< 2 Mojžišova 31 >
1 I mluvil Hospodin k Mojžíšovi, řka:
१नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला
2 Hle, povolal jsem ze jména Bezeleele, syna Uri, syna Hur, z pokolení Judova.
२“पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
3 A naplnil jsem ho duchem Božím, moudrostí a rozumností, i uměním všelijakého řemesla,
३देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.
4 Aby vtipně smysliti uměl, což by koli řemeslně uděláno býti mohlo z zlata a z stříbra i z mědi.
४तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.
5 I v řezání kamení drahého k vsazování, i v umělém vysazování na dřevě aby dělal všelijaké dílo.
५तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
6 A aj, já přidal jsem jemu Aholiaba, syna Achisamechova, z pokolení Dan. A v srdci každého vtipného složil jsem moudrost, aby spravili vše, což jsem přikázal tobě:
६त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.
7 Stánek úmluvy a truhlu svědectví, a slitovnici, kteráž má býti na ní, i všelijaké nádobí stánku;
७म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू;
8 Stůl také a nádoby k němu, i svícen čistý se všemi nádobami jeho, a oltář pro kadění;
८मेज व त्यावरील सर्व वस्तू, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
9 Též oltář k zápalům se všemi nádobami jeho, a umyvadlo s podstavkem jeho;
९होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
10 I roucha k službě, i roucha svatá Aronovi knězi, i roucha synů jeho, aby mi úřad kněžský konali;
१०अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेली तलम व पवित्र वस्रे;
11 I olej pomazání a kadidlo vonné do svatyně. Všecko tak, jakž jsem přikázal tobě, udělají.
११अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.”
12 Mluvil také Hospodin k Mojžíšovi, řka:
१२नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
13 Ty pak mluv k synům Izraelským a rci: A však sobot mých ostříhati budete. Nebo to znamením jest mezi mnou a vámi po rodech vašich, aby známo bylo, že já jsem Hospodin, kterýž vás posvěcuji.
१३“इस्राएल लोकांस हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
14 Protož ostříhati budete soboty, nebo svatá jest vám. Kdož by ji poškvrnil, smrtí umře; a kdo by koli dělal v ní dílo, vyhlazena bude ta duše z prostředku lidu svého.
१४म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
15 Šest dní děláno bude dílo, ale v den sedmý sobota odpočinutí jest, svatost Hospodinu. Každý, kdož by dělal dílo v den sobotní, smrtí umře.
१५सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.
16 Protož ostříhati budou synové Izraelští soboty, tak aby světili sobotu po rodech svých smlouvou věčnou.
१६इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
17 Mezi mnou a syny Izraelskými za znamení jest na věčnost; nebo šest dní činil Hospodin nebe i zemi, v den pak sedmý přestal a odpočinul.
१७शब्बाथ दिवस इस्राएल लोकांमध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”
18 I dal Pán Mojžíšovi po dokonání těchto řečí s ním na hoře Sinai dvě dsky svědectví, dsky kamenné, psané prstem Božím.
१८या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले.