< 2 Královská 13 >
1 Léta třimecítmého Joasa syna Ochoziáše, krále Judského, kraloval Joachaz syn Jéhu nad Izraelem v Samaří sedmnácte let.
१अहज्याचा मुलगा योवाश यहूदाचा राजा, याच्या तेविसाव्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने सतरा वर्षे राज्य केले.
2 A činil to, což jest zlého před očima Hospodinovýma; nebo následoval hříchů Jeroboáma syna Nebatova, kterýž přivedl k hřešení Izraele, a neuchýlil se od nich.
२परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली, त्याने ती सोडली नाही.
3 I rozhněvala se prchlivost Hospodinova na Izraele, a vydal je v ruku Hazaele krále Syrského, a v ruku Benadada syna Hazaelova po všecky ty dny.
३तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
4 Ale když se modlil Joachaz Hospodinu, vyslyšel jej Hospodin. Viděl zajisté trápení Izraelské, že je ssužoval král Syrský.
४तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली, तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
5 Protož dal Hospodin Izraelovi vysvoboditele, a vyšli z ruky Syrských, i bydlili synové Izraelští v příbytcích svých jako kdy prvé.
५मग परमेश्वराने इस्राएलाला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
6 Však proto neodstoupili od hříchů domu Jeroboámova, kterýž přivedl k hřešení Izraele, nýbrž v nich chodili, ano i háj ještě zůstával v Samaří,
६तरीही यराबामाच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांस करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
7 Ačkoli nezanechal Joachazovi lidu, kromě padesáti jízdných a desíti vozů a desíti tisíců pěších; nebo je pohubil král Syrský, a setřel je jako prach při mlácení.
७अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांस त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलफटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.
8 O jiných pak činech Joachazových, a cožkoli činil, i o síle jeho zapsáno jest v knize o králích Izraelských.
८“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
9 I usnul Joachaz s otci svými, a pochovali ho v Samaří. Kraloval pak Joas syn jeho místo něho.
९पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
10 Léta třidcátého sedmého Joasa krále Judského kraloval Joas syn Joachazův nad Izraelem v Samaří šestnácte let.
१०यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
11 A činil to, což jest zlého před očima Hospodinovýma, neuchýliv se od žádných hříchů Jeroboáma syna Nebatova, kterýž přivedl k hřešení Izraele, ale chodil v nich.
११परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
12 O jiných pak činech Joasových, i cožkoli činil, i o síle jeho, kterouž bojoval proti Amaziášovi králi Judskému, zapsáno jest v knize o králích Izraelských.
१२इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
13 I usnul Joas s otci svými, a sedl Jeroboám na stolici jeho. I pochován jest Joas v Samaří s králi Izraelskými.
१३योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
14 Elizeus pak roznemohl se nemocí těžkou, v kteréž i umřel. A přišel byl k němu Joas král Izraelský, a pláče nad ním, řekl: Otče můj, otče můj, vozové Izraelští a jízdo jeho!
१४आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु: खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
15 Ale Elizeus řekl jemu: Vezmi lučiště a střely. I vzav, přinesl k němu lučiště a střely.
१५तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले
16 Řekl dále králi Izraelskému: Vezmi v ruku svou lučiště. I vzal je v ruku svou. Vložil také Elizeus ruce své na ruce královy.
१६मग अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
17 A řekl: Otevři to okno k východu. A když otevřel, řekl Elizeus: Střeliž. I střelil. Tedy řekl: Střela spasení Hospodinova a střela vysvobození proti Syrským; nebo porazíš Syrské v Afeku, až i do konce vyhladíš je.
१७अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
18 Opět řekl: Vezmi střely. I vzal. Tedy řekl králi Izraelskému: Střílej k zemi. I střelil po třikrát, potom tak nechal.
१८अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
19 Pročež rozhněvav se na něj muž Boží, řekl: Měls pětkrát neb šestkrát střeliti, ješto bys byl porazil Syrské, ažbys je i do konce byl vyhladil; nyní pak jen po třikrát porazíš Syrské.
१९देवाचा मनुष्य योवाशावर रागावला. तो त्यास म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
20 Potom umřel Elizeus, a pochovali ho. Lotříkové pak Moábští vtrhli do země nastávajícího roku.
२०अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
21 I stalo se, když pochovávali jednoho, že uzřevše ty lotříky, uvrhli muže toho do hrobu Elizeova. Kterýžto muž, jakž tam padl, a dotekl se kostí Elizeových, ožil a vstal na nohy své.
२१काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
22 Hazael pak král Syrský, ssužoval Izraele po všecky dny Joachaza.
२२यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
23 A milostiv jsa jim Hospodin, slitoval se nad nimi, a popatřil na ně, pro smlouvu svou s Abrahamem, s Izákem a s Jákobem, a nechtěl jich zahladiti, aniž zavrhl jich od tváři své až do tohoto času.
२३पण परमेश्वरासच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वरास इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्यास त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
24 I umřel Hazael král Syrský, a kraloval Benadad syn jeho místo něho.
२४अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.
25 Protož Joas syn Joachazův pobral zase města z ruky Benadada syna Hazaelova, kteráž byl vzal z ruky Joachaza otce jeho válečně; nebo po třikrát porazil ho Joas, a navrátil města Izraelská.
२५मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशाचे वडिल यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशाने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशाने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.