< Ámos 1 >

1 Slova Amosova, (kterýž byl mezi pastýři) z Tekoa, kteráž viděl o Izraelovi za dnů Uziáše krále Judského, a za dnů Jeroboáma syna Joasova, krále Izraelského, dvě létě před země třesením.
तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.
2 I řekl: Hospodin řváti bude z Siona, a z Jeruzaléma vydá hlas svůj, i budou kvíliti salášové pastýřů, a vyschnou pole nejvýbornější.
तो म्हणाला: सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल, तो यरूशलेमेतून आपला शब्द उच्चारील. मेंढपाळांची कुरणे शोक करतील, आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.
3 Takto praví Hospodin: Pro troji nešlechetnost Damašku, ovšem pro čtveru neodpustím jemu, proto že mlátili Galáda cepami okovanými.
परमेश्वर असे म्हणतो, “कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे.
4 Ale pošli oheň na dům Hazaelův, kterýžto zžíře paláce Benadadovy.
मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन; आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन.
5 I polámi závoru Damašku, a vypléním obyvatele z údolí Aven, a toho, kterýž drží berlu, z domu Eden, i půjde v zajetí lid Syrský do Kir, dí Hospodin.
मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” असे परमेश्वर म्हणतो.
6 Takto praví Hospodin: Pro troji nešlechetnost Gázy, ovšem pro čtveru neslituji se nad ním, proto že je zajímajíce, v zajetí věčné podrobovali Idumejským.
आणि परमेश्वर असे म्हणतो, “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले, ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.
7 Ale pošli oheň na zed Gázy, kterýžto zžíře paláce její,
म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.
8 A vypléním obyvatele z Azotu, i toho, kterýž drží berlu, z Aškalon, a obrátím ruku svou proti Akaron, i zahyne ostatek Filistinských, praví Panovník Hospodin.
मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन. एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन. आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.” असे परमेश्वर देव म्हणतो.
9 Takto praví Hospodin: Pro troji nešlechetnost Týru, ovšem pro čtveru neodpustím jemu, proto že je v zajetí věčné podrobili Idumejským, a nepamatovali na smlouvu bratrskou.
परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
10 Ale pošli oheň na zed Tyrskou, kterýžto zžíře paláce jeho.
१०म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करील.”
11 Takto praví Hospodin: Pro troji nešlechetnost Edoma, ovšem pro čtveru neslituji se nad ním, proto že udusiv v sobě všecku lítostivost, stihá mečem bratra svého, a hněv jeho ustavičně rozsapává, anobrž vzteklost jeho špehuje bez přestání.
११परमेश्वर असे म्हणतो, “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.
12 Ale pošli oheň na Teman, kterýžto zžíře paláce v Bozra.
१२म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”
13 Toto praví Hospodin: Pro troji nešlechetnost synů Ammon, ovšem pro čtveru neodpustím jemu, proto že roztínali těhotné Galádské, jen aby rozšiřovali pomezí své.
१३परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.
14 Ale zanítím oheň na zdi Rabba, kterýžto zžíře paláce její, s troubením v den boje a s bouří v den vichřice.
१४म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन, त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरड होत असतांना, आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील.
15 I půjde král jejich v zajetí, on i knížata jeho s ním, praví Hospodin.
१५आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.” असे परमेश्वर म्हणतो.

< Ámos 1 >