथे एकत्र जमा झाले.
2 Kdežto postavili se přední všeho lidu, všecka pokolení Izraelská v shromáždění lidu Božího, čtyřikrát sto tisíc lidu pěšího válečného.
इस्राएलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी, यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले, सुमारे चार लाख पायदळ, जे तलवारीने लढण्यास तयार होते.
3 (Uslyšeli pak synové Beniamin, že by sešli se synové Izraelští v Masfa.) I řekli synové Izraelští: Povězte, kterak se stala nešlechetnost ta?
आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?”
4 I odpověděv muž Levíta, manžel ženy zamordované, řekl: Do Gabaa kteréž jest Beniaminovo, přišel jsem s ženinou svou, abych tam přenocoval.
तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हटले, “मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.
5 Tedy povstavše proti mně muži Gabaa, obklíčili mne v domě v noci, myslíce mne zamordovati, ženinu pak mou trápili, tak že umřela.
गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.
6 Pročež vzav ženinu svou, rozsekal jsem ji na kusy, a rozeslal jsem ji do všech krajin dědictví Izraelského; nebo nešlechetnosti a mrzkosti se dopustili v Izraeli.
मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतांत पाठवले. कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
7 Aj, všickni vy synové Izraelští jste; považte toho mezi sebou, a raďte se o to.
आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि याकडे लक्ष द्या.”
8 A povstav všecken lid jednomyslně, řekli: Nenavrátí se žádný z nás do příbytku svého, aniž odejde kdo do domu svého.
सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, “आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
9 Ale nyní toto učiníme Gabaa, losujíce proti němu.
परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू.
10 Vezmeme deset mužů ze sta po všech pokoleních Izraelských, a sto z tisíce, a tisíc z desíti tisíců, aby dodávali potravy lidu, kterýž by přitáhna do Gabaa Beniaminova, pomstil všech nešlechetností jeho, kterýchž se dopustilo v Izraeli.
१०आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातली दहा माणसे व हजारातून शंभर, व दहा हजारातून एक हजार, इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.”
11 I sebrali se všickni muži Izraelští na to město, snesše se za jednoho člověka.
११मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरुद्ध जमले.
12 Poslala pak pokolení Izraelská muže do všech čeledí synů Beniamin, řkouce: Jaký to zlý skutek stal se mezi vámi?
१२तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?
13 Nyní tedy vydejte ty muže bezbožné, kteříž jsou v Gabaa, ať je zbijeme a odejmeme zlé z Izraele. Ale nechtěli Beniaminští slyšeti hlasu bratří svých, synů Izraelských.
१३तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हांला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू.” परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.
14 Nýbrž shromáždili se synové Beniamin z měst svých do Gabaa, aby vytáhli k boji proti synům Izraelským.
१४आणि बन्यामिनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध लढावयास आपल्या नगरांतून गिब्याजवळ जमा झाले.
15 Toho dne načteno jest synů Beniamin z měst jejich dvadceti šest tisíc mužů bojovných, kromě obyvatelů Gabaa, jichž načteno bylo šest set mužů vybraných.
१५त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यामध्ये गिब्यात राहणाऱ्या त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली.
16 Mezi kterýmžto vším lidem bylo sedm set mužů vybraných, neužívajících pravé ruky své, z nichž každý z praku kamením házeli k vlasu, a nechybovali se.
१६त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
17 Mužů pak Izraelských načteno jest kromě Beniaminských čtyřikrát sto tisíc mužů bojovných; všickni tito byli muži udatní.
१७बन्यामिनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.
18 Vstavše pak, brali se do domu Boha silného, a tázali se Boha, a řekli synové Izraelští: Kdo z nás půjde napřed k boji proti synům Beniamin? I řekl Hospodin: Juda půjde napřed.
१८मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, “बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे?” परमेश्वर देवाने सांगितले, “यहूदाने पहिल्याने जावे.”
19 A tak ráno vstavše synové Izraelští, položili se proti Gabaa.
१९इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
20 I táhli muži Izraelští k boji proti synům Beniamin, a sšikovali se muži Izraelští k bitvě proti Gabaa.
२०मग इस्राएली सैन्य बन्यामिन्यांविरुद्ध लढायला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
21 Vyšedše pak synové Beniamin z Gabaa, porazili z Izraele toho dne dvamecítma tisíc mužů na zem.
२१तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यातील बावीस हजार मनुष्यांना मारले.
22 A posilnivše se muži lidu Izraelského, spořádali se zase k boji na místě, na kterémž se prvního dne zřídili.
२२तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली.
23 Prvé pak šli synové Izraelští, a plakali před Hospodinem až do večera. I tázali se Hospodina těmi slovy: Půjdeme-li ještě k boji proti synům Beniamina bratra našeho? Odpověděl Hospodin: Jděte proti nim.
२३आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.”
24 Tedy potýkali se synové Izraelští s syny Beniamin druhého dne.
२४म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामिनी सैन्याविरुद्ध चालून गेले.
25 A vyšedše synové Beniamin z Gabaa na ně druhého dne, porazili z synů Izraelských opět osmnácte tisíc mužů na zem, vše mužů bojovných.
२५दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.
26 Protož vstoupili všickni synové Izraelští a všecken lid, a přišli do domu Boha silného. I plakali, usadivše se tam před Hospodinem, a postili se toho dne až do večera; obětovali též oběti zápalné a pokojné před Hospodinem.
२६नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
27 I tázali se synové Izraelští Hospodina, (nebo tu byla truhla smlouvy Boží v těch dnech,
२७आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसात देवाच्या कराराचा कोश तेथे होता.
28 A Fínes syn Eleazara, syna Aronova, stál před ní v ten čas), řkouce: Půjdeme-li ještě k boji proti synům Beniamina bratra našeho, čili tak necháme? Odpověděl Hospodin: Jděte, nebo zítra dám je v ruku vaši.
२८आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”
29 Tedy Izraelští zdělali zálohy proti Gabaa všudy vůkol.
२९मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळी माणसे ठेवली.
30 I šli synové Izraelští proti synům Beniamin dne třetího, a sšikovali se proti Gabaa, jako prvé jednou i podruhé.
३०मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
31 Vyšedše pak synové Beniamin proti lidu, odtrhli se od města, a počali bíti a mordovati lidu, jako prvé jednou i druhé po stezkách, (z nichž jedna šla k Bethel a druhá do Gabaa), i po poli, a okolo třidcíti mužů z Izraele.
३१तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
32 A řekli synové Beniamin: Padají před námi jako i prvé. Synové pak Izraelští řekli byli: Utíkejme, abychom je odtrhli od města až k stezkám.
३२बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.”
33 A v tom všickni synové Izraelští vstavše z místa svého, sšikovali se v Baltamar; zálohy také Izraelovy vyskočily z místa svého z trávníků Gabaa.
३३सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी बआल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
34 Tedy vyšlo proti Gabaa deset tisíc mužů vybraných ze všeho Izraele, a bitva se rozmáhala; oni pak nevěděli o tom, že je potkati mělo zlé.
३४सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
35 I porazil Hospodin Beniamina před Izraelem, a zbili synové Izraelští z Beniaminských dne toho pětmecítma tisíc a sto mužů, vše bojovných.
३५तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिन्यांचे पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
36 A vidouce synové Beniamin, že by poraženi byli, (nebo muži Izraelští ustupovali z místa Beniaminským, ubezpečivše se na zálohy, kteréž zdělali proti Gabaa.
३६बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.
37 Zálohy pak pospíšily a obořily se na Gabaa, a rozvláčně troubivše zálohy, zbily všecko město ostrostí meče.
३७नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
38 Měli pak muži Izraelští s zálohami jistý čas uložený, aby když by oni zapálili město,
३८आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा.
39 Obrátili se synové Izraelští k boji. Beniaminští pak počali bíti a mordovati, a zbili z synů Izraelských okolo třidcíti mužů; nebo řekli: Jistě že padají před námi jako v první bitvě.
३९आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्याला सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारली. आणि त्यांनी म्हटले, “खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.”
40 Oheň pak počal vzhůru jíti z města, a sloup dymový. A ohlédše se Beniaminští zpět, uzřeli, an vstupuje oheň města k nebi.)
४०परंतु नगरातून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिन्यांनी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले.
41 A že muži Izraelští obrátili se, i zděšeni jsou muži Beniamin, nebo viděli, že zahynutí jim nastává.
४१नंतर इस्राएली सैन्य मागे उलटून त्यांच्यावर हल्ला चढवला. बन्यामिनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
42 I utíkali před muži Izraelskými cestou ku poušti, a bojovníci postihali je, a kteří z měst vyšli, mordovali je mezi sebou.
४२यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले.
43 A tak obklíčili Beniaminské, a honili i porazili je, od Manuha až naproti Gabaa k východu slunce.
४३त्यांनी बन्यामिन्यांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले.
44 Tedy padlo Beniaminských osmnácte tisíc mužů; všickni ti byli muži silní.
४४बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती.
45 Těch pak, kteříž obrátivše se, utíkali na poušť k skále Remmon, zpaběrovali po cestách pět tisíc mužů; potom honili je až k Gidom, a zbili z nich dva tisíce mužů.
४५जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यातले पाच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यातले दोन हजार पुरुष आणखी मारले.
46 A tak bylo všech, kteříž padli v ten den z Beniaminských, pětmecítma tisíc mužů bojovných, vše mužů silných.
४६त्या दिवशी बन्यामिनातले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते.
47 I obrátilo se na poušť a uteklo k skále Remmon šest set mužů, kteříž zůstali v skále Remmon za čtyři měsíce.
४७परंतु सहाशे पुरुष फिरून रानात रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महिने राहिले.
48 Potom muži Izraelští navrátili se k synům Beniamin, a zbili je ostrostí meče, tak lidi v městech jako hovada, i všecko, což nalezeno bylo; také i všecka města, kteráž ještě pozůstávala, ohněm vypálili.
४८नंतर इस्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामिनी लोकांवर हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून जाळून टाकले.

< Sudcov 20 >