< 2 Korintským 8 >

1 Známuť pak vám činíme, bratří, milost Boží, danou zborům Macedonským,
बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो.
2 Že v mnohém zkušení rozličných soužení rozhojnilá radost jejich a převeliká chudoba jejich rozhojněna jest v bohatství upřímnosti jejich.
ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.
3 Nebo svědectví jim vydávám, že podle možnosti, ba i nad možnost hotovi byli sděliti se,
कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले.
4 Mnohými žádostmi prosíce nás, abychom té milosti jejich a obcování služebnost (v rozdělování toho svatým) na se přijali.
पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली.
5 A netoliko tak učinili, jakž jsme se nadáli, ale sami sebe nejprve dali Pánu, a i nám také u vůli Boží,
आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले.
6 Tak že jsme musili napomenouti Tita, aby jakož byl prve započal, tak také i dokonal při vás milost tuto.
ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाने तुमच्यामध्ये कृपेच्या या कार्याचा शेवटही करावा.
7 A protož jakž ve všech věcech jste hojní, totiž u víře i v řeči i v známosti i ve všeliké snažnosti i v lásce vaší k nám, tak i v této milosti hojní buďte.
म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे.
8 Ne jako rozkazuje, toto pravím, ale příčinou jiných snažnosti i vaši upřímou lásku zkušenou ukázati chtěje.
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.
9 Nebo znáte milost Pána našeho Jezukrista, že pro vás učiněn jest chudý, jsa bohatý, abyste vy jeho chudobou zbohatli.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
10 A k tomuť vám radu dávám; nebo jest vám to užitečné, kteříž jste netoliko činiti, ale i chtíti prve začali léta předešlého.
१०ह्याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हास हितकारक आहे, तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला.
11 Protož nyní již to skutkem vykonejte, aby jakož hotové bylo chtění, tak také bylo i vykonání z toho, což máte.
११तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुमच्या तुम्हास होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी.
12 Nebo jest-liť prve vůle hotová, podle toho, což kdo má, vzácná jest Bohu, ne podle toho, čehož nemá.
१२कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.
13 Nebo ne proto vás ponoukám, aby jiným bylo polehčení, a vám soužení, ale rovnost ať jest; nyní přítomně vaše hojnost spomoziž jejich chudobě,
१३दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे.
14 Aby potom také jejich hojnost vaší chudobě byla ku pomoci, aby tak byla rovnost;
१४सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात अशी समानता व्हावी.
15 Jakož psáno: Kdo mnoho nasbíral, nic mu nezbývalo, a kdo málo, neměl nedostatku.
१५पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता, त्यास जास्त झाला नाही. ज्याने थोडा गोळा केला होता, त्यास कमी पडला नाही.”
16 Ale díka Bohu, kterýž takovouž snažnost k službě vám dal v srdce Titovo,
१६जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंतःकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो,
17 Takže to napomenutí naše ochotně přijal, anobrž jsa v lásce k vám opravdový, sám z své dobré vůle šel k vám.
१७कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.
18 Poslaliť jsme pak s ním bratra toho, kterýž má velikou chválu v evangelium po všech sbořích,
१८आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्यास पाठवत आहोत.
19 (A netoliko to, ale také losem vyvolen jest od církví za tovaryše putování našeho, s touto milostí, kteroužto sloužíme k slávě Pánu a k vyplnění vůle vaší, )
१९यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो.
20 Varujíce se toho, aby nám někdo neutrhal pro tu hojnost, kterouž my přisluhujeme,
२०ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
21 Dobré opatrujíce netoliko před obličejem Páně, ale i před lidmi.
२१आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.
22 Poslali jsme pak s nimi bratra našeho, kteréhož jsme mnohokrát ve mnohých věcech zkusili, že jest pilný, a nyní mnohem pilnější bude pro mnohé doufání mé o vás.
२२त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.
23 Z strany Tita víte, že jest tovaryš můj, a mezi vámi pomocník můj; a z strany bratří našich, že jsou poslové církví a sláva Kristova.
२३तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत.
24 Protož jistoty lásky vaší a chlouby naší o vás, k nim dokažte, před obličejem církví.
२४म्हणून या लोकांस तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या आणि आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.

< 2 Korintským 8 >