< Koloským 1 >
1 Pavel apoštol Ježíše Krista, skrze vůli Boží, a Timoteus bratr,
१देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून;
2 Těm, kteříž jsou v městě Kolossis, svatým a věrným bratřím v Kristu: Milost vám a pokoj od Boha Otce našeho a Pána Ježíše Krista.
२कलस्सै शहरातील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांस देव आपला पिता ह्याजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
3 Díky činíme Bohu a Otci Pána našeho Jezukrista, vždycky za vás modléce se,
३आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो
4 Slyšavše o víře vaší v Kristu Ježíši a o lásce ke všechněm svatým,
४कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
5 Pro naději složenou vám v nebesích, o níž jste prve slyšeli v slovu pravdy, jenž jest evangelium.
५जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी, तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
6 Kteréž jest přišlo k vám, jako i na všecken svět, a ovoce nese, jako i u vás, od toho dne, v kterémž jste slyšeli a poznali milost Boží v pravdě,
६ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
7 Jakož jste se i naučili od Epafry, milého spoluslužebníka našeho, kterýž jest věrný k vám služebník Kristův,
७आणि या कृपेविषयीही तुम्ही एपफ्रासकडून शिकलात; तो आमचा प्रिय जोडीदार-कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे.
8 Kterýž také oznámil nám lásku vaši v Duchu.
८त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली.
9 Protož i my, od toho dne, jakž jsme to uslyšeli, nepřestáváme modliti se za vás a žádati, abyste naplněni byli známostí vůle jeho ve vší moudrosti a rozumnosti duchovní,
९म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडून देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की, तुम्हास सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
10 Abyste chodili hodně Pánu ke vší jeho líbeznosti, v každém skutku dobrém, ovoce vydávajíce a rostouce v známosti Boží,
१०ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
11 Všelikou mocí zmocněni jsouce, podle síly slávy jeho, ke vší trpělivosti a dobrotivosti s radostí,
११आणि तुम्हास सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हास संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे;
12 Díky činíce Otci, kterýž hodné nás učinil účastnosti losu svatých v světle,
१२आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.
13 Kterýž vytrhl nás z moci temnosti a přenesl do království milého Syna svého,
१३त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,
14 V němžto máme vykoupení skrze krev jeho, totiž odpuštění hříchů,
१४आणि त्याच्याठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.
15 Kterýž jest obraz Boha neviditelného a prvorozený všeho stvoření.
१५ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
16 Nebo skrze něho stvořeny jsou všecky věci, kteréž jsou na nebi i na zemi, viditelné i neviditelné, buďto trůnové nebo panstva, buďto knížatstva nebo mocnosti; všecko skrze něho a pro něho stvořeno jest.
१६कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
17 A on jest přede vším a všecko jím stojí.
१७तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.
18 A onť jest hlava těla církve, kterýž jest počátek a prvorozený z mrtvých, aby tak on ve všem prvotnost držel,
१८तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे.
19 Poněvadž se zalíbilo Otci, aby v něm všecka plnost přebývala,
१९हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता.
20 A skrze něho aby smířil s sebou všecko, v pokoj uvodě skrze krev kříže jeho, skrze něj, pravím, buďto ty věci, kteréž jsou na zemi, buď ty, kteréž jsou na nebi.
२०आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.
21 A vás také někdy odcizené a nepřátely, v mysli vaší obrácené k skutkům zlým, nyní již smířil,
२१आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
22 Tělem svým skrze smrt, aby vás postavil svaté, a neposkvrněné, a bez úhony před obličejem svým,
२२त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.
23 Však jestliže zůstáváte u víře založení a pevní, a neuchylujete se od naděje evangelium, kteréž jste slyšeli, jenž jest kázáno všemu stvoření, kteréž jest pod nebem, jehožto já Pavel učiněn jsem služebník;
२३कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
24 Kterýž nyní raduji se z utrpení mých, kteráž snáším pro vás, a doplňuji ostatky soužení Kristových na těle svém za jeho tělo, jenž jest církev,
२४तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
25 Jejížto učiněn jsem já služebník, tak jakž mi to svěřil Bůh na to, abych vám sloužil, a tak naplnil slovo Boží,
२५आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे.
26 Jenž jest tajemství skryté od věků a národů, nyní pak zjevené svatým jeho. (aiōn )
२६जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे. (aiōn )
27 Jimžto Bůh ráčil známo učiniti, kteraké by bylo bohatství slavného tajemství tohoto mezi pohany, jenž jest přebývání Krista v vás, kterýž jest naděje slávy,
२७त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्रजनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
28 Kteréhož my zvěstujeme, napomínajíce všelikého člověka a učíce všelikého člověka ve vší moudrosti, abychom postavili každého člověka dokonalého v Kristu Ježíši.
२८आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्यास बोध करतो आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्यास आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्यास ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
29 O čež i pracuji, bojuje podle té jeho mocnosti, kteráž dělá ve mně dílo své mocně.
२९याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्याने त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.