< Jób 26 >

1 A odpovídaje Job, řekl:
नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 Komu jsi napomohl? Tomu-li, kterýž nemá síly? Toho-lis retoval, kterýž jest bez moci?
“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
3 Komu jsi rady udělil? Nemoudrému-li? Hned jsi základu dostatečně poučil?
बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
4 Komužs ty řeči zvěstoval? A čí duch vyšel z tebe?
तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
5 Však i mrtvé věci pod vodami a obyvateli jejich sformovány bývají.
बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
6 Odkryta jest propast před ním, i zahynutí není zakryto. (Sheol h7585)
देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत: ला झाकून घेवू शकत नाही. (Sheol h7585)
7 Ontě roztáhl půlnoční stranu nad prázdnem, zavěsil zemi na ničemž.
त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
8 Zavazuje vody v oblacích svých, aniž se trhá oblak pod nimi.
तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
9 On sám zdržuje stále trůn svůj, a roztahuje na něm oblaky své.
तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
10 Cíl vyměřil rozlévání se vodám, až do skonání světla a tmy.
१०त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
11 Sloupové nebeští třesou se a pohybují od žehrání jeho.
११त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.
12 Mocí svou rozdělil moře, a rozumností svou dutí jeho.
१२तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
13 Duchem svým nebesa ozdobil, a ruka jeho sformovala hada dlouhého.
१३त्याचा नि: श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 Aj, toť jsou jen částky cest jeho, a jak nestižitelné jest i to maličko, což jsme slyšeli o něm. Hřímání pak moci jeho kdo srozumí?
१४पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”

< Jób 26 >