< 2 Tesalonickým 1 >

1 Pavel a Silván a Timoteus církvi Tessalonicenské v Bohu Otci našem a v Pánu Ježíši Kristu:
देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीका शहरातील मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
2 Milost vám a pokoj od Boha Otce našeho a od Pána Jezukrista.
देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
3 Povinniť jsme díky činiti Bohu vždycky z vás, bratří, tak jakž hodné jest, protože velmi roste víra vaše a rozmáhá se láska jednoho každého z vás, všechněch k sobě vespolek,
बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
4 Takže my se vámi v sbořích Božích chlubíme, vaší trpělivostí a věrou ve všech protivenstvích a souženích, kteráž snášíte;
ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.
5 Kterážto jsou zjevný důvod spravedlivého soudu Božího, abyste tak za hodné jmíni byli království Božího, pro něž i trpíte,
ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
6 Poněvadž spravedlivé jest u Boha, aby zase odplaceno bylo těm, kteříž vás sužují, soužením,
तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,
7 Vám pak, úzkost trpícím, aby dáno bylo odpočinutí s námi, při zjevení Pána Ježíše s nebe, s anděly moci jeho,
म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
8 V plameni ohně, kterýž pomstu uvede na ty, jenž neznají Boha a neposlouchají evangelium Pána našeho Jezukrista,
तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.
9 Kteříž pomstu ponesou, věčné zahynutí, zahnáni jsouce od tváři Páně a od slávy moci jeho, (aiōnios g166)
तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. (aiōnios g166)
10 Když přijde, aby oslaven byl v svatých svých a předivný ukázal se ve všech věřících, (nebo uvěřeno jest svědectví našemu u vás, ) v onen den.
१०आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
11 Pročež i modlíme se vždycky za vás, aby vás hodné učiniti ráčil povolání toho Bůh náš a vyplnil všecku dobře libou vůli dobrotivosti své, i skutek víry mocně,
११याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
12 Aby oslaveno bylo jméno Pána našeho Jezukrista v vás a vy v něm, podle milosti Boha našeho a Pána Jezukrista.
१२ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हास त्याच्याठायी, गौरव मिळावे.

< 2 Tesalonickým 1 >