< 2 Samuelova 6 >
1 Tedy sebral opět David výborného lidu z Izraele třidceti tisíc.
१दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले.
2 A vstav, šel David i všecken lid, kterýž byl s ním, z Bála Judova, aby přinesli odtud truhlu Boží, při kteréž se vzývá jméno, jméno Hospodina zástupů, sedícího nad cherubíny.
२आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करुबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो देवाचा कोश वर आणायला चालला.
3 I vstavili truhlu Boží na nový vůz, vzavše ji z domu Abinadabova, kterýž byl na pahrbku. Uza pak a Achio, synové Abinadabovi, spravovali ten vůz nový.
३अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा देवाचा कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे पुत्र उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
4 A tak vzali ji z domu Abinadabova, kterýž byl na pahrbku, jdouce s truhlou Boží; Achio pak šel před truhlou.
४अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला.
5 Ale David i všecken dům Izraelský hrali před Hospodinem na všelijaké nástroje z dříví cedrového, totiž na harfy, loutny, bubny, husličky, a na cymbály.
५तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले.
6 A když přišli k humnu Náchonovu, vztáhl ruku svou Uza k truhle Boží a pozdržel jí, nebo uchýlili se volové.
६ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.
7 Protož rozhněval se Hospodin na Uzu, a zabil ho Bůh pro neprozřetelnost; i umřel tu u truhly Boží.
७पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला.
8 Tedy zkormoutil se David, proto že se Hospodin tak přísně obořil na Uzu. I nazváno to místo Peres Uza až do tohoto dne.
८परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु: खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
9 A boje se David Hospodina v ten den, řekl: Kterakž má vjíti ke mně truhla Hospodinova?
९मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?”
10 Pročež David nechtěl přenésti k sobě truhly Hospodinovy do města svého, ale způsobil to, aby se obrátila do domu Obededoma Gittejského.
१०परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला.
11 I pobyla truhla Hospodinova v domě Obededoma Gittejského za tři měsíce, a požehnal Hospodin Obededomovi i všemu domu jeho.
११तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
12 V tom povědíno jest králi Davidovi, že požehnal Hospodin domu Obededomovu i všemu, což má, pro truhlu Boží. Tedy odšed David, přenesl truhlu Boží z domu Obededomova do města Davidova s veselím.
१२पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.
13 A když poodešli ti, kteříž nesli truhlu Hospodinovu, na šest kroků, obětoval voly a tučný dobytek.
१३परमेश्वराचा कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले.
14 David pak poskakoval ze vší síly před Hospodinem, a byl oblečen David v efod lněný.
१४सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता.
15 A tak David i všecken dům Izraelský provázeli truhlu Hospodinovu s plésáním a zvukem trouby.
१५दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
16 Stalo se pak, když truhla Hospodinova vcházela do města Davidova, že Míkol dcera Saulova vyhlídala z okna, a viduci krále Davida plésajícího a poskakujícího před Hospodinem, pohrdla jím v srdci svém.
१६शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले.
17 A když přinesli truhlu Hospodinovu, postavili ji na místě jejím u prostřed stanu, kterýž jí byl David rozbil; a obětoval David před Hospodinem oběti zápalné i pokojné.
१७या कराराच्या कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यामध्ये योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरा पुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
18 Zatím když přestal David obětovati obětí zápalných a pokojných, dal požehnání lidu ve jménu Hospodina zástupů.
१८होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले.
19 Dal také všemu lidu a všemu množství Izraelskému, od muže až do ženy, jednomu každému jeden pecník chleba a kus masa, a vína láhvici jednu. I odšel všecken lid, jeden každý do domu svého.
१९शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
20 Potom navracoval se David, aby dal požehnání domu svému. I vyšla Míkol dcera Saulova vstříc Davidovi, a řekla: Jak slavný byl dnes král Izraelský, kterýž se odkrýval dnes před děvkami služebníků svých, tak jako se odkrývá jeden z lehkomyslných!
२०मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!”
21 I řekl David k Míkol: Před Hospodinem, (kterýž mne vyvolil nad otce tvého a nad všecken dům jeho, přikázav mi, abych byl vývodou lidu Hospodinova, totiž Izraele), plésal jsem a plésati budu před Hospodinem.
२१तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार.
22 Anobrž čím se ještě více opovrhu nežli tuto, a ponížím se u sebe sám, tím i u těch děvek, o nichž jsi mluvila, i u těch, pravím, slavnější budu.
२२मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.”
23 Protož Míkol dcera Saulova neměla žádného plodu až do dne smrti své.
२३शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.